येशू अनुसरण कसे करावे
Video not available
तुमच्या नवीन जीवनातील 4 नाती समजावून सांगणारा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ पहा
येशूचे अनुयायी (शिष्य) होण्याचा अर्थ काय आहे हे खालील विभाग आपल्याला शिकवतील
नोंदणी करामोठा प्रभाव पाडण्यासाठी देव सामान्य लोकांचा सोप्या गोष्टी करण्याद्वारे कसा उपयोग करितो हे तुम्हाला दिसेल.
शिष्य बनणे, शिष्य बनविणे आणि चर्च म्हणजे काय याचा सार जाणून घ्या.
येशूचा केवळ एक अनुयायी बनविण्याचा नव्हे तर पिढ्यान्पिढ्या गुणात्मक रीतीने वाढणारी संपूर्ण आध्यात्मिक कुटुंबे बनवण्याचा सोपा नमुना शिका.
तुम्ही असे चार मुख्य मार्ग जाणून घ्याल ज्यांद्वारे देव रोजच्या अनुयायांना येशू सारिखे अधिक बनवितो.
प्रार्थना
शिष्य बनण्याचा अर्थ आहे कि आपण देवाकडून ऐकतो आणि आपण देवाची आज्ञा पाळितो.
प्रार्थनेत एक तास घालवणे किती सोपे आहे ते पहा.
तुम्हांला इतरांसाठी प्रार्थना करण्याची आठवण करून देण्यासाठी साध्या स्मृतिसहायकाचा सराव करा.
बायबल वाचन
दररोज बायबल अध्ययनाचे एक साधन जे तुम्हांला देवाचे वचन समजण्यास, आज्ञा पाळण्यास आणि सामायिक करण्यास मदत करिते.
शिष्यांना काय माहित आहे हे महत्वाचे आहे - परंतु त्यांना जे माहित आहे त्याशी ते काय करितात हे त्यापेक्षा ही अधिक महत्वाचे आहे.
समुदाय
3/3 गट येशूच्या अनुयायांना भेटण्यासाठी, प्रार्थना करण्यासाठी, शिकण्यासाठी, वाढण्यासाठी, सहभागीतेसाठी आणि त्यांनी जे शिकले त्या गोष्टींचे पालन आणि त्यांना सामायिक करण्यासाठी एक कार्यपद्धती आहे. अशा प्रकारे, 3/3 गट हा केवळ एक छोटा गट नाही तर एक साधारण चर्च आहे.
ज्या क्षेत्रात सुरळीत चालले आहे त्यामध्ये एकमेकांना प्रोत्साहित करण्यासाठी आणि सुधारणा आवश्यक असणाऱ्या क्षेत्रांना प्रगट करण्यासाठी समान जातीच्या (पुरुष किंवा स्त्री) दोन किंवा तीन व्यक्तींना साप्ताहिक रीतीने भेटण्यासाठीचे साधन.
जाऊन आणि राहून येशूच्या आज्ञा कशा पाळाव्यात ते शिका.
येशूबरोबर आपला जिव्हाळ्याचा संबंध आणि पुढे वाढत असलेले नाते साजरे करण्याचा हा एक सोपा मार्ग आहे. साजरे करण्याचा एक सोपा मार्ग शिका.
येशू म्हणाला, “जा आणि सर्व राष्ट्रांच्या लोकांस शिष्य बनवा, त्यांना पित्याच्या आणि पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्म द्या…” ह्याला आचरणात कसे आणायचे ते शिका.
त्याग आणि दु: ख
देवाची अर्थव्यवस्था जगापेक्षा कशी वेगळी आहे ते जाणून घ्या. देव त्या लोकांमध्ये अधिक गुंतवणूक करितो जे लोकं त्यांना देण्यात आलेल्या गोष्टीं मध्ये विश्वासू असतात.
देवाचे राज्य कोठे नाही हे पहाण्यास सुरवात करा. ह्या सहसा अश्या जागा असतात जिथे परमेश्वर सर्वात जास्त काम करू इच्छितो.
तेव्हा येशू जवळ येऊन त्यांच्याशी बोलताना म्हणाला, “स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे. तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांना शिष्य करा; त्यांना पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या; जे काही मी तुम्हांला आज्ञापिले ते सर्व त्यांना पाळण्यास शिकवा; आणि पाहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे.”
इतरांना तुमच्या बरोबर येशूचे आज्ञापालन आणि अनुसरण करणे शिकविणे
बदकाच्या पिल्लांचा शिष्य बनविण्याशी काय संबंध आहे, ते शिका.
प्रशिक्षण चक्र जाणून घ्या आणि ते शिष्य बनवण्यास कसे लागू करिता येते याचा विचार करा.
शिष्य बनविणे कसे रेषीय नसणे गरजेचे नाही ते पहा. एकाच वेळी बर्याच गोष्टी घडू शकतात.
गुणात्मक वाढ होणे महत्वाचे आणि जलद गतीने गुणात्मक वाढ होणे अधिक महत्वाचे आहे. गती महत्वाची का आहे ते पहा.
तुम्ही ओळखत असलेल्या लोकांसोबत येशूबद्दल बोलणे
तुम्हांला तुमच्या नातेसंबंधांचा चांगला कारभारी होण्यास मदत करण्यासाठी डिझाइन केलेले एक साधन.
मानवतेच्या सुरुवातीपासून या जगाच्या अंतापर्यंत देवाची चांगली बातमी सामायिक करण्याचा एक मार्ग जाणून घ्या.
येशूने तुमच्या जीवनावर कसा प्रभाव पाडला आहे हे सामायिक करून तीन मिनिटांत तुमची साक्ष कशी द्यायची ते शिका.
तुम्ही ओळखत नसलेल्या लोकांसोबत येशूबद्दल बोलणे
शांतीप्रिय व्यक्ती कोण असू शकते आणि तुम्हांला ती सापडल्यावर कसे माहित होईल हे जाणून घ्या.
इतरांसाठी प्रार्थना करण्याच्या देवाच्या आज्ञेचे पालन करण्याचा हा एक सोपा मार्ग आहे. आणि हे असे दिसते जसे काय - चालता-फिरता देवाची प्रार्थना करणे!
हा एक गट आहे ज्यामध्ये 3/3 गटांचे नेतृत्व आणि प्रारंभ करणारे लोक असतात. हा गट 3/3 स्वरूपाचे देखील अनुसरण करितो आणि हा तुमच्या क्षेत्रातील देवाच्या कार्याच्या आध्यात्मिक आरोग्याचे मूल्यांकन करण्याचा एक शक्तिशाली मार्ग आहे.
एक शक्तिशाली साधन ज्याचा तुम्ही झटपट उपयोग करू शकता तुमच्या स्वतःच्या मजबूतींचा आणि असुरक्षिततेचे मूल्यमापन करण्यासाठी जेव्हां गोष्ट येते असे शिष्य बनविण्याची जे गुणात्मक रीतीने वाढतील.
नेतृत्वाचे गट हा एक असा मार्ग आहे त्यांच्यासाठी ज्यांना असे वाटते कि त्यांना नेतृत्व करण्यासाठी बोलविण्यात आले आहे, ते सेवा बजावून त्यांचे नेतृत्व विकसित करू शकतात.
विस्तारित अध्यात्मिक कुटुंब म्हणून बहुसंख्य चर्च एकत्र कसे राहतात आणि एकत्र जीवन कसे जगतात हे जाणून घ्या.