tool

प्रार्थनेत एक तास कसा घालवावा

हे पृष्ठ शेअर करा

प्रार्थना चक्र हे प्रार्थनेसाठी एक साधे साधन आहे जे तुम्ही स्वतः वापरू शकता आणि येशूच्या कोणत्याही अनुयायांसह सामायिक करू शकता. फक्त 12 सोप्या चरणांमध्ये - प्रत्येकी 5 मिनिटे - प्रार्थना चक्र बायबल आपल्याला प्रार्थना करायला शिकविते त्या 12 मार्गांविषयी तुम्हाला मार्गदर्शन करिते. शेवटी, तुम्ही एक तास प्रार्थना केलेली असेल. बायबल आपल्याला सांगते कि - "निरंतर प्रार्थना करा." आपल्यापैकी बरेच जण असे म्हणू शकत नाहीत की आम्ही असे करितो. परंतु प्रार्थनेच्या या एका तासानंतर - तुम्ही एक पाऊल पुढे वाढाल.

फक्त 12 सोप्या चरणांमध्ये - प्रत्येकी 5 मिनिटे - प्रार्थना चक्र बायबल आपल्याला प्रार्थना करायला शिकविते त्या 12 मार्गांविषयी तुम्हाला मार्गदर्शन करिते. शेवटी, तुम्ही एक तास प्रार्थना केलेली असेल.

स्तुती करा - प्रभूची स्तुती करून तुमचा प्रार्थनेचा तास सुरू करा. सध्या तुमच्या मनात असलेल्या गोष्टींसाठी त्याची स्तुती करा. गेल्या आठवड्यात त्याने तुमच्या जीवनात केलेल्या एका विशेष गोष्टीबद्दल त्याची स्तुती करा. तुमच्या कुटुंबासाठी त्याच्या चांगुलपणाबद्दल त्याची स्तुती करा.

प्रतीक्षा करा - परमेश्वराची वाट पाहण्यात वेळ घालवा. शांत राहा आणि त्याला तुमच्यासाठी सखोल मनन करू द्या.

कबूल करा - पवित्र आत्म्याला तुमच्या जीवनातील अशी कोणतीही गोष्ट दाखविण्यास सांगा जी कदाचित त्याला अप्रिय वाटत असेल. त्याला चुकीची वृत्ती, तसेच विशिष्ट कृती दर्शविण्यास सांगा ज्यासाठी तुम्ही अद्याप पश्चात्तापाची प्रार्थना केलेली नाही. आता प्रभूच्या पुढे या गोष्टी कबूल करा म्हणजे तुम्ही शुद्ध व्हाल.

वचन वाचा - स्तोत्रे, संदेष्टे किंवा नवीन करारातील प्रार्थनेवरील शास्त्रभाग वाचण्यात वेळ घालवा.

मागा - स्वतःच्या वतीने विनंत्या करा.

मध्यस्थी करा - इतरांच्या वतीने विनंत्या करा.

वचनानुसार प्रार्थना करा - विशिष्ट शास्त्रभागांनुसार प्रार्थना करा. शास्त्रवचनीय प्रार्थना तसेच अनेक स्तोत्रे या उद्देशासाठी खूप कामी येतात.

धन्यवाद द्या - तुमच्या जीवनातील गोष्टींसाठी, तुमच्या कुटुंबाच्या वतीने आणि तुमच्या चर्चच्या वतीने परमेश्वराचे आभार माना.

गीत गा - स्तुतीचे किंवा आराधनेचे गीत गा किंवा अन्य एखादे भजन किंवा आध्यात्मिक गीत गा.

मनन करा - परमेश्वराला तुमच्याशी बोलण्यास विनंती करा. त्याने तुम्हाला सांगितलेल्या गोष्टी लिहून काढण्यास पेन आणि कागद तयार ठेवा.

ऐका - तुम्ही वाचलेल्या गोष्टी, तुम्ही प्रार्थना केलेल्या गोष्टी व तुम्ही गायलेल्या गोष्टी विलीन करण्यात वेळ घालवा आणि पहा की प्रभु तुमच्याशी बोलण्यासाठी त्या सर्वांना एकत्र कसे आणितो.

स्तुती करा - तुम्ही परमेश्वरासोबत घालवलेल्या वेळेसाठी आणि त्याने तुम्हाला दिलेल्या उत्तरांसाठी परमेश्वराची स्तुती करा. त्याच्या गौरवशाली गुणांसाठी त्याची स्तुती करा.

डिक ईस्टमनच्या द अवर दॅट चेंजेस द वर्ल्ड © 2002 या डिक ईस्टमनने लिहिलेल्या पुस्तकातून, चॉसेन बुक्स, ग्रँड रॅपिड्स, MI, परवानगीने वापरलेले.

स्व: तालाच विचारा

  • तुमचे प्रार्थना जीवन वाढविण्यासाठी तुम्ही कोणत्या गोष्टींची पुनर्रचना केली पाहिजे किंवा काय करणे थांबविले पाहिजे?

आजच Zúme प्रशिक्षण सुरू करा

हे पूर्णपणे मोफत आहे, आणि तुम्ही कधीही सुरू करू शकता—तुमच्या स्वतःच्या गतीने, तुम्ही कुठेही असलात तरी.

विनामूल्य नोंदणी करा