concept

देव सामान्य लोकांचा उपयोग करितो

हे पृष्ठ शेअर करा

चर्चची सुरुवात कशी झाली याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? सुरुवातीला कोणीही कुशल व्यक्ती नव्हते. आश्चर्य वाटले? चांगली गोष्ट म्हणजे देवाकडे अशी योजना होती ज्यासाठी कुशल लोकांची आवश्यकता नव्हती. देव सामान्य लोकांचा उपयोग करितो. त्याने चर्चची पहिली चळवळ सुरू करण्यासाठी असे केले. आणि तो आज हि असे करितो. पहिल्या चर्चने येशूबद्दल इतरांना सांगण्यासाठी सामान्य लोकांना जगभरात पाठविले. त्या चर्चने सामान्य लोकांना गव्हर्नर आणि सेनापती आणि शासक आणि राजे यांच्यासमोर उभे राहण्यास पाठविले. त्या चर्चने सामान्य लोकांना आजारी लोकांना बरे करण्यासाठी, भुकेल्यांना अन्न देण्यासाठी, मृतांना जिवंत करण्यासाठी आणि जगातील प्रत्येकाला देवाच्या सर्व आज्ञा शिकविण्यासाठी पाठविले. पहिल्या चर्चने जग बदलण्यासाठी सामान्य लोकांना पाठविले. आणि त्यांनी ते केले.

आमचे स्वप्न आहे की येशूने जे सांगितले ते करणे - जगभरातील सामान्य लोकांना देवाच्या राज्यात मोठा प्रभाव पाडण्यासाठी लहान साधने वापरण्यास मदत करणे होय! येशूने त्याच्या अनुयायांना दिलेल्या शेवटच्या सूचना सोप्या होत्या. तो म्हणाला - स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे. तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांना शिष्य करा; त्यांना पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या; जे काही मी तुम्हांला आज्ञापिले ते सर्व त्यांना पाळण्यास शिकवा; आणि पाहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे. येशूची आज्ञा सरळ होती - शिष्य बनवा.

ते कसे करावे यासाठी त्याच्या सूचना सोप्या होत्या:

  • तुम्ही जिथे जाल तिथे शिष्य बनवा; 
  • पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा देऊन शिष्य बनवा; 
  • त्याने दिलेल्या सर्व आज्ञांचे पालन करण्यास त्यांना शिकवून शिष्य बनवा.

मग शिष्य बनविण्यासाठीच्या पायऱ्या कोणत्या?

  • आपण नेहमी शिष्य बनवितो - आपण जिथे जातो तिथे आणि जात असताना. 
  • जेव्हा कोणी येशूचे अनुसरण करण्याचा निर्णय घेतो - तेव्हा त्यांनी बाप्तिस्मा घेतला पाहिजे. 
  • जसजसे ते वाढत जातात - आपण प्रत्येक शिष्याला येशूने सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीचे पालन कसे करावे हे शिकविले पाहिजे.

त्याने आज्ञापिलेली एक गोष्ट म्हणजे शिष्य बनविणे आहे, याचा अर्थ असा आहे की येशूचे अनुसरण करणाऱ्या प्रत्येक शिष्याला शिष्य कसे बनवायचे हे देखील शिकणे गरजेचे आहे.

स्व: तालाच विचारा

  • जर येशूच्या प्रत्येक अनुयायाने त्याच्या महान आदेशाचे पालन करावे असा त्याचा हेतू होता, तर प्रत्यक्षात इतके कमी लोक शिष्य का बनवितात?
    • देव सामान्य लोकांचा उपयोग करितो ही कल्पना तुम्ही शिकलेल्या किंवा गृहीत धरलेल्या योजनेपेक्षा वेगळी होती का?

आजच Zúme प्रशिक्षण सुरू करा

हे पूर्णपणे मोफत आहे, आणि तुम्ही कधीही सुरू करू शकता—तुमच्या स्वतःच्या गतीने, तुम्ही कुठेही असलात तरी.

विनामूल्य नोंदणी करा