tool

प्रभू भोजन आणि त्याचे नेतृत्व कसे करावे

हे पृष्ठ शेअर करा

येशू म्हणाला - “स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मीच आहे; ह्या भाकरीतून जो कोणी खाईल तो सर्वकाळ जगेल; जी भाकर मी देईन ती माझा देह असून ती जगाच्या जीवनासाठी आहे.” होली कम्युनियन किंवा "प्रभू भोजन" हा आपला येशू सोबतचा घनिष्ट संबंध आणि वर्तमान नातेसंबंध साजरा करण्याचा एक मार्ग आहे. येथे त्याचे नेतृत्व करण्याचा एक सोपा मार्ग आहे. प्रभू भोजन साजरे करण्याचा येथे एक सोपा मार्ग आहे!

जेव्हा तुम्ही येशूचे अनुयायी म्हणून एकत्र येता तेव्हा शांतपणे मनन करण्यात वेळ घालवा, शांतपणे विचार करा आणि तुमच्या पापांना स्वीकार करा. जेव्हा तुम्ही तयार असाल, तेव्हा कोणाला तरी पवित्रशास्त्रातील हा शास्त्रभाग वाचायला सांगा – “कारण जे मला प्रभूपासून मिळाले तेच मी तुम्हांला सांगितले आहे की, ज्या रात्री प्रभू येशूला धरून देण्यात आले त्या रात्री त्याने भाकर घेतली; आणि आभार मानून ती मोडली, आणि म्हटले, [घ्या, खा,] हे माझे शरीर तुमच्यासाठी [मोडलेले असे] आहे, माझ्या स्मरणार्थ हे करा.” 1 करिंथकरांस पत्र 11:23-24

तुम्ही तुमच्या गटासाठी बाजूला राखून ठेविलेली भाकर त्यांना द्या आणि ती खा. वा 

चन सुरू ठेवा – "मग भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन तसेच केले आणि म्हटले, हा प्याला माझ्या रक्ताने झालेला नवा करार आहे; जितक्यांदा तुम्ही हा पिता तितक्यांदा माझ्या स्मरणार्थ हे करा.'' 1 करिंथकरांस पत्र 11:25

तुम्ही तुमच्या गटासाठी बाजूला राखून ठेविलेला रस किंवा द्राक्षरस सामायिक करा (लोकांना द्या) आणि तो प्या.

वाचन पूर्ण करा: "कारण जितक्यांदा तुम्ही ही भाकर खाता व हा प्याला पिता तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करिता." 1 करिंथकरांस पत्र 11:26

प्रार्थना किंवा गीत गाऊन आनंद साजरा करा. तुम्ही प्रभू भोजन सामायिक केले (दिले) आहे. तुम्ही त्याचे आहात आणि तो तुमचा आहे!

स्व: तालाच विचारा

  • प्रभू भोजन घेण्यासाठी काय आवश्यक आहे आणि काय आवश्यक नाही याबद्दल बायबल काय सांगते?

आजच Zúme प्रशिक्षण सुरू करा

हे पूर्णपणे मोफत आहे, आणि तुम्ही कधीही सुरू करू शकता—तुमच्या स्वतःच्या गतीने, तुम्ही कुठेही असलात तरी.

विनामूल्य नोंदणी करा