concept

शांतीप्रिय व्यक्ती आणि त्याला कसे शोधावे

हे पृष्ठ शेअर करा

ज्या ठिकाणी येशूचे अनुयायी फारच कमी आणि दूरवर आहेत अशा ठिकाणीही शांतीप्रिय व्यक्ती शिष्य बनवि ण्यास झपाट्याने मदत करू शकते. ती व्यक्ती कोण असू शकते हे जाणून घेण्यासाठी खालील व्हिडिओ पहा आणि तुम्हाला एखादी अशी व्यक्ती सापडल्यावर तुम्हाला कसे माहित होईल हे जाणून घ्या.

जेव्हा तुम्हाला अशा ठिकाणी शिष्य बनवायचे असतील जिथे अधिक शिष्य नाहीत - किंवा कदाचित एक ही नाही - तेव्हा शांतीप्रिय व्यक्तीचा शोध घेणे ही तुम्ही करणारी सर्वात महत्वाची गोष्ट असू शकते.

एक शांतीप्रिय व्यक्ती आहे:

  • एखादी अशी व्यक्ती जी तुमची गोष्ट, देवाची गोष्ट आणि येशूची सुवार्ता ऐकण्यासाठी इच्छुक असते.
  • एखादी अशी व्यक्ती जी आतिथ्यशील आहे आणि तुमचे स्वागत करिते त्यांच्या घरी किंवा त्यांच्या कामाच्या ठिकाणी किंवा कुटुंब व मित्रांसह कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी.
  • एखादी अशी व्यक्ती जी इतरांना ओळखीते (किंवा इतर लोक त्या व्यक्तीला ओळखीतात) आणि जी एका लहान गटाला किंवा अगदी जनसमूहाला ही एकत्र आणण्यास उत्सुक आहे.
  • एखादी अशी व्यक्ती जी विश्वासू आहे आणि जे काही ते शिकतात ते इतरांसोबत सामायिक करितात - तुम्ही निघून गेल्यानंतरही.

शांतीप्रिय व्यक्ती ओळखण्याचे तीन सोपे मार्ग:

  • समाजातील लोकांकडून शिफारशी मागवा -- "येथे असा कोण आहे जो विश्वसनीय आहे? या ठिकाणी असा कोणीतरी आहे का जो स्वतःच्या आधी इतरांचा विचार करितो?"
  • प्रार्थना वाटचाल करीत असताना किंवा तुमच्या दैनंदिन लयीत भेटत असलेल्या एखाद्या व्यक्तीसाठी प्रार्थना करा
  • एखाद्या व्यक्तीच्या जीवनात देव कार्य करीत आहे की नाही हे पाहण्यासाठी प्रत्येक संभाषणात आध्यात्मिक कल्पनांचा परिचय द्या

आपण त्यांना कसे शोधून काढले हे महत्त्वाचे नाही, लक्षात ठेवा येशूने म्हटले आहे की एक शांतीप्रिय व्यक्ती असा व्यक्ती आहे ज्याच्यासोबत आपण शिष्य बनविण्याचा बहुतेक वेळ घालविला पाहिजे.

स्व: तालाच विचारा

  • ज्याला “वाईट प्रतिष्ठा” मिळाली आहे (जसे की एक शोमरोनी स्त्री किंवा गरसेकरांतील भूतग्रस्त माणूस) खरोखर तो शांतीचा व्यक्ती असू शकतो का? का किंवा का नाही?
    • तुमच्या जवळचा एखादा समुदाय किंवा समाजाचा विभाग कोणता आहे ज्यामध्ये राज्याची उपस्थिती फार कमी (किंवा नाही) आहे असे आढळते? शांत व्यक्ती (असा कोणी जो खुला आहे, पाहुणचार करणारा आहे, इतरांना ओळखणारा आणि सांगणारा आहे) त्या समुदायात सुवार्तेच्या प्रसाराचा वेग कसा वाढवू शकतो?

आजच Zúme प्रशिक्षण सुरू करा

हे पूर्णपणे मोफत आहे, आणि तुम्ही कधीही सुरू करू शकता—तुमच्या स्वतःच्या गतीने, तुम्ही कुठेही असलात तरी.

विनामूल्य नोंदणी करा