गहन सत्र 1
चेक-इन
(1 min)
सर्व सहभागी आणि फॅसिलिटेटर चेक-इन करा.
Or six.zume.training/checkin and use code: 1397
प्रार्थना करा
(5 min)
प्रार्थनेने सुरुवात करा. पवित्र आत्म्याशिवाय आध्यात्मिक अंतर्दृष्टी आणि परिवर्तन शक्य नाही. एक गट म्हणून वेळ घालवा त्याला आमंत्रित करण्यास या सत्रामध्ये तुमचे मार्गदर्शन करण्यासाठी.
विहंगावलोकन (आढावा)
(1 min)
या सत्रात, आपण या संकल्पना ऐकू आणि त्यावर चर्चा करू:
आणि आम्ही ही साधने आमच्या टूलकिटमध्ये जोडू:
- देव सामान्य लोकांचा उपयोग करितो
- शिष्य आणि चर्चची सोपी व्याख्या
- आध्यात्मिक श्वास म्हणजे देवाचे ऐकणे आणि त्याचे पालन करणे होय
- ग्राहक विरुद्ध उत्पादक (निर्माते) जीवनशैली
- SOAPS बायबल वाचन
- उत्तरदायित्व गट
- प्रार्थनेत एक तास कसा घालवावा
- संबंधित कारभारीपण (रिलेशनल स्टुअर्डशिप) - 100 ची यादी
READ
(5 min)
देव सामान्य लोकांचा उपयोग करितो
Zume प्रशिक्षणात तुमचं स्वागत. Zume प्रशिक्षणात तुमचं स्वागत, Zume हा "खमीर" करता असणारा एक ग्रीक शब्द आहे.
येशू आपल्याला सांगतो की परमेश्र्वराचे राज्य असे आहे की जणू एका स्त्रीने थोडे "खमीर" भरपूर पिठात मिसळलं आहे आणि ते पीठ त्या खमीरासोबत मळलं जोपर्यंत ते पीठ फुगलं नाही.
येशू आपल्याला हे दाखवत होता की कशी एक सर्वसाधारण व्यक्ति एखादी छोटी गोष्ट घेऊन मोठी बनवू शकते!
आपलं स्वप्नं ते आहे जे येशूने करायला सांगितले -- छोटया गोष्टींच्या वापराने जगभरातील सर्वसाधारण लोकांना परमेश्र्वराच्या राज्यात मोठा प्रभाव पाडण्यास मदत करणे!
येशूने आपल्या शिष्यांना दिलेल्या शेवटच्या सुचना सोप्या होत्या. तो म्हणाला - स्वर्गातील व पृथ्वीवरील सर्व अधिकार मला दिले आहेत. म्हणून - तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य करा. त्यांना पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तीस्मा दया, जी काही मी तुम्हाला आज्ञा केली ती सर्व त्यांना पाळण्यास, शिकवा, आणि पहा युगाच्या समाप्ती पर्यंत - मी सर्व दिवस तुमच्या सोबत आहे.
येशूची आज्ञा साधी होती -- शिष्य बनवा / करा.
ते कसं करावं हयाच्या सुचना देखील सोप्या होत्या -- तुम्ही जाल तेथे शिष्य करा.
- पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तीस्मा देत त्यांना शिष्य बनवा.
- त्याची आज्ञापालन करण्यास शिकवून त्यांना शिष्य बनवा. त्यांनी आज्ञा केली.
तर मग शिष्य बनविण्याचे टप्पे काय आहेत?
- आपण नेहमीच शिष्य बनवावे - आपण कुठेही जात असो किंवा जाता जाता.
- जेव्हा कोण येशूचे शिष्य बनू इच्छीतं - त्यांना बाप्तीस्मा दयायला हवा.
- जशी त्यांची वाढ होते - आपण प्रत्येक शिष्याला येशूने शिकवलेल्या गोष्टींचे आज्ञापालन करायला शिकवायला हवे.
शिष्य बनवा अशी आज्ञा असल्यामुळे त्याचा अर्थ असाही होतो की प्रत्येक शिष्याला शिष्य कसे बनवावेत हे देखील ठाऊक असायला हवं.
त्या शिष्यांनी इतर शिष्य बनवायला हवेत. व त्या शिष्यांनी इतर बनवायला हवे.
शिष्यांची वाढ करणे. हेच Zume चे कार्य आहे.
हे खमीरासारखे आहे - पीठाची वाढ होईपर्यंत पीठ मळत जाणे.
येशूने जेव्हा शिष्य बनवा अशी आज्ञा दिली, त्याने एक वचनही दिले
येशूने म्हटले - मी युगाच्या समाप्तीपर्यंत / सर्व दिवस तुमच्या सोबत आहे.
येशूच्या प्रत्येक अनुयायाने हे लक्षात ठेवायला हवं की येशू नेहमी आपल्यासोबत आहे. कारण तो आहेच!
पण ह्याचा अर्थ असाही होतो की येशूच्या प्रत्येक अनुयायाने ह्या सत्याला ग्रहण करायला हवं की येशूची इच्छा आहे की आपण शिष्य बनवायला हवे. कारण तोही तसेच करतो.
येशूने म्हटले - स्वर्गातील व पृथ्वीवरील सर्व अधिकार मला दिले आहेत. म्हणून जा व शिष्य करा.
येशू जेव्हा आपल्याला पाठवतो -- तो त्याच्या अधिकारावर अवलंबून असतो.
येशू म्हणतो त्यापेक्षा मोठा आणखी कोणताही अधिकार नाही. कोणत्याही परंपरेला अधिक अधिकार नाही.
कोणत्याही संस्कृतीला अधिक अधिकार नाही. पृथ्वीवरील कोणत्याही नियमाला अधिक अधिकार नाही.
येशूने म्हटले - जा व शिष्य करा / बनवा.
आणि Zume सारखे - खमीरासाखे - आपण जात राहू, वाढत राहू जोवर सर्व कार्य पार पडत नाही तो वर.
चर्चा करा
(10 min)
- जर येशूची संकल्पना होती कि त्याच्या प्रत्येक अनुयायांनी त्याच्या महान आदेशाचे पालन करावे, तर फक्त काही थोडेच लोक वास्तविकतेमध्ये का शिष्य बनवितात?
READ
(5 min)
शिष्य आणि चर्च
Zume प्रशिक्षणात पुन्हा तुमचं स्वागत. ह्या सत्रात आपण शिष्य व मंडळीविषयी (चर्चाविषयी) बोलणार आहोत.
शिष्य म्हणजे काय? आणि तो आपण कसा करतो?
आणि त्याला आपण येशूने दिलेल्या आज्ञा पाळायला कसं शिकवतो? जी व्यक्ति आपलं आयुष्य ह्या जगात बंदिस्त होऊन जगली आहे त्यांना आपण परमेश्र्वराच्या राज्यासाठी कसं तयार करूं?
शिष्य या शब्दाचा अर्थ होतो अनुयायी. म्हणजेच शिष्य हा परमेश्र्वराच्या अनुयायी असतो. येशूने म्हटले - स्वर्गातील व पृथ्वीवरील सर्व अधिकार मला दिले आहेत. म्हणजेच परमेश्र्वराच्या राज्यात, येशू आपला राजा आहे. आपण त्याचे नागरिक आहोत व त्याच्या इच्छेच्या अटीवर चालणारे आहोत. त्याच्या इच्छा, हेतू, प्राधान्य व मोल हे सर्वात्कृष्ठ व सर्वोत्तम आहे. त्याचे वचन हे नियम आहे. तर मग राज्याचा नियम काय आहे? येशू आपल्या नागरीकांना काय करायला सांगतो?
येशूने म्हटले -- तू आपला देव परमेश्वरावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जिवाने व पूर्ण मनाने व पूर्ण शक्तिने प्रीति कर, येशूने म्हटले -- तू आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखीच प्रीति कर. येशूने म्हटले की परमेश्वर हा जुन्या करारातून आज्ञा करतो -- सर्व नियम व संदेष्टे ह्या दोघातून हाच सारांश निघतो की -- परमेश्र्वरावर व लोकांवर प्रेम कर. येशूने म्हटले- शिष्य करा येशूने म्हटले -- मी दिलेल्या सर्व आज्ञा त्यांना पाळायला शिकव.
शिष्य करण्यात म्हणजेच येशूने दिलेल्या सर्व आज्ञा त्यांना पाळायला शिकवणे -- नव्या कराराचा सारांश असाच होतो -- शिष्य करा.
एक शिष्य हा येशूचा अनुयायी असतो जो परमेश्वरावर प्रेम करतो, लोकांवर प्रेम करतो व शिष्य करतो.
तर मग चर्च मंडळी म्हणजे काय?
तुम्हाला वाटत असेल की चर्च म्हणजे एखादी (इमारत) - किंवा तुम्ही जाता ती जागा. पण परमेश्वर चर्चला मंडळी म्हणतो - असे लोक ज्यांचे आपण असतो.
बायबलमध्ये "मंडळी" या शब्दाचा अर्थ तीन प्रकारे घेतला आहे:
- युनिवरसल मंडळी -- ज्यात येशूचे पूर्वी असलेले, सध्या असलेले व असणारे अनुयायी ह्यांचा समावेश असतो.
- शहराची किंवा प्रादेशिक मंडळी -- ज्यात जगाच्या एखादया ठराविक प्रदेशात राहणारे येशूचे अनुयायी राहतात.
- घरातली मंडळी -- ज्यात एक किंवा त्याहून अधिक येशूचे अनुयायी राहतात.
एक अध्यात्मीक कुटूंब - येशूचे अनुयायी परमेश्वरावर प्रेम करतात, लोकांवर प्रेम करतात, शिष्क करतात व जे स्थानिक स्थळी भेटतात ते अशा प्रकारची मंडळी स्थापन करतात - घरातली मंडळी किंवा एक सर्वसाधारण मंडळी.
जेव्हा असे छोटे सर्वसाधारण मंडळ्या काहीतरी मोठं करण्याकरता एकत्र येतात तेव्हा शहरी स्थरावर किंवा प्रादेशिक मंडळीची स्थापना होते.
आणि जेव्हा हे एकमेकांशी जोडले जातात व इतिहास घडवतात ते युनिवरसल मंडळी घडवतात.
म्हणजेच चर्च मधलं कॅपीटल 'सी'
साध्या मंडळ्या हे अध्यात्मीक कुटुंबं असतात ज्यांचा मध्यात येशू असतो व तोच त्यांचा राजा असतो. साध्या मंडळ्या हे अध्यात्मीक कुटूंब असतात जे परमेश्वरावर व इतरांवर प्रेम करतात, शिष्य करतात व वाढत जातात. काही मंडळ्यांची इमारती असतात. प्रोग्रामस्, बजेट व स्टाफ असतात. पण सर्वसाधारण मंडळ्यांना परमेश्वरावर प्रेम करायला, इतरांवर प्रेम करायला, शिष्य बनवायला व वाढण्याकरता या कशाचीच गरज नसते. आणि म्हणून कुठल्या अधिक गोष्टीची भर पडली की मंडळी गुंतत जाते आणि म्हणूनच आमच्या प्रशिक्षणात आम्ही इमारती, प्रोग्रामस व स्टाफ ह्यांची बाब प्रादेशिक चर्चकरता (मंडळीकरता) सोडतो.
लक्षात ठेवा "Zume" म्हणजे "खमीर" -- एक पेशी असलेला व तीव्र गतीने वाढणारा जीव.
Zume प्रशिक्षणाने - आपण खमीरासारखे बनणार आहोत - साधे व पटपट वाढणारे. पण त्या अगोदर - परमेश्वराची इच्छा आपण जाणून घेऊ. कारण वाढ होणे चांगली गोष्ट आहे - पण दर वेळी नव्हे. कर्करोग देखील वाढतो. पण तो घातक असतो. म्हणूनच आपण जीवनाची वाढ कशी करायला हवी मरणाची (मृत्यूची) नव्हे ? आणि आपल्या शिष्याची वाढ देखील योग्य असायला हवी?
चर्चा करा
(10 min)
- जेव्हा तुम्ही एखाद्या चर्चचा विचार करिता तेव्हा तुमच्या मनात काय येते?
- त्या चित्रात आणि व्हिडिओमध्ये “साधारण चर्च (मंडळी)" म्हणून वर्णन जे केले आहे त्यात काय फरक आहे?
- तुमच्या मते गुणात्मक वाढ होण्यासाठी कोणती गोष्ट अधिक सोपी आहे आणि का?
READ
(5 min)
देवाचे ऐकणे आणि त्याचे पालन करणे
Zume प्रशिक्षणात तुमचं स्वागत. ह्या सत्रात, आपण परमेश्वराचं ऐकणं व ऐकलेल्याचं पालन करण्याविषयी ऐकणार आहोत.
श्र्वासोच्छ्वास म्हणजेच जीवन (आयुष्य). आपण श्वास आत घेतो व बाहेर सोडतो.
जीवन परमेश्वराच्या राज्यात देखील श्वाच्छ्वास महत्वाचा आहे.
खरंतर, परमेश्र्वर त्याच्या आत्म्याला "श्र्वास" असं म्हणतो त्याच्या राज्यात, जेव्हा आपण श्वास आत घेतो म्हणजेच आपण परमेश्र्वराचं ऐकतो. आपण श्वास आत घेतो म्हणजे आपण परमेश्र्वराचं त्याच्या वचनाद्वारे - बायबल मधून ऐकतो. आपण श्र्वास आत पेतो म्हणजे आपण परमेश्र्वराचं प्रार्थनेद्वारे - आपल्या व त्याच्या संभाशणाद्वारे ऐकतो. आपण श्वास आत घेतो म्हणजे आपण त्याच्या मंडळीद्वारे - चर्चमधून व येशूच्या इतर अनुयायांद्वारे ऐकतो. आपण श्र्वास आत पेतो म्हणजे परमेश्वराच्या कार्याद्वारे ऐकतो - काही घटना, अनुभव व कधीकधी त्याच्या मुलांना सहन कराण्या लागणारे छळ व यातना.
परमेश्वराच्या राज्यात आपण श्वास बाहेर सोडतो जेव्हा आपण परमेश्वराचं ऐकल्यावर केलेलं कृत्य असतं. आपण आज्ञा पालन केल्यावर श्वास सोडतो.
कधीकधी श्वास बाहेर सोडणे म्हणजे पालन करणे म्हणजेच आपले विचार, आपले शब्द आपल्या कृती बलदून त्यांना येशूच्या इच्छेनुसार एकाच स्थरांवर आणणे.
कधीकधी श्वास बाहेर सोडणे म्हणजेच पालन करणे येशूने आपल्याला वाटून दिले तेच इतरांसोबत वाटून घेणे - जे दिले तेच इतरांना देणे - जसा परमेश्वर आपल्याला आशिर्वादीत करतोय तसेच आपण इतरांना आशिर्वादीत करावे.
कारण येशूच्या अनुयायाकरता - श्वास आत घेणे व बाहेर सोडणे हे अतिशय महत्वाच आहे. हेच आपले जीवन आहे. येशूने म्हटले - पुत्र हा स्वतःहून काहीच करू शकत नाही. तो तेच करतो जो पिता करताना तो पाहतो. पिता जे करतो, तेच पुत्र करतो.
येशूने म्हटले - मी माझ्या अधिकाराने बोलत नाही. मला पित्याने पाठवलं आहे व त्याच प्रकारे बोलतो ज्या प्रकारे बोलण्याची आज्ञा मला दिली आहे.
येशूने म्हटले त्याने बोललेला प्रत्येक शब्द व सिद्धीस नेलेल प्रत्येक कार्य हे परमेश्र्वराच्या ऐकण्यावर व ऐकलेल्यानुसार पालनावर आधारित आहे.
श्र्वास आत घेणे - परमेश्र्वराचं ऐकणे. श्र्वास बाहेर सोडणे - ऐकलेल्याचं पालन करणे व इतरांना ते सांगणे.
येशूने म्हटले की त्याचे अनुयायीसुद्धा पवित्र आत्म्यामुळे परमेश्वराचं ऐकत - त्याचा श्वास - तो त्याच्या प्रत्येक अनुययात (शिष्यात) फुंकेल.
येशूने म्हटले की - तो सहाय्यक, तो पवित्र आत्मा, जो पित्या माझ्या नावात पाठवला आहे, तो तुम्हाला प्रत्येक गोष्ट शिकवेल व त्याची आठवण देईल.
श्र्वास आत घेणे परमेश्वारचं ऐकणे. श्र्वास बाहेर सोडणे - ऐकलेल्याचं पालन करणे व इतरांना ते सांगणे.
कसं जगावं हे येशू आपल्याला दाखवत होता.
तर मग आपण परमेश्वराचं आवाज कसा ऐकावा? कशाचं पालन करावं हे कसं कळेल?
येशूने स्वतःला "उत्तम मेंढपाळ" म्हटले. येशूने त्याच्या शिष्यांना त्याची "मेंढरं" म्हटले. येशूने म्हटले - माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात, मी त्यांना ओळखतो, व ते माझ्या पाठी येतात. येशूने म्हटले - जे परमेश्वराचे असतात ते परमेश्वराचं ऐकतात. तुम्ही ऐकू शकत नाही कारण तुम्ही परमेश्वराचे नाही.
येशूचे अनुयायी म्हणून, आपण त्याची वाणी ऐकण्याकरता स्वतःला वाहून प्यायला हवं.
- स्थीर राहून आपण त्याची वाणी ऐकू शकतो.
- येशूवर लक्ष केंद्रीत करून आपण त्याची वाणी ऐकू शकतो.
- आपण त्याची वाणी आपल्या विचारात, स्वप्नात, आपल्या भावनेंमध्ये व कल्पनेत ही ऐकू शकतो.
- आपण त्याची वाणी आपण लिहिताना व ऐकलेल्याची चाचणी करताना ऐकतो
प्रत्येक वाणी, प्रत्येक विचार, प्रत्येक स्वप्न, भावना व कल्पना ही परमेश्वराकडूनच असते असं नाही. कधीकधी ही वाणी शत्रूची देखील असू शकते. येशूने म्हटले की आपला शत्रू हा खोटारडा आहे व असत्याचा पिता आहे. येशूने म्हटले की आपला शत्रू हा केवळ चोरी, घात व नाश करण्याकरता येतो.
पण परमेश्र्वर म्हणतो की आपल्याला त्याचं ऐकू येईल व तो जेव्हा बोलेल तेव्हा तोच आहे असं आपल्याला कळेल. सरावाने व प्रार्थनेने आपण परमेश्वराची वाणी ओळखू शकतो. आपण हे ओळखू शकतो की ती वाणी परमेश्वराची आहे का आणखी कोणाची.
आपण काय ऐकतो ह्याच्या या काही चाचण्या आहेतः
- जेव्हा येशूची वाणी असते - ती त्याच्या वचनाला अनुसरूनच असते - जसं बायबलमध्ये - आपल्याला सांगितलं आहे की त्याच्या बोली वाणीत व लिखित वाणीत कधीच विसंगती नसेल.
- जेव्हा येशूची वाणी असेल - ती आपल्या मनाला आशा व शांती देईल. त्याच्या वाणीने आपल्याला दोषी वाटून हताश कधीच वाटणार नाही. येशू आपल्याला दोषीपात्र ठरवत नाही. येशू प्रेमात सुधारणा करतो.
- येशूची वाणी ही कधीच कमकुवता दर्शवत नाही - लौगिक अनैतिकता व अपवित्रता, कुकर्म, मूर्तीपूजा व जादूटोणा, द्वेश व बेबनाव, मत्सर व राग-क्रोध, स्वार्थी महत्वाकांक्षा, अमान्यता, पक्षता व हेवा, दारूडेपणा व अमर्यादित व्यवहार. ह्या गोष्टी परमेश्र्वराची वाणी नसतात.
- येशूच्या वाणीत - त्याच्या आवाजात परमेश्वराच्या आत्म्याचं फळ दर्शवलं जातं - प्रीति व आनंद, शांती व सहनशीलता, ममता व चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता व इंद्रियदमनं,
- जेव्हा येशूची वाणी असते - त्याच्या वाणीने आपल्याला शंका नव्हे तर विश्वास लाभतो. आपल्यात एक प्रकारचे ज्ञान असते व शांती असते की आपण परमेश्र्वराचं ऐकत आहोत. आपल्याला सगळं एकाच वेळी ऐकू येईल असं नाही. बहूदा एखादाच भाग आपल्या कानी पडेल. पण आपण जे ऐकू ते खंबीर असेल - न हालवणारं व न बदलणारं.
येशूच्या प्रत्येक शिष्याकरता सुर्वाता हीच आहे की आपण जेव्हा श्वास घेतो आपण परमेश्र्वराचं ऐकतो व जेव्हा श्र्वास सोडतो आपण ऐकलेल्याचं पालन करतो व इतरांना सांगतो जे आपण ऐकलं - अशाने परमेश्वर अधिक स्पष्टपणे बोलेल.
आपल्या श्वासातून त्याचा श्वास अधिकाधिक होत जाईल.
आपण त्याची वाणी अधिक स्पष्टपणे ऐक. आपण त्याचा / ची आवाज / वाणी ओळखू. त्याचे कार्य आपल्याला जगात दिसेल व आपणही त्याला हातभार लावू शकू.
आपण श्वास आत घेतो. आपण श्वास बाहेर सोडतो. जीवन.
चर्चा करा
(10 min)
- देवाचा आवाज ऐकणे आणि ओळखणे शिकणे का आवश्यक आहे?
- परमेश्वराचे ऐकणे आणि त्याला प्रतिसाद देणे हे खरेच श्वास घेण्यासारखे आहे का? का किंवा का नाही?
READ
(5 min)
S.O.A.P.S. बायबल अध्ययन
येशूने म्हटले - "सर्व राष्ट्रांमध्ये शिष्य करा त्यांना पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तीस्मा दया व मी जे आज्ञापिलें तसेच करण्याची त्यांना शिकवण दया."
येशूचा प्रत्येक अनुयायी जर येशूची आज्ञा पाळणार असेल तर त्या सर्वांना येशूच्या आज्ञा माहीत हव्यात.
परमेश्वर आपल्याला काय सांगू इच्छीतो ह्याचे सारांश म्हणजे सर्वश्रेष्ठ आज्ञा व सर्वात मोठी सोपवलेली कामगिरी, पण जर एखादा शिष्य परमेश्वराने निर्माण केलेल्या परिपूर्णतेत वाढणार असेल तर त्यांनी आधिकाधिक माहिती मिळवून अधिकाधिक आज्ञापालन करायला हवे.
चा अर्थ:
- म्हणजे पवित्र शास्त्र
- म्हणजे निरिक्षण
- म्हणजे व्यवहार पयोगी क्रिया
- प्रार्थना
- इतरांना सांगणे
येशूचा कुठलाही अनुयायी बायबल अध्ययनाची ही सोपी पद्धत शिकून लक्षात ठेवण्याकरता वापरू शकतो, प्रत्येक भागाकडे आपण जरा बारकाईने पाहूया.
जेव्हा तुम्ही बायबल वाचता किंवा ऐकताः
- पवित्र शास्त्रः आजच्या दिवसाकरता सर्वात अर्थपूर्ण किंवा अधिक वचने लिहून काढा.
- निरिक्षणः ती वचने पुन्हा लिहा किंवा तुम्हाला त्याचा अर्थ अधिक समजावा म्हणून ते तुमच्या शब्दात लिहा.
- व्यवहारपयोगी क्रियाः तुमच्या जीवनात ह्या आज्ञेचा किंवा त्या कल्पनेचा काय अर्थ लागतो ते पहा. तुम्हाला काय करावं लागेल? तुम्हाला वेगळं असं काय करावं लागेल हे लिहून काढा.
- प्रार्थनाः परमेश्वराच्या वचनात तुम्ही काय वाचलं, त्याच्या आज्ञापालना विषयी तुम्हाला काय कळलं व शिकलेलं कार्यों लावण्याविषयी सांगणारी एक प्रार्थना लिहा.
- इतरांना सांगणेः शिकलेलं कोणाला सांगावं व व्यवहारपयोगी क्रिया कशी करता येईल ह्या विषयी परमेश्वराला विचारा.
चला तर SOAPS कार्यरत करूयाः
- पवित्र शास्त्र म्हणतं - "कारण माझ्या कल्पना तुमच्या कल्पना नव्हे, माझे मार्ग तुमचे मार्ग नव्हे, असे परमेश्वर म्हणतो कारण आकाश जसे पृथ्वीहून उंच आहे तसे माझे मार्ग तुमच्या मार्गाहून आणि माझ्या कल्पना तुमच्या कल्पनांहून उंच आहेत." यशया ५५ वचन ८ आणि ९
- निरिक्षण - मनुष्य / मानव असल्याने मला काय माहिते व काय कसं करावं ह्याचं मर्यादित ज्ञान मला आहे. परमेश्वराला कुठल्याही प्रकारची मर्यादा नाही. तो सर्व पाहतो व जाणतो. तो काहीही करू शकतो.
- व्यवहार पयोगी क्रिया - परमेश्वराला सर्व महित आहे व त्याचे मार्ग सर्वोत्तम असल्याने, मी स्वतःच्या कर्तबगारीवर अवलंबून राहण्याऐवजी त्याच्या मार्गावर चाललो तर मला अधिक यश लाभेल.
- प्रार्थना - प्रभू, तुला प्रसन्न करणारे व इतरांना मदत करणारे जीवन कसे जगावे मला माहित नाही. माझ्याकडून चुका होतात. माझ्या विचारांमुळे दुखापद होते. त्यापेक्षा तू मला तुझे मार्ग व विचार शिकव. तुझ्या मार्गी चालत असता पवित्र आत्म्याला माझा मार्गदर्शक कर / बनव
- इतरांना सांगणे - ही वचने व व्यवहारपयोगी क्रिया मी माझ्या मित्राला सांगीन, जो आयुष्यातल्या कठिण काळातून जात आहे व ज्याला त्यासोबत जोडलेले महत्वाचे निर्णय घ्यायचे आहेत.
SOAP बायबल. ZUME साधन सामग्रीपेक्षा एक सोपे साधन.
क्रियाकलाप
(30 min)
SOAPS बायबल अभ्यास
पवित्र शास्त्र
आज ज्यांत तुम्हाला काही खास अर्थ दिसतो अशी एक किंवा दोन वचने लिहून ठेवा.
निरीक्षण
अधिक चांगल्या रीतीने समजण्यासाठी ती वचने किंवा मुख्य मुद्दे तुमच्या शब्दांत पुन्हा लिहून काढा.
लागूकरण
तुमच्या स्वतःच्या जीवनात ह्या आज्ञा पालनाचे काय महत्व आहे ह्यावर विचार करा.
प्रार्थना
तुम्ही जे शिकलात आणि त्याप्रमाणे वागण्याच्या तुमच्या योजना ह्याविषयी प्रार्थना करून देवाला सांगा.
इतरांना सांगणे
तुम्ही जे शिकलात आणि तुमच्या जीवनात जे आचरले ते तुम्ही कोणाला सांगावे हे देवाला विचारा. एस.ओ.ए.पी.एस.
कसे परिणामकारक असते त्याचे एक उदाहरण खाली दिले आहे:
एस - "कारण माझ्या कल्पना तुमच्या कल्पना नव्हेत. माझे मार्ग तुमचे मार्ग नव्हेत असे परमेश्वर म्हणतो. कारण आकाश जसे पृथ्वीहून उंच आहे तसे माझे मार्ग तुमच्या मागाहून मागाहून आणि माझ्या कल्पना तुमच्या कल्पनाहून उंच आहेत." यशया ५५:८-९.
ओ - एक मानव प्राणी असल्यामुळे, जे मला कळते आणि ते कसे करावे असे वाटते ह्याला सर्व बाजूंनी मर्यादा आहेत. तो (देव) मात्र सर्व काही पाहातो आणि सर्व काही जाणतो. तो काहीही करू शकतो.
ए - देव प्रत्येक गोष्ट जाणतो आणि त्याचे मार्ग सर्वोत्तम आहेत म्हणून,मी जर माझ्या स्वतःच्या माझ्या मार्गांवर अवलूंबून राहण्याऐवजी, त्याचे अनुसरण केले तर मला खूप अधिक यश मिळेल.
पी - हे प्रभू तुला संतुष्ट करील आणि ईतरांना साहाय्य करील अशा रीतीने जीवन कसे जगावे हे मला काळात नाही. माझ्या मार्गाने गेल्यावर चुका होतात. माझ्या विचारांनी हानी पोहोचते. त्यांऐवजी मला कृपा करून तुझे मार्ग आणि तुझे विचार मला शिकव. मी तुला अनुसरत असतांना तुझ्या पवित्र आत्म्याने मला मार्गदर्शन करावे असे मी मागतो.
एस - मी ही वचने आणि हे लागूकरणमाझा मित्र, अतीव ह्याला सांगेन कारण तो कठीण परिस्थितीत आहे आणि महत्वाचे निर्णय घेण्यासाठी त्याला मार्गदर्शन हवे आहे.
READ
(5 min)
उत्तरदायित्व गट
येशूने म्हटले - "तर कोणाला फार दिले ज्याजवळून फार मागण्यास येईल; आणि ज्याच्याजवळ फार ठेविले आहे ज्याजजवळून फारच फार मागण्यास येईल."
येशूने जबाबदारीवर आधारित बऱ्याच गोष्टी सांगितल्या व अनेक सत्य की आपल्या बोलण्या व कृत्याकरता आपल्याला कसं जबाबदार ठरवण्यात येईल.
येशू आपल्याला ह्या गोष्टी आता सांगतो म्हणजे आपण नंतरकरता तयार असू. आणि आपल्याला एके दिवशी जाब दयायचा असल्याने आपण आतापासूनच एक मेकांना जाब देण्याची सवय ठेऊ.
जबाबदारीचे गट यात समलिंगाचे दोन किंवा तीन लोक असतात - पुरुषांसोबत पुरूष व स्त्रीसोबत स्त्री - जे आठवड्यात एकदा भेटतात काही प्रश्नानंतर चर्चा करण्याकरता जेणेकरून त्यांना ते काय बरोबर करता आहेत व कुठे सुधारणेची गरज आहे हे कळतं.
येशूच्या प्रत्येक अनुयायाला जाब विचारण्यात येईल. आणि म्हणूनच येशूच्या प्रत्येक अनुयायाने एकमेकांना जाब विचारण्याची सवय ठेवायला हवी.
जबाबदारीचे गट - ZUME सामग्रीतले आणखा एक सोपे साधन.
क्रियाकलाप
(20 min)
उत्तरदायित्व गट
- देव कार्य करीत आहे हे तुम्हाला कसे दिसून आले?
- या आठवड्यात तुम्ही तुमच्या शब्दांद्वारे आणि कृतींद्वारे येशू ख्रिस्ताच्या महानतेची साक्ष दिली आहे का?
- तुम्हाला लैंगिक उत्तेजन देणाऱ्या गोष्टी दाखवण्यात आल्या का किंवा तुम्ही आपल्या मनात अनुचित लैंगिक विचार घोळू दिले का?
- आपले पैसे वापरतांना तो पैसा देवाचा आहे ह्याची जाणीव तुम्ही ठेवली होती का?
- तुम्ही कोणत्याही गोष्टीची अभिलाषा बाळगली आहे का?
- तुमच्या शब्दांनी तुम्ही कोणाची बदनामी केली का किंवा त्यांच्या भावना दुखावल्या का?
- तुमच्या शब्दांनी किंवा कृतीने किंवा अतिशयोक्ती केल्याने तुम्ही अप्रामाणिक झाला का?
- तुम्ही एखाद्या विशिष्ट, अंगवळणी पडलेल्या सवयीने, आळसाने किंवा बेशिस्तिने वर्तन करीत आहोत का?
- तुम्ही विशिष्ट वेष, मित्रगण, काम किंवा संपत्तीचे गुलाम बनला का?
- कोणाला तरी क्षमा करण्यात तुम्ही अपयशी ठरला का?
- तुम्हाला कोणत्या चिंता किंवा काळज्या भेडसावत आहेत?
- तुम्ही कुरकुर किंवा तक्रार करीत गेला का?
- तुमचे हृदय सदैव कृतज्ञतेने भरले होते का?
- तुमच्या महत्वाच्या नातेसंबंधात तुम्ही आदर, अनुकंपा आणि औदार्य राखले का?
- तुमच्या विचारात, शब्दांत किंवा कृतींत तुमच्यापुढे कोणते मोहपाश आले आणि तुमचा प्रतिसाद कसा होता?
- इतरांची सेवा करण्याची आणि त्यांना, विशेषतः विश्वासणाऱ्यांना, आशीर्वाद देण्याच्या संधी तुम्ही कशा मिळवल्या?
- तुमच्या प्रार्थनांना नेमकी उत्तरे मिळालेली तुम्ही पाहिलीत का?
विहंगावलोकन (आढावा)
(1 min)
या सत्रात ऐकलेल्या संकल्पना:
या सत्रात ऐकलेली साधने:
- देव सामान्य लोकांचा उपयोग करितो
- शिष्य आणि चर्चची सोपी व्याख्या
- आध्यात्मिक श्वास म्हणजे देवाचे ऐकणे आणि त्याचे पालन करणे होय
- ग्राहक विरुद्ध उत्पादक (निर्माते) जीवनशैली
- SOAPS बायबल वाचन
- उत्तरदायित्व गट
- प्रार्थनेत एक तास कसा घालवावा
- संबंधित कारभारीपण (रिलेशनल स्टुअर्डशिप) - 100 ची यादी
Take a Break
विहंगावलोकन (आढावा)
(1 min)
या सत्रात, आपण या संकल्पना ऐकू आणि त्यावर चर्चा करू:
आणि आम्ही ही साधने आमच्या टूलकिटमध्ये जोडू:
- देव सामान्य लोकांचा उपयोग करितो
- शिष्य आणि चर्चची सोपी व्याख्या
- आध्यात्मिक श्वास म्हणजे देवाचे ऐकणे आणि त्याचे पालन करणे होय
- ग्राहक विरुद्ध उत्पादक (निर्माते) जीवनशैली
- SOAPS बायबल वाचन
- उत्तरदायित्व गट
- प्रार्थनेत एक तास कसा घालवावा
- संबंधित कारभारीपण (रिलेशनल स्टुअर्डशिप) - 100 ची यादी
READ
(5 min)
उत्पादक (निर्माते) विरुद्ध ग्राहक
ह्या सत्रात आपण येशूखिस्ताच्या शिष्याला एक ग्राहक म्हणून नाही तर एक केवळ निर्माता, तो ही परमेश्र्वराच्या राज्यातला हा कसा बनवता येईल ते पाहणार आहोत.
त्याच्या परिपूर्ण योजनेत, आपण संतुलीत जीवन जगावं म्हणून त्याने आपल्याला निर्माण केले - निर्माण करून ग्रहण करण्याकरता, बनवून वापरण्याकरता, ओतून पुन्हा भरण्याकरता म्हणजे आपण पुन्हा ओतू शकू. पण, आपल्या ह्या तुटक्या दुनियेत, लोकांनी परमेश्र्वराची योजना नाकारली आहे आणि कित्येक जण आपली शक्ति, परमेश्वराची पूर्ण व योग्य योजना न जगता, ती वाया घालवतात. ते शिकतात पण इतरांना सांगत नाही. ते भरले जातात पण ते ओतत नाही. ते ग्रहण करतात पण निर्माण करत नाही.
आपण जर शिष्य करणार असू जे वाढत जातील, तर ते केवळ ग्रहण करणारे नव्हे तर निर्माते कसे बनतील हे देखिल त्यांना सांगायला हवं.
ते असं आहे थोडक्यात सांगायचं झालं तर हे असं - परमेश्वर लिखित वचनाचा वापर करतो - ज्याला आपण पवित्र शास्त्र किंवा बायबल असं म्हणतो - आपली अध्यात्मीक वाढ करण्याकरता.
प्रत्येक शिष्याची गरज असते शास्त्र शिकण्याची, त्याचा अर्थ लावण्याची व कार्यों लावण्याची. कित्येक हजार वर्ष, कित्येक वेगवेगळ्या लेखकांद्वारे परमेश्वराने आपले वचन विश्वासू जनांच्या ध्यानी मनी दिले ज्यांनी ते ऐकून, ग्रहण करून आपल्यापर्यंत पोहचविले. पवित्र शास्त्र आपल्याला परमेश्वराची गोष्ट सांगतं, त्याच्या योजना, त्याचं मन व त्याचे मार्ग सांगतं.
अगोदरच्या सत्रात तुम्ही दोन साप्या पद्धती शिकला - SOAPS BIBLE STUDY व ACCOUNTIBILITY GROUPS. पुढच्या सत्रात तुम्ही - 3/3rd GROUPS ही पद्धत शिकाल. हे तीन प्रकार (पद्धती) एकत्रीत कार्य करून नवीन शिष्यांना परमेश्वराचं लिखित वचन शिकण्यास, अर्थ लावण्यास व कार्या लावण्यास मदत करतं. ते केवळ परमेश्वराचे वचन ऐकणारे नव्हे तर तसे वागणारे व इतरांना सांगणारे दिखील बनतील.
परमेश्र्वर त्याच्या बोललेल्या वचनाचा देखिल वापर करतो - आपली अध्यात्मीक वाढ - प्रार्थनेद्वारे करण्याकरता. प्रार्थना म्हणजे परमेश्वाराशी बोलणे व त्याचे ऐकणे. प्रार्थना आपल्याला सेवाकार्यात व इतरांची सेवा करण्यास मदत करते. आपल्याली शिकविण्यास व एखादया व्यक्तिला किंवा एखादया गटाला परमेश्वराची ओळख होण्यास विशिष्ट मदत करते.
दोन सोप्या पद्धती - प्रार्थनेत वाटचाल व सात्त्याची प्रार्थना ह्याने शिष्यांचे वैय्यक्तीक प्रार्थना जीवन निर्माण होण्यास मदत होते व इतरांची मदत होईल अशी प्रार्थना शिकण्याची सुद्धा. ह्या पद्धतीने सातत्याने प्रार्थना करण्याची सवय होण्यास मदत मिळते व केवळ दिसेल तेच नव्हे तर अध्यात्मीक दृष्टीने जग पाहायला सुद्धा.
जेव्हा ह्याचा वापर सतत होतो, येशूच्या शिष्यास प्रार्थनेची क्षमता वाढवण्यास मदत होते व परमेश्र्वराचं ऐकण्याची क्षमता वाढते व ऐकलेलं इतरांना सांगण्याची सुद्धा.
आपल्या अध्यात्मीक वाढीकरता परमेश्र्वर विश्वासणाऱ्यांच्या मंडळीचा - ज्याला आपण चर्च म्हणतो - त्यांचाही वापर करतो. विश्वासणारेम्हणून आपण एकमेकांशी जोडले गेलो आहोत. परमेश्वराचं वचन म्हणतं की येशू मध्ये आपण - एका शरीराचे अनेक अंग (अवयव) आहोत. म्हणजेच आपण केवळ परमेश्वराशीच नव्हे - तर एकमेकांशी सुद्धा जोडले गेलो आहोत. परमेश्वर म्हणतो एकमेकांच्या अधीन व्हा. परमेश्वर म्हणतो एकमेकांची सेवा करा. आपल्या प्रत्येकाच्या काही ताकद आहे व काही निर्बळता आहे. आपल्या ताकदीचा वापर आपण इतराच्या निर्बळतेकरता करावा अशी परमेश्वराची इच्छा आहे. तो आपल्याकडून, अशीही अपेक्षा ठेवतो की त्याने इतरांना दिलेल्या क्षमतेचा वापर आपल्या निर्बळतेत आपली मदत होण्याकरता आपण तसे होऊ दयावे.
परमेश्र्वराचं वचन म्हणतं की देवाने आपल्यातल्या प्रत्येकाला एक विशिष्ट क्षमता दिली आहे; इतरांच्या मदतीकरता त्याचा वापर निश्चितच करा व अनेक प्रकारे आशीर्वादित ठरा. साध्या पद्धती जस 3/3rd GROUPS. जबाबदारीचे गट व समविचारी मदतनीसांची मदत होते, प्रीती करण्याचे प्रोत्साहन देण्याकरता आणि सत्कृत्य म्हणजे केवळ परमेश्र्वराचे आज्ञापालन करणे नव्हे तर ते इतरांना सांगण्यास व इतरांसोबत शिकण्यास मदत देखील करणे.
परमेश्वर छळ व यातनेचा देखील वापर करतो - त्याग व नुकसान जे आपण येशूच्या वतीने सहन करतो - आपल्या अध्यात्मीक उन्नतीकरता. कित्येकदा लोकं आपल्याला त्रास देतात, दुखावतात करण आपलं येशूवर प्रेम असतं व आपण त्याचे आज्ञापालन करतो किंवा जरी आपण असं करत असलो तरीही आपल्यासोबत वाईट गोष्टी घडतात. पण परमेश्वर हया छळाचा व यांतनेंचा वापर आपले व्यक्तिमत्व येशूसारखे घडवण्यास त्याचा वापर करतो. तो आपले व्यक्तिमत्व घडवतो. आपला विश्वास दृढ व पवित्र शुद्ध करतो, आपल्याला सेवाकार्याकरता तयार करतो, यातनेत असाणाऱ्या लोकांची सेवा करण्यास आपल्याला संधी देतो - व हे करत असताना जे आपल्याला ओळखतात व आपल्या यातना जाणतात त्याद्वारे तो स्वतःला अधिकाधिक स्पष्ट करत जातो. परमेश्वर आपल्याला सांगतो की येशूचे शिष्य म्हणून छळ हा अपेक्षीत आहे.
येशूने म्हटले - परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करेल जेव्हा माझ्यामुळे लोक तुमची निंदा व छळ करतील आणि तुमच्या विरूद्ध सर्व प्रकारचे वाईट लबाडीने बोलतील, तेव्हा तुम्ही आनंद व उल्हास करा, कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे. तुमच्यापूर्वी जे संदेष्टे होऊन गेले त्यांचा त्यांनी तसाच छळ केला.
सर्वसाधारण पद्धती जशा 3/3rd GROUPS व ACCOUNTIBILITY GROUPS हे येशूच्या शिष्यांना त्यांचा छळ व यातना इतरांना सांगण्याची संधी देतात.
ह्या गटांमध्ये संधी मिळते शिष्यांना हे शिकवायला की आपण कठीण काळाची अपेक्षा करायला हवी व परमेश्र्वराच्या प्रीतीवर विश्वास ठेऊन त्यांना योग्य प्रतिसाद देण्यास त्यांची तयारी करायला हवी जरी चुकीच्या गोष्टी भोवताली होत असल्या तरीही.
पवित्र शास्त्र. प्रार्थना. मंडळीतले जीवन / OR मंडळीसोबतचे. छळ / व यातना या मार्गाद्वारेच परमेश्वर आपल्याला त्याच्या योग्य पुत्रासारखे, येशूसारखे बनवितो.
साध्या पद्धतीने आपण केवळ परमेश्वराने दिलेल्या उत्तम गोष्टींचे ग्राहक नव्हे तर निर्माणकर्ते बनून ते इतरांना देखील सांगू.
चर्चा करा
(10 min)
- वर वर्णन केलेल्या चार क्षेत्रांपैकी (प्रार्थना, देवाचे वचन इ.) तुम्ही आधीपासून कोणत्या गोष्टींचा सराव करत आहात?
- तुम्ही कोणत्या गोष्टी विषयी अनिश्चित आहात?
- तुम्ही किती तैयार आहेत असे तुम्हाला वाटते जेव्हा इतरांना प्रशिक्षण देण्याची गोष्ट येते?
READ
(5 min)
प्रार्थना चक्र
येशू आपल्या शिष्यांना नेहमी प्राथनेच्या हेतू विषयी, सवयीविषयी व वचनांविषयी शिकवत असे.
येशूने म्हटले - "मागा म्हणजे तुम्हांस दिले जाईल, शोधा म्हणजे तुम्हांस सापडेल, ठोका म्हणजे तुम्हांस उघडले जाईल कारण जो कोणी मागतो त्याला मिळते, जो शोधतो त्याला सापडते व जो ठोकतो त्यांस उघडले जाईल."
येशूने त्याच्या शिष्यांना शिकविले की प्रार्थना ही जाहिर गौरवाकरता, स्वार्थी इच्छेकरता नसते तसेच वावटळ बडबडीकरताही नसते.
येशूने दाखवले / दर्शविले की प्रार्थनेत सामर्थ्य असते कारण हे आपल्या स्वर्गीय पित्याशी जो आपल्यावर प्रीती करतो त्याच्याशी आपले थेट संभाषण असते. कुठल्याही उत्तम संभाषणासारख उत्तम प्रार्थनेत दोन्ही बाजू ऐकतात व बोलतात. परंतू, सृष्टीच्या निर्माणकर्त्यांशी बोलणं म्हणजे दडपण येऊ शकत. आणि त्याच्याकडून परत ऐकणे - सुद्धाखरतर बहूतेक लोकांना हे भायाण देखील वाटू शकतं.
सूसमाचार असा आहे की प्रार्थना करणे अधिकोत्तम आहे - आपल्यावर प्रेम करणाऱ्या परमेश्वरासोबत व गहन संभाषण करणं - हे केवळ शक्यच नव्हे - तर परमेश्वराला हे असच हवं आहे.
पण जर प्रार्थना करणे म्हणजे एखादी नवीन भाषा शिकण्यासारखे असेल तर मग तुम्ही काय कराल ? उत्तर सोपं आहे - पुन्हा पुन्हा करा. प्रार्थना चक्र हे प्रार्थनेची सवय करण्याची एक सोप साधन आहे जे तुम्ही इतरांनाही सांगू शकता.
बारा सोप्या पद्धतीने - प्रत्येक पाच मिनिटे - प्रार्थना चक्र तुम्हाला मार्गदर्शन करेल, बायबलमधल्या बारा पद्धती जेणेकरून तुम्ही प्रार्थना करायला शिकाल. शेवटी तुम्ही तासभर प्रार्थना कराल. बायबल आपल्याला सांगतं - "न थांबता प्रार्थना करा." आपण असं करतो असं बहूतेक जण म्हणू शकणार नाही. पण प्रार्थनेच्या ह्या तासानंतर तुम्ही एक पाऊल पुढे असाल.
प्रार्थना चक्र - ZUME साधनसामग्रीतलं आणखी एक सोपं साधन.
क्रियाकलाप
(60 min)
प्रार्थना चक्र
१२ साध्या पायऱ्यांतून - प्रत्येक पायरीसाठी ५ मिनिटे देऊन - हे प्रार्थना चक्र आपण प्रार्थना कशी करावी हे ज्या केवळ १२ साध्या पायऱ्यांतून बायबल आपल्याला शिकविते त्यातून मार्ग दाखवून पुढे नेईल. हे संपता संपता, तुमची एक तासभर प्रार्थना करून झालेली असेल.
स्तुती: तुमचा प्रार्थनेचा तास प्रभूची स्तुती करून सुरु करा. अगदी ह्या क्षणी तुमच्या मनात घोळत असणाऱ्या गोष्टींसाठी त्याची स्तुती करा. गेल्या आठवड्यात त्याने तुमच्या जीवनात केलेल्या एका विशेष गोष्टीसाठी त्याची स्तुती करा. त्याने तुमच्या कुटुंबाप्रत दाखवलेल्या चांगुलपणाबद्दल त्याची स्तुती करा.
थांबून राहा: प्रभू उत्तर देईपर्यंत थांबून राहा. स्तब्ध राहा आणि तुम्ही मनन करावे म्हणून त्याने तुम्हाला विचार पुरविण्यासाठी त्याला वेळ द्या.
पाप कबुली करा: तुमच्या जीवनात पवित्र आत्म्याला नापसंत असलेले काहीही त्याने तुम्हाला दाखवावे अशी त्याला याचना करा. तुमच्या चुकीच्या मनोवृत्ती आणि तसेच ज्यांबद्दल तुम्ही अद्याप पाप कबुलीची प्रार्थना केली नाही ती विशिष्ट कृत्ये तुम्हाला दाखवावी असे त्याला विनवा. आता प्रभूपुढे ती कबुल करा यासाठी की तुम्ही शुद्ध व्हावे.
देवाचे वचन वाचा: स्तोत्रें, संदेष्टे आणि नव्या करारात दिलेले प्रार्थनेवरील उतारे वाचण्यात वेळ घालवा.
मग: आपणास्वतःसाठी विनंत्या करा.
रदबदली: दुसऱ्यांच्या वतीने विनंत्या करा.
वचन घेऊन प्रार्थना करा. विशिष्ट शास्त्रवचन घेऊन प्रार्थना करा. शास्त्रवचन घेऊन केलीली प्रार्थना तसेच अनेक स्तोत्रे या उद्देशासाठी योग्य आहेत.
आभार माना: तुमच्या जीवनातील गोष्टींसाठी, तुमच्या कुटुंबाच्या वतीने आणि तुमच्या चर्चच्या वतीने प्रभूचे आभार माना.
गाणी गा: स्तुती किंवा आराधनेची गाणी किंवा दुसरे गीत किंवा आत्मिक गाणे गा.
मनन करा: देवाने तुमच्याशी बोलावे अशी याचना करा. देव तुमच्या मनावर जे विचार बिंबवितो ते लिहून ठेवण्यासाठी पेन आणि कागद तयार ठेवा.
देवाची वाणी ऐका: तुम्ही वाचलेल्या गोष्टी, तुम्ही प्रार्थना केलेल्या गोष्टी, तुम्ही ज्या गाऊन म्हटल्या त्या गोष्टी ह्या सर्व एकत्र विलीन करण्याला वेळ द्या. प्रभू त्या सर्व तुमच्यापुढे आणून तुमच्याशी कसे बोलतो ते पहा.
स्तुती करा: प्रभूच्या सहवासात तुम्ही घालवलेला समय आणि त्याने तुमच्या मनावर बिंबविल्या विचारांसाठी त्याची स्तुती करा. त्याच्या गौरवशाली गुणविशेषांबद्दल त्याची प्रशंसा करा.
डिक ईस्टमन यांच्या द अवर दॅट चेंजेस द वर्ल्ड (C) २००२ मधील डिक ईस्टमन, चॉसेन बुक्स, ग्रँड रॅपिड्स, एमआय, परवानगीने वापरलेले पुस्तक.
चर्चा करा
(10 min)
- प्रार्थनेत एक तास घालवण्याबद्दल तुमची प्रतिक्रिया काय आहे?
- तुम्हाला कसे वाटत आहे?
- तुम्ही काही शिकलात किंवा ऐकले आहे का?
- तुम्ही अशा प्रकारच्या प्रार्थनेची नेहमीची सवय लावली तर जीवन कसे असेल?
READ
(5 min)
100 ची यादी
येशूने म्हटले - "जा व शिष्य करा...." व त्याच्या अनुयायांनी तसेच केले.
ते त्यांच्या परिवारात गेले. ते त्यांच्या मित्रमंडळीत गेले. ते शहरातल्या परिचयांकडे (परिचित असलेल्यांकडे) गेले. ते त्याच्या सहकर्मचाऱ्यांकडे गेले. ते गेले.
येशूने म्हटले - "जा" व ते गेले. व परमेश्र्वराचं कुटूंब वाढलं.
परमेश्वराने आपल्याल सहसंबंधी / नातीगोती दिलेलीच आहेत, आपण केवळ "जाऊन शिष्य करायचे आहेत." हे आपले परिवार, मित्रमंडळी, शेजारी, सहकर्मचारी, वर्गमित्र आहेत - आपण हयांना जन्मभर ओळखतो, व नुकतेच भेटलेलं लोकंसुद्धा.
परमेश्वराने आपल्या आयुष्यात / जीवनात अगोदरच ठेवलेल्या लोकांशी विश्वासू राहून आपण शिष्य बनविण्याचा सर्वात मोठा टप्पा पार करू शकतो. व हयाची सुरवात एका सोप्या पद्धतीने होऊ शकते ती म्हणजे यादी तयार करून.
शिष्य करण्याकरता शंभराची यादी तयार करणे हे ZUME साधनसामग्रीतले एक सोपे साधन आहे.
क्रियाकलाप
(30 min)
तुमची स्वतःची 100 ची यादी तयार करा
तुमची संबंधित कारभारीपणाची यादी तयार करा: तुमच्या प्रभावाच्या वर्तुळात असलेल्या लोकांची नावे लिहा. प्रत्येक व्यक्ती शिष्य, अजून विश्वास न ठेवणारी किंवा अज्ञात आहे का ते चिन्हांकित करा.
गट म्हणून वेळ काढा जेणेकरून प्रत्येक जण स्वतःची यादी तयार करू शकेल. तुम्ही कागद किंवा तुमच्या प्रशिक्षण साहित्यामधील डिजिटल साधने वापरू शकता.
विहंगावलोकन (आढावा)
(1 min)
या सत्रात ऐकलेल्या संकल्पना:
या सत्रात ऐकलेली साधने:
- देव सामान्य लोकांचा उपयोग करितो
- शिष्य आणि चर्चची सोपी व्याख्या
- आध्यात्मिक श्वास म्हणजे देवाचे ऐकणे आणि त्याचे पालन करणे होय
- ग्राहक विरुद्ध उत्पादक (निर्माते) जीवनशैली
- SOAPS बायबल वाचन
- उत्तरदायित्व गट
- प्रार्थनेत एक तास कसा घालवावा
- संबंधित कारभारीपण (रिलेशनल स्टुअर्डशिप) - 100 ची यादी