Zúme Training Guidebook

10-Session Course

सत्र 1

चेक-इन

(1 min)

सर्व सहभागी आणि फॅसिलिटेटर चेक-इन करा.

Or six.zume.training/checkin and use code: 5678

प्रार्थना करा

(5 min)

प्रार्थनेने सुरुवात करा. पवित्र आत्म्याशिवाय आध्यात्मिक अंतर्दृष्टी आणि परिवर्तन शक्य नाही. एक गट म्हणून वेळ घालवा त्याला आमंत्रित करण्यास या सत्रामध्ये तुमचे मार्गदर्शन करण्यासाठी.

विहंगावलोकन (आढावा)

(1 min)

या सत्रात, आपण या संकल्पना ऐकू आणि त्यावर चर्चा करू:

आणि आम्ही ही साधने आमच्या टूलकिटमध्ये जोडू:

  • देव सामान्य लोकांचा उपयोग करितो
  • शिष्य आणि चर्चची सोपी व्याख्या
  • आध्यात्मिक श्वास म्हणजे देवाचे ऐकणे आणि त्याचे पालन करणे होय
  • SOAPS बायबल वाचन
  • उत्तरदायित्व गट

READ

(5 min)

देव सामान्य लोकांचा उपयोग करितो

Zume प्रशिक्षणात तुमचं स्वागत. Zume प्रशिक्षणात तुमचं स्वागत, Zume हा "खमीर" करता असणारा एक ग्रीक शब्द आहे.

येशू आपल्याला सांगतो की परमेश्र्वराचे राज्य असे आहे की जणू एका स्त्रीने थोडे "खमीर" भरपूर पिठात मिसळलं आहे आणि ते पीठ त्या खमीरासोबत मळलं जोपर्यंत ते पीठ फुगलं नाही.

येशू आपल्याला हे दाखवत होता की कशी एक सर्वसाधारण व्यक्ति एखादी छोटी गोष्ट घेऊन मोठी बनवू शकते!

आपलं स्वप्नं ते आहे जे येशूने करायला सांगितले -- छोटया गोष्टींच्या वापराने जगभरातील सर्वसाधारण लोकांना परमेश्र्वराच्या राज्यात मोठा प्रभाव पाडण्यास मदत करणे!

येशूने आपल्या शिष्यांना दिलेल्या शेवटच्या सुचना सोप्या होत्या. तो म्हणाला - स्वर्गातील व पृथ्वीवरील सर्व अधिकार मला दिले आहेत. म्हणून - तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य करा. त्यांना पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तीस्मा दया, जी काही मी तुम्हाला आज्ञा केली ती सर्व त्यांना पाळण्यास, शिकवा, आणि पहा युगाच्या समाप्ती पर्यंत - मी सर्व दिवस तुमच्या सोबत आहे.

येशूची आज्ञा साधी होती -- शिष्य बनवा / करा.

ते कसं करावं हयाच्या सुचना देखील सोप्या होत्या -- तुम्ही जाल तेथे शिष्य करा.

  • पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तीस्मा देत त्यांना शिष्य बनवा.
  • त्याची आज्ञापालन करण्यास शिकवून त्यांना शिष्य बनवा. त्यांनी आज्ञा केली.

तर मग शिष्य बनविण्याचे टप्पे काय आहेत?

  • आपण नेहमीच शिष्य बनवावे - आपण कुठेही जात असो किंवा जाता जाता.
  • जेव्हा कोण येशूचे शिष्य बनू इच्छीतं - त्यांना बाप्तीस्मा दयायला हवा.
  • जशी त्यांची वाढ होते - आपण प्रत्येक शिष्याला येशूने शिकवलेल्या गोष्टींचे आज्ञापालन करायला शिकवायला हवे.

शिष्य बनवा अशी आज्ञा असल्यामुळे त्याचा अर्थ असाही होतो की प्रत्येक शिष्याला शिष्य कसे बनवावेत हे देखील ठाऊक असायला हवं.

त्या शिष्यांनी इतर शिष्य बनवायला हवेत. व त्या शिष्यांनी इतर बनवायला हवे.

शिष्यांची वाढ करणे. हेच Zume चे कार्य आहे.

हे खमीरासारखे आहे - पीठाची वाढ होईपर्यंत पीठ मळत जाणे.

येशूने जेव्हा शिष्य बनवा अशी आज्ञा दिली, त्याने एक वचनही दिले

येशूने म्हटले - मी युगाच्या समाप्तीपर्यंत / सर्व दिवस तुमच्या सोबत आहे.

येशूच्या प्रत्येक अनुयायाने हे लक्षात ठेवायला हवं की येशू नेहमी आपल्यासोबत आहे. कारण तो आहेच!

पण ह्याचा अर्थ असाही होतो की येशूच्या प्रत्येक अनुयायाने ह्या सत्याला ग्रहण करायला हवं की येशूची इच्छा आहे की आपण शिष्य बनवायला हवे. कारण तोही तसेच करतो.

येशूने म्हटले - स्वर्गातील व पृथ्वीवरील सर्व अधिकार मला दिले आहेत. म्हणून जा व शिष्य करा.

येशू जेव्हा आपल्याला पाठवतो -- तो त्याच्या अधिकारावर अवलंबून असतो.

येशू म्हणतो त्यापेक्षा मोठा आणखी कोणताही अधिकार नाही. कोणत्याही परंपरेला अधिक अधिकार नाही.

कोणत्याही संस्कृतीला अधिक अधिकार नाही. पृथ्वीवरील कोणत्याही नियमाला अधिक अधिकार नाही.

येशूने म्हटले - जा व शिष्य करा / बनवा.

आणि Zume सारखे - खमीरासाखे - आपण जात राहू, वाढत राहू जोवर सर्व कार्य पार पडत नाही तो वर.

चर्चा करा

(10 min)

  1. जर येशूची संकल्पना होती कि त्याच्या प्रत्येक अनुयायांनी त्याच्या महान आदेशाचे पालन करावे, तर फक्त काही थोडेच लोक वास्तविकतेमध्ये का शिष्य बनवितात?

READ

(5 min)

शिष्य आणि चर्च

Zume प्रशिक्षणात पुन्हा तुमचं स्वागत. ह्या सत्रात आपण शिष्य व मंडळीविषयी (चर्चाविषयी) बोलणार आहोत.

शिष्य म्हणजे काय? आणि तो आपण कसा करतो?

आणि त्याला आपण येशूने दिलेल्या आज्ञा पाळायला कसं शिकवतो? जी व्यक्ति आपलं आयुष्य ह्या जगात बंदिस्त होऊन जगली आहे त्यांना आपण परमेश्र्वराच्या राज्यासाठी कसं तयार करूं?

शिष्य या शब्दाचा अर्थ होतो अनुयायी. म्हणजेच शिष्य हा परमेश्र्वराच्या अनुयायी असतो. येशूने म्हटले - स्वर्गातील व पृथ्वीवरील सर्व अधिकार मला दिले आहेत. म्हणजेच परमेश्र्वराच्या राज्यात, येशू आपला राजा आहे. आपण त्याचे नागरिक आहोत व त्याच्या इच्छेच्या अटीवर चालणारे आहोत. त्याच्या इच्छा, हेतू, प्राधान्य व मोल हे सर्वात्कृष्ठ व सर्वोत्तम आहे. त्याचे वचन हे नियम आहे. तर मग राज्याचा नियम काय आहे? येशू आपल्या नागरीकांना काय करायला सांगतो?

येशूने म्हटले -- तू आपला देव परमेश्वरावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जिवाने व पूर्ण मनाने व पूर्ण शक्तिने प्रीति कर, येशूने म्हटले -- तू आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखीच प्रीति कर. येशूने म्हटले की परमेश्वर हा जुन्या करारातून आज्ञा करतो -- सर्व नियम व संदेष्टे ह्या दोघातून हाच सारांश निघतो की -- परमेश्र्वरावर व लोकांवर प्रेम कर. येशूने म्हटले- शिष्य करा येशूने म्हटले -- मी दिलेल्या सर्व आज्ञा त्यांना पाळायला शिकव.

शिष्य करण्यात म्हणजेच येशूने दिलेल्या सर्व आज्ञा त्यांना पाळायला शिकवणे -- नव्या कराराचा सारांश असाच होतो -- शिष्य करा.

एक शिष्य हा येशूचा अनुयायी असतो जो परमेश्वरावर प्रेम करतो, लोकांवर प्रेम करतो व शिष्य करतो.

तर मग चर्च मंडळी म्हणजे काय?

तुम्हाला वाटत असेल की चर्च म्हणजे एखादी (इमारत) - किंवा तुम्ही जाता ती जागा. पण परमेश्वर चर्चला मंडळी म्हणतो - असे लोक ज्यांचे आपण असतो.

बायबलमध्ये "मंडळी" या शब्दाचा अर्थ तीन प्रकारे घेतला आहे:

  • युनिवरसल मंडळी -- ज्यात येशूचे पूर्वी असलेले, सध्या असलेले व असणारे अनुयायी ह्यांचा समावेश असतो.
  • शहराची किंवा प्रादेशिक मंडळी -- ज्यात जगाच्या एखादया ठराविक प्रदेशात राहणारे येशूचे अनुयायी राहतात.
  • घरातली मंडळी -- ज्यात एक किंवा त्याहून अधिक येशूचे अनुयायी राहतात.

एक अध्यात्मीक कुटूंब - येशूचे अनुयायी परमेश्वरावर प्रेम करतात, लोकांवर प्रेम करतात, शिष्क करतात व जे स्थानिक स्थळी भेटतात ते अशा प्रकारची मंडळी स्थापन करतात - घरातली मंडळी किंवा एक सर्वसाधारण मंडळी.

जेव्हा असे छोटे सर्वसाधारण मंडळ्या काहीतरी मोठं करण्याकरता एकत्र येतात तेव्हा शहरी स्थरावर किंवा प्रादेशिक मंडळीची स्थापना होते.

आणि जेव्हा हे एकमेकांशी जोडले जातात व इतिहास घडवतात ते युनिवरसल मंडळी घडवतात.

म्हणजेच चर्च मधलं कॅपीटल 'सी'

साध्या मंडळ्या हे अध्यात्मीक कुटुंबं असतात ज्यांचा मध्यात येशू असतो व तोच त्यांचा राजा असतो. साध्या मंडळ्या हे अध्यात्मीक कुटूंब असतात जे परमेश्वरावर व इतरांवर प्रेम करतात, शिष्य करतात व वाढत जातात. काही मंडळ्यांची इमारती असतात. प्रोग्रामस्, बजेट व स्टाफ असतात. पण सर्वसाधारण मंडळ्यांना परमेश्वरावर प्रेम करायला, इतरांवर प्रेम करायला, शिष्य बनवायला व वाढण्याकरता या कशाचीच गरज नसते. आणि म्हणून कुठल्या अधिक गोष्टीची भर पडली की मंडळी गुंतत जाते आणि म्हणूनच आमच्या प्रशिक्षणात आम्ही इमारती, प्रोग्रामस व स्टाफ ह्यांची बाब प्रादेशिक चर्चकरता (मंडळीकरता) सोडतो.

लक्षात ठेवा "Zume" म्हणजे "खमीर" -- एक पेशी असलेला व तीव्र गतीने वाढणारा जीव.

Zume प्रशिक्षणाने - आपण खमीरासारखे बनणार आहोत - साधे व पटपट वाढणारे. पण त्या अगोदर - परमेश्वराची इच्छा आपण जाणून घेऊ. कारण वाढ होणे चांगली गोष्ट आहे - पण दर वेळी नव्हे. कर्करोग देखील वाढतो. पण तो घातक असतो. म्हणूनच आपण जीवनाची वाढ कशी करायला हवी मरणाची (मृत्यूची) नव्हे ? आणि आपल्या शिष्याची वाढ देखील योग्य असायला हवी?

चर्चा करा

(10 min)

  1. जेव्हा तुम्ही एखाद्या चर्चचा विचार करिता तेव्हा तुमच्या मनात काय येते?
  2. त्या चित्रात आणि व्हिडिओमध्ये “साधारण चर्च (मंडळी)" म्हणून वर्णन जे केले आहे त्यात काय फरक आहे?
  3. तुमच्या मते गुणात्मक वाढ होण्यासाठी कोणती गोष्ट अधिक सोपी आहे आणि का?

READ

(5 min)

देवाचे ऐकणे आणि त्याचे पालन करणे

Zume प्रशिक्षणात तुमचं स्वागत. ह्या सत्रात, आपण परमेश्वराचं ऐकणं व ऐकलेल्याचं पालन करण्याविषयी ऐकणार आहोत.

श्र्वासोच्छ्‌वास म्हणजेच जीवन (आयुष्य). आपण श्वास आत घेतो व बाहेर सोडतो.

जीवन परमेश्वराच्या राज्यात देखील श्वाच्छ्‌वास महत्वाचा आहे.

खरंतर, परमेश्र्वर त्याच्या आत्म्याला "श्र्वास" असं म्हणतो त्याच्या राज्यात, जेव्हा आपण श्वास आत घेतो म्हणजेच आपण परमेश्र्वराचं ऐकतो. आपण श्वास आत घेतो म्हणजे आपण परमेश्र्वराचं त्याच्या वचनाद्वारे - बायबल मधून ऐकतो. आपण श्र्वास आत पेतो म्हणजे आपण परमेश्र्वराचं प्रार्थनेद्वारे - आपल्या व त्याच्या संभाशणाद्वारे ऐकतो. आपण श्वास आत घेतो म्हणजे आपण त्याच्या मंडळीद्वारे - चर्चमधून व येशूच्या इतर अनुयायांद्वारे ऐकतो. आपण श्र्वास आत पेतो म्हणजे परमेश्वराच्या कार्याद्वारे ऐकतो - काही घटना, अनुभव व कधीकधी त्याच्या मुलांना सहन कराण्या लागणारे छळ व यातना.

परमेश्वराच्या राज्यात आपण श्वास बाहेर सोडतो जेव्हा आपण परमेश्वराचं ऐकल्यावर केलेलं कृत्य असतं. आपण आज्ञा पालन केल्यावर श्वास सोडतो.

कधीकधी श्वास बाहेर सोडणे म्हणजे पालन करणे म्हणजेच आपले विचार, आपले शब्द आपल्या कृती बलदून त्यांना येशूच्या इच्छेनुसार एकाच स्थरांवर आणणे.

कधीकधी श्वास बाहेर सोडणे म्हणजेच पालन करणे येशूने आपल्याला वाटून दिले तेच इतरांसोबत वाटून घेणे - जे दिले तेच इतरांना देणे - जसा परमेश्वर आपल्याला आशिर्वादीत करतोय तसेच आपण इतरांना आशिर्वादीत करावे.

कारण येशूच्या अनुयायाकरता - श्वास आत घेणे व बाहेर सोडणे हे अतिशय महत्वाच आहे. हेच आपले जीवन आहे. येशूने म्हटले - पुत्र हा स्वतःहून काहीच करू शकत नाही. तो तेच करतो जो पिता करताना तो पाहतो. पिता जे करतो, तेच पुत्र करतो.

येशूने म्हटले - मी माझ्या अधिकाराने बोलत नाही. मला पित्याने पाठवलं आहे व त्याच प्रकारे बोलतो ज्या प्रकारे बोलण्याची आज्ञा मला दिली आहे.

येशूने म्हटले त्याने बोललेला प्रत्येक शब्द व सिद्धीस नेलेल प्रत्येक कार्य हे परमेश्र्वराच्या ऐकण्यावर व ऐकलेल्यानुसार पालनावर आधारित आहे.

श्र्वास आत घेणे - परमेश्र्वराचं ऐकणे. श्र्वास बाहेर सोडणे - ऐकलेल्याचं पालन करणे व इतरांना ते सांगणे.

येशूने म्हटले की त्याचे अनुयायीसुद्धा पवित्र आत्म्यामुळे परमेश्वराचं ऐकत - त्याचा श्वास - तो त्याच्या प्रत्येक अनुययात (शिष्यात) फुंकेल.

येशूने म्हटले की - तो सहाय्यक, तो पवित्र आत्मा, जो पित्या माझ्या नावात पाठवला आहे, तो तुम्हाला प्रत्येक गोष्ट शिकवेल व त्याची आठवण देईल.

श्र्वास आत घेणे परमेश्वारचं ऐकणे. श्र्वास बाहेर सोडणे - ऐकलेल्याचं पालन करणे व इतरांना ते सांगणे.

कसं जगावं हे येशू आपल्याला दाखवत होता.

तर मग आपण परमेश्वराचं आवाज कसा ऐकावा? कशाचं पालन करावं हे कसं कळेल?

येशूने स्वतःला "उत्तम मेंढपाळ" म्हटले. येशूने त्याच्या शिष्यांना त्याची "मेंढरं" म्हटले. येशूने म्हटले - माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात, मी त्यांना ओळखतो, व ते माझ्या पाठी येतात. येशूने म्हटले - जे परमेश्वराचे असतात ते परमेश्वराचं ऐकतात. तुम्ही ऐकू शकत नाही कारण तुम्ही परमेश्वराचे नाही.

येशूचे अनुयायी म्हणून, आपण त्याची वाणी ऐकण्याकरता स्वतःला वाहून प्यायला हवं.

  • स्थीर राहून आपण त्याची वाणी ऐकू शकतो.
  • येशूवर लक्ष केंद्रीत करून आपण त्याची वाणी ऐकू शकतो.
  • आपण त्याची वाणी आपल्या विचारात, स्वप्नात, आपल्या भावनेंमध्ये व कल्पनेत ही ऐकू शकतो.
  • आपण त्याची वाणी आपण लिहिताना व ऐकलेल्याची चाचणी करताना ऐकतो

प्रत्येक वाणी, प्रत्येक विचार, प्रत्येक स्वप्न, भावना व कल्पना ही परमेश्वराकडूनच असते असं नाही. कधीकधी ही वाणी शत्रूची देखील असू शकते. येशूने म्हटले की आपला शत्रू हा खोटारडा आहे व असत्याचा पिता आहे. येशूने म्हटले की आपला शत्रू हा केवळ चोरी, घात व नाश करण्याकरता येतो.

पण परमेश्र्वर म्हणतो की आपल्याला त्याचं ऐकू येईल व तो जेव्हा बोलेल तेव्हा तोच आहे असं आपल्याला कळेल. सरावाने व प्रार्थनेने आपण परमेश्वराची वाणी ओळखू शकतो. आपण हे ओळखू शकतो की ती वाणी परमेश्वराची आहे का आणखी कोणाची.

आपण काय ऐकतो ह्याच्या या काही चाचण्या आहेतः

  • जेव्हा येशूची वाणी असते - ती त्याच्या वचनाला अनुसरूनच असते - जसं बायबलमध्ये - आपल्याला सांगितलं आहे की त्याच्या बोली वाणीत व लिखित वाणीत कधीच विसंगती नसेल.
  • जेव्हा येशूची वाणी असेल - ती आपल्या मनाला आशा व शांती देईल. त्याच्या वाणीने आपल्याला दोषी वाटून हताश कधीच वाटणार नाही. येशू आपल्याला दोषीपात्र ठरवत नाही. येशू प्रेमात सुधारणा करतो.
  • येशूची वाणी ही कधीच कमकुवता दर्शवत नाही - लौगिक अनैतिकता व अपवित्रता, कुकर्म, मूर्तीपूजा व जादूटोणा, द्वेश व बेबनाव, मत्सर व राग-क्रोध, स्वार्थी महत्वाकांक्षा, अमान्यता, पक्षता व हेवा, दारूडेपणा व अमर्यादित व्यवहार. ह्या गोष्टी परमेश्र्वराची वाणी नसतात.
  • येशूच्या वाणीत - त्याच्या आवाजात परमेश्वराच्या आत्म्याचं फळ दर्शवलं जातं - प्रीति व आनंद, शांती व सहनशीलता, ममता व चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता व इंद्रियदमनं,
  • जेव्हा येशूची वाणी असते - त्याच्या वाणीने आपल्याला शंका नव्हे तर विश्वास लाभतो. आपल्यात एक प्रकारचे ज्ञान असते व शांती असते की आपण परमेश्र्वराचं ऐकत आहोत. आपल्याला सगळं एकाच वेळी ऐकू येईल असं नाही. बहूदा एखादाच भाग आपल्या कानी पडेल. पण आपण जे ऐकू ते खंबीर असेल - न हालवणारं व न बदलणारं.

येशूच्या प्रत्येक शिष्याकरता सुर्वाता हीच आहे की आपण जेव्हा श्वास घेतो आपण परमेश्र्वराचं ऐकतो व जेव्हा श्र्वास सोडतो आपण ऐकलेल्याचं पालन करतो व इतरांना सांगतो जे आपण ऐकलं - अशाने परमेश्वर अधिक स्पष्टपणे बोलेल.

आपल्या श्वासातून त्याचा श्वास अधिकाधिक होत जाईल.

आपण त्याची वाणी अधिक स्पष्टपणे ऐक. आपण त्याचा / ची आवाज / वाणी ओळखू. त्याचे कार्य आपल्याला जगात दिसेल व आपणही त्याला हातभार लावू शकू.

आपण श्वास आत घेतो. आपण श्वास बाहेर सोडतो. जीवन.

चर्चा करा

(10 min)

  1. देवाचा आवाज ऐकणे आणि ओळखणे शिकणे का आवश्यक आहे?
  2. परमेश्वराचे ऐकणे आणि त्याला प्रतिसाद देणे हे खरेच श्वास घेण्यासारखे आहे का? का किंवा का नाही?

READ

(5 min)

S.O.A.P.S. बायबल अध्ययन

येशूने म्हटले - "सर्व राष्ट्रांमध्ये शिष्य करा त्यांना पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तीस्मा दया व मी जे आज्ञापिलें तसेच करण्याची त्यांना शिकवण दया."

येशूचा प्रत्येक अनुयायी जर येशूची आज्ञा पाळणार असेल तर त्या सर्वांना येशूच्या आज्ञा माहीत हव्यात.

परमेश्वर आपल्याला काय सांगू इच्छीतो ह्याचे सारांश म्हणजे सर्वश्रेष्ठ आज्ञा व सर्वात मोठी सोपवलेली कामगिरी, पण जर एखादा शिष्य परमेश्वराने निर्माण केलेल्या परिपूर्णतेत वाढणार असेल तर त्यांनी आधिकाधिक माहिती मिळवून अधिकाधिक आज्ञापालन करायला हवे.

चा अर्थ:

  • म्हणजे पवित्र शास्त्र
  • म्हणजे निरिक्षण
  • म्हणजे व्यवहार पयोगी क्रिया
  • प्रार्थना
  • इतरांना सांगणे

येशूचा कुठलाही अनुयायी बायबल अध्ययनाची ही सोपी पद्धत शिकून लक्षात ठेवण्याकरता वापरू शकतो, प्रत्येक भागाकडे आपण जरा बारकाईने पाहूया.

जेव्हा तुम्ही बायबल वाचता किंवा ऐकताः

  • पवित्र शास्त्रः आजच्या दिवसाकरता सर्वात अर्थपूर्ण किंवा अधिक वचने लिहून काढा.
  • निरिक्षणः ती वचने पुन्हा लिहा किंवा तुम्हाला त्याचा अर्थ अधिक समजावा म्हणून ते तुमच्या शब्दात लिहा.
  • व्यवहारपयोगी क्रियाः तुमच्या जीवनात ह्या आज्ञेचा किंवा त्या कल्पनेचा काय अर्थ लागतो ते पहा. तुम्हाला काय करावं लागेल? तुम्हाला वेगळं असं काय करावं लागेल हे लिहून काढा.
  • प्रार्थनाः परमेश्वराच्या वचनात तुम्ही काय वाचलं, त्याच्या आज्ञापालना विषयी तुम्हाला काय कळलं व शिकलेलं कार्यों लावण्याविषयी सांगणारी एक प्रार्थना लिहा.
  • इतरांना सांगणेः शिकलेलं कोणाला सांगावं व व्यवहारपयोगी क्रिया कशी करता येईल ह्या विषयी परमेश्वराला विचारा.

चला तर SOAPS कार्यरत करूयाः

  • पवित्र शास्त्र म्हणतं - "कारण माझ्या कल्पना तुमच्या कल्पना नव्हे, माझे मार्ग तुमचे मार्ग नव्हे, असे परमेश्वर म्हणतो कारण आकाश जसे पृथ्वीहून उंच आहे तसे माझे मार्ग तुमच्या मार्गाहून आणि माझ्या कल्पना तुमच्या कल्पनांहून उंच आहेत." यशया ५५ वचन ८ आणि ९
  • निरिक्षण - मनुष्य / मानव असल्याने मला काय माहिते व काय कसं करावं ह्याचं मर्यादित ज्ञान मला आहे. परमेश्वराला कुठल्याही प्रकारची मर्यादा नाही. तो सर्व पाहतो व जाणतो. तो काहीही करू शकतो.
  • व्यवहार पयोगी क्रिया - परमेश्वराला सर्व महित आहे व त्याचे मार्ग सर्वोत्तम असल्याने, मी स्वतःच्या कर्तबगारीवर अवलंबून राहण्याऐवजी त्याच्या मार्गावर चाललो तर मला अधिक यश लाभेल.
  • प्रार्थना - प्रभू, तुला प्रसन्न करणारे व इतरांना मदत करणारे जीवन कसे जगावे मला माहित नाही. माझ्याकडून चुका होतात. माझ्या विचारांमुळे दुखापद होते. त्यापेक्षा तू मला तुझे मार्ग व विचार शिकव. तुझ्या मार्गी चालत असता पवित्र आत्म्याला माझा मार्गदर्शक कर / बनव
  • इतरांना सांगणे - ही वचने व व्यवहारपयोगी क्रिया मी माझ्या मित्राला सांगीन, जो आयुष्यातल्या कठिण काळातून जात आहे व ज्याला त्यासोबत जोडलेले महत्वाचे निर्णय घ्यायचे आहेत.

SOAP बायबल. ZUME साधन सामग्रीपेक्षा एक सोपे साधन.

क्रियाकलाप

(30 min)

SOAPS बायबल अभ्यास

QR कोड स्कॅन करा.

QR कोड स्कॅन करा आणि मत्तय 6:9-13 चा उपयोग करून SOAPS बायबल अभ्यास पॅटर्नमध्ये वैयक्तिकरित्या कार्य करा. (20 मि)

एकत्र परत या आणि दोन किंवा तीनच्या गटात तुमचा S.O.A.P.S शेअर करा. (10 मि)

पवित्र शास्त्र

आज ज्यांत तुम्हाला काही खास अर्थ दिसतो अशी एक किंवा दोन वचने लिहून ठेवा.

निरीक्षण

अधिक चांगल्या रीतीने समजण्यासाठी ती वचने किंवा मुख्य मुद्दे तुमच्या शब्दांत पुन्हा लिहून काढा.

लागूकरण

तुमच्या स्वतःच्या जीवनात ह्या आज्ञा पालनाचे काय महत्व आहे ह्यावर विचार करा.

प्रार्थना

तुम्ही जे शिकलात आणि त्याप्रमाणे वागण्याच्या तुमच्या योजना ह्याविषयी प्रार्थना करून देवाला सांगा.

इतरांना सांगणे

तुम्ही जे शिकलात आणि तुमच्या जीवनात जे आचरले ते तुम्ही कोणाला सांगावे हे देवाला विचारा. एस.ओ.ए.पी.एस.

कसे परिणामकारक असते त्याचे एक उदाहरण खाली दिले आहे:

एस - "कारण माझ्या कल्पना तुमच्या कल्पना नव्हेत. माझे मार्ग तुमचे मार्ग नव्हेत असे परमेश्वर म्हणतो. कारण आकाश जसे पृथ्वीहून उंच आहे तसे माझे मार्ग तुमच्या मागाहून मागाहून आणि माझ्या कल्पना तुमच्या कल्पनाहून उंच आहेत." यशया ५५:८-९.

- एक मानव प्राणी असल्यामुळे, जे मला कळते आणि ते कसे करावे असे वाटते ह्याला सर्व बाजूंनी मर्यादा आहेत. तो (देव) मात्र सर्व काही पाहातो आणि सर्व काही जाणतो. तो काहीही करू शकतो.

- देव प्रत्येक गोष्ट जाणतो आणि त्याचे मार्ग सर्वोत्तम आहेत म्हणून,मी जर माझ्या स्वतःच्या माझ्या मार्गांवर अवलूंबून राहण्याऐवजी, त्याचे अनुसरण केले तर मला खूप अधिक यश मिळेल.

पी - हे प्रभू तुला संतुष्ट करील आणि ईतरांना साहाय्य करील अशा रीतीने जीवन कसे जगावे हे मला काळात नाही. माझ्या मार्गाने गेल्यावर चुका होतात. माझ्या विचारांनी हानी पोहोचते. त्यांऐवजी मला कृपा करून तुझे मार्ग आणि तुझे विचार मला शिकव. मी तुला अनुसरत असतांना तुझ्या पवित्र आत्म्याने मला मार्गदर्शन करावे असे मी मागतो.

एस - मी ही वचने आणि हे लागूकरणमाझा मित्र, अतीव ह्याला सांगेन कारण तो कठीण परिस्थितीत आहे आणि महत्वाचे निर्णय घेण्यासाठी त्याला मार्गदर्शन हवे आहे.

READ

(5 min)

उत्तरदायित्व गट

येशूने म्हटले - "तर कोणाला फार दिले ज्याजवळून फार मागण्यास येईल; आणि ज्याच्याजवळ फार ठेविले आहे ज्याजजवळून फारच फार मागण्यास येईल."

येशूने जबाबदारीवर आधारित बऱ्याच गोष्टी सांगितल्या व अनेक सत्य की आपल्या बोलण्या व कृत्याकरता आपल्याला कसं जबाबदार ठरवण्यात येईल.

येशू आपल्याला ह्या गोष्टी आता सांगतो म्हणजे आपण नंतरकरता तयार असू. आणि आपल्याला एके दिवशी जाब दयायचा असल्याने आपण आतापासूनच एक मेकांना जाब देण्याची सवय ठेऊ.

जबाबदारीचे गट यात समलिंगाचे दोन किंवा तीन लोक असतात - पुरुषांसोबत पुरूष व स्त्रीसोबत स्त्री - जे आठवड्यात एकदा भेटतात काही प्रश्नानंतर चर्चा करण्याकरता जेणेकरून त्यांना ते काय बरोबर करता आहेत व कुठे सुधारणेची गरज आहे हे कळतं.

येशूच्या प्रत्येक अनुयायाला जाब विचारण्यात येईल. आणि म्हणूनच येशूच्या प्रत्येक अनुयायाने एकमेकांना जाब विचारण्याची सवय ठेवायला हवी.

जबाबदारीचे गट - ZUME सामग्रीतले आणखा एक सोपे साधन.

क्रियाकलाप

(20 min)

उत्तरदायित्व गट

QR कोड स्कॅन करा.

दोन किंवा तीन लोकांच्या गटात (पुरूष आणि स्त्री वेगवेगळे) विभाजित व्हा.

पुढील 20 मिनिटे उत्तरदायित्व प्रश्नांमध्ये एकत्र काम करीत घालवा.

  1. देव कार्य करीत आहे हे तुम्हाला कसे दिसून आले?
  2. या आठवड्यात तुम्ही तुमच्या शब्दांद्वारे आणि कृतींद्वारे येशू ख्रिस्ताच्या महानतेची साक्ष दिली आहे का?
  3. तुम्हाला लैंगिक उत्तेजन देणाऱ्या गोष्टी दाखवण्यात आल्या का किंवा तुम्ही आपल्या मनात अनुचित लैंगिक विचार घोळू दिले का?
  4. आपले पैसे वापरतांना तो पैसा देवाचा आहे ह्याची जाणीव तुम्ही ठेवली होती का?
  5. तुम्ही कोणत्याही गोष्टीची अभिलाषा बाळगली आहे का?
  6. तुमच्या शब्दांनी तुम्ही कोणाची बदनामी केली का किंवा त्यांच्या भावना दुखावल्या का?
  7. तुमच्या शब्दांनी किंवा कृतीने किंवा अतिशयोक्ती केल्याने तुम्ही अप्रामाणिक झाला का?
  8. तुम्ही एखाद्या विशिष्ट, अंगवळणी पडलेल्या सवयीने, आळसाने किंवा बेशिस्तिने वर्तन करीत आहोत का?
  9. तुम्ही विशिष्ट वेष, मित्रगण, काम किंवा संपत्तीचे गुलाम बनला का?
  10. कोणाला तरी क्षमा करण्यात तुम्ही अपयशी ठरला का?
  11. तुम्हाला कोणत्या चिंता किंवा काळज्या भेडसावत आहेत?
  12. तुम्ही कुरकुर किंवा तक्रार करीत गेला का?
  13. तुमचे हृदय सदैव कृतज्ञतेने भरले होते का?
  14. तुमच्या महत्वाच्या नातेसंबंधात तुम्ही आदर, अनुकंपा आणि औदार्य राखले का?
  15. तुमच्या विचारात, शब्दांत किंवा कृतींत तुमच्यापुढे कोणते मोहपाश आले आणि तुमचा प्रतिसाद कसा होता?
  16. इतरांची सेवा करण्याची आणि त्यांना, विशेषतः विश्वासणाऱ्यांना, आशीर्वाद देण्याच्या संधी तुम्ही कशा मिळवल्या?
  17. तुमच्या प्रार्थनांना नेमकी उत्तरे मिळालेली तुम्ही पाहिलीत का?

विहंगावलोकन (आढावा)

(1 min)

या सत्रात ऐकलेल्या संकल्पना:

या सत्रात ऐकलेली साधने:

  • देव सामान्य लोकांचा उपयोग करितो
  • शिष्य आणि चर्चची सोपी व्याख्या
  • आध्यात्मिक श्वास म्हणजे देवाचे ऐकणे आणि त्याचे पालन करणे होय
  • SOAPS बायबल वाचन
  • उत्तरदायित्व गट

NEXT STEP

आज्ञापालन

तुमच्या सध्याच्या आणि पुढच्या भेटीदरम्यान S.O.A.P.S बायबल अध्ययनाचा सराव करा. मत्तय 5-7 वर लक्ष द्या, दिवसातून एकदा तरी ते वाचा. S.O.A.P.S. फॉरमॅट वापरत असताना एक दैनिक जर्नल ठेवा.

सामायिक करा

उत्तरदायित्व भागीदार (समान लिंग) शोधा आणि त्यांच्याशी साप्ताहिक आधारावर भेटणे सुरू करा.

सत्र 2

चेक-इन

(1 min)

सर्व सहभागी आणि फॅसिलिटेटर चेक-इन करा.

Or six.zume.training/checkin and use code: 2468

प्रार्थना करा

(5 min)

विचारा की गटामधील कोणाकडेही अशा काही विशिष्ट गरजा आहेत का कि त्यासाठी गटाने प्रार्थना करावी असे त्यांना वाटते.

देवाला धन्यवाद द्या की त्याने त्याच्या वचनात अभिवचन दिले आहे की जेव्हा त्याचे लोक प्रार्थना करतात तेव्हा तो ऐकतो आणि कार्य करतो.

देवाच्या पवित्र आत्म्यास तुमच्या वेळेचे एकत्रितपणे नेतृत्व करण्यास सांगा.

मागे वळून पहा

(5 min)

प्रारंभ करण्यापूर्वी, मागे वळून पहाण्यासाठी थोडा वेळ काढा.

शेवटच्या सत्राच्या शेवटी, तुमच्या गटातील प्रत्येकाला तुम्ही शिकलेल्या गोष्टींचा सराव करण्याचे आव्हान दिले गेले होते.

या आठवड्यात आपल्या गटाने कसे केले हे पाहण्यासाठी काही क्षण घ्या.

विहंगावलोकन (आढावा)

(1 min)

या सत्रात, आपण ही संकल्पना ऐकू आणि त्यावर चर्चा करू:

आणि आम्ही ही साधने आमच्या टूलकिटमध्ये जोडू:

  • ग्राहक विरुद्ध उत्पादक (निर्माते) जीवनशैली
  • प्रार्थनेत एक तास कसा घालवावा
  • संबंधित कारभारीपण (रिलेशनल स्टुअर्डशिप) - 100 ची यादी

READ

(5 min)

उत्पादक (निर्माते) विरुद्ध ग्राहक

ह्या सत्रात आपण येशूखिस्ताच्या शिष्याला एक ग्राहक म्हणून नाही तर एक केवळ निर्माता, तो ही परमेश्र्वराच्या राज्यातला हा कसा बनवता येईल ते पाहणार आहोत.

त्याच्या परिपूर्ण योजनेत, आपण संतुलीत जीवन जगावं म्हणून त्याने आपल्याला निर्माण केले - निर्माण करून ग्रहण करण्याकरता, बनवून वापरण्याकरता, ओतून पुन्हा भरण्याकरता म्हणजे आपण पुन्हा ओतू शकू. पण, आपल्या ह्या तुटक्या दुनियेत, लोकांनी परमेश्र्वराची योजना नाकारली आहे आणि कित्येक जण आपली शक्ति, परमेश्वराची पूर्ण व योग्य योजना न जगता, ती वाया घालवतात. ते शिकतात पण इतरांना सांगत नाही. ते भरले जातात पण ते ओतत नाही. ते ग्रहण करतात पण निर्माण करत नाही.

आपण जर शिष्य करणार असू जे वाढत जातील, तर ते केवळ ग्रहण करणारे नव्हे तर निर्माते कसे बनतील हे देखिल त्यांना सांगायला हवं.

ते असं आहे थोडक्यात सांगायचं झालं तर हे असं - परमेश्वर लिखित वचनाचा वापर करतो - ज्याला आपण पवित्र शास्त्र किंवा बायबल असं म्हणतो - आपली अध्यात्मीक वाढ करण्याकरता.

प्रत्येक शिष्याची गरज असते शास्त्र शिकण्याची, त्याचा अर्थ लावण्याची व कार्यों लावण्याची. कित्येक हजार वर्ष, कित्येक वेगवेगळ्या लेखकांद्वारे परमेश्वराने आपले वचन विश्वासू जनांच्या ध्यानी मनी दिले ज्यांनी ते ऐकून, ग्रहण करून आपल्यापर्यंत पोहचविले. पवित्र शास्त्र आपल्याला परमेश्वराची गोष्ट सांगतं, त्याच्या योजना, त्याचं मन व त्याचे मार्ग सांगतं.

अगोदरच्या सत्रात तुम्ही दोन साप्या पद्धती शिकला - SOAPS BIBLE STUDY व ACCOUNTIBILITY GROUPS. पुढच्या सत्रात तुम्ही - 3/3rd GROUPS ही पद्धत शिकाल. हे तीन प्रकार (पद्धती) एकत्रीत कार्य करून नवीन शिष्यांना परमेश्वराचं लिखित वचन शिकण्यास, अर्थ लावण्यास व कार्या लावण्यास मदत करतं. ते केवळ परमेश्वराचे वचन ऐकणारे नव्हे तर तसे वागणारे व इतरांना सांगणारे दिखील बनतील.

परमेश्र्वर त्याच्या बोललेल्या वचनाचा देखिल वापर करतो - आपली अध्यात्मीक वाढ - प्रार्थनेद्वारे करण्याकरता. प्रार्थना म्हणजे परमेश्वाराशी बोलणे व त्याचे ऐकणे. प्रार्थना आपल्याला सेवाकार्यात व इतरांची सेवा करण्यास मदत करते. आपल्याली शिकविण्यास व एखादया व्यक्तिला किंवा एखादया गटाला परमेश्वराची ओळख होण्यास विशिष्ट मदत करते.

दोन सोप्या पद्धती - प्रार्थनेत वाटचाल व सात्त्याची प्रार्थना ह्याने शिष्यांचे वैय्यक्तीक प्रार्थना जीवन निर्माण होण्यास मदत होते व इतरांची मदत होईल अशी प्रार्थना शिकण्याची सुद्धा. ह्या पद्धतीने सातत्याने प्रार्थना करण्याची सवय होण्यास मदत मिळते व केवळ दिसेल तेच नव्हे तर अध्यात्मीक दृष्टीने जग पाहायला सुद्धा.

जेव्हा ह्याचा वापर सतत होतो, येशूच्या शिष्यास प्रार्थनेची क्षमता वाढवण्यास मदत होते व परमेश्र्वराचं ऐकण्याची क्षमता वाढते व ऐकलेलं इतरांना सांगण्याची सुद्धा.

आपल्या अध्यात्मीक वाढीकरता परमेश्र्वर विश्वासणाऱ्यांच्या मंडळीचा - ज्याला आपण चर्च म्हणतो - त्यांचाही वापर करतो. विश्वासणारेम्हणून आपण एकमेकांशी जोडले गेलो आहोत. परमेश्वराचं वचन म्हणतं की येशू मध्ये आपण - एका शरीराचे अनेक अंग (अवयव) आहोत. म्हणजेच आपण केवळ परमेश्वराशीच नव्हे - तर एकमेकांशी सुद्धा जोडले गेलो आहोत. परमेश्वर म्हणतो एकमेकांच्या अधीन व्हा. परमेश्वर म्हणतो एकमेकांची सेवा करा. आपल्या प्रत्येकाच्या काही ताकद आहे व काही निर्बळता आहे. आपल्या ताकदीचा वापर आपण इतराच्या निर्बळतेकरता करावा अशी परमेश्वराची इच्छा आहे. तो आपल्याकडून, अशीही अपेक्षा ठेवतो की त्याने इतरांना दिलेल्या क्षमतेचा वापर आपल्या निर्बळतेत आपली मदत होण्याकरता आपण तसे होऊ दयावे.

परमेश्र्वराचं वचन म्हणतं की देवाने आपल्यातल्या प्रत्येकाला एक विशिष्ट क्षमता दिली आहे; इतरांच्या मदतीकरता त्याचा वापर निश्चितच करा व अनेक प्रकारे आशीर्वादित ठरा. साध्या पद्धती जस 3/3rd GROUPS. जबाबदारीचे गट व समविचारी मदतनीसांची मदत होते, प्रीती करण्याचे प्रोत्साहन देण्याकरता आणि सत्कृत्य म्हणजे केवळ परमेश्र्वराचे आज्ञापालन करणे नव्हे तर ते इतरांना सांगण्यास व इतरांसोबत शिकण्यास मदत देखील करणे.

परमेश्वर छळ व यातनेचा देखील वापर करतो - त्याग व नुकसान जे आपण येशूच्या वतीने सहन करतो - आपल्या अध्यात्मीक उन्नतीकरता. कित्येकदा लोकं आपल्याला त्रास देतात, दुखावतात करण आपलं येशूवर प्रेम असतं व आपण त्याचे आज्ञापालन करतो किंवा जरी आपण असं करत असलो तरीही आपल्यासोबत वाईट गोष्टी घडतात. पण परमेश्वर हया छळाचा व यांतनेंचा वापर आपले व्यक्तिमत्व येशूसारखे घडवण्यास त्याचा वापर करतो. तो आपले व्यक्तिमत्व घडवतो. आपला विश्वास दृढ व पवित्र शुद्ध करतो, आपल्याला सेवाकार्याकरता तयार करतो, यातनेत असाणाऱ्या लोकांची सेवा करण्यास आपल्याला संधी देतो - व हे करत असताना जे आपल्याला ओळखतात व आपल्या यातना जाणतात त्याद्वारे तो स्वतःला अधिकाधिक स्पष्ट करत जातो. परमेश्वर आपल्याला सांगतो की येशूचे शिष्य म्हणून छळ हा अपेक्षीत आहे.

येशूने म्हटले - परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करेल जेव्हा माझ्यामुळे लोक तुमची निंदा व छळ करतील आणि तुमच्या विरूद्ध सर्व प्रकारचे वाईट लबाडीने बोलतील, तेव्हा तुम्ही आनंद व उल्हास करा, कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे. तुमच्यापूर्वी जे संदेष्टे होऊन गेले त्यांचा त्यांनी तसाच छळ केला.

सर्वसाधारण पद्धती जशा 3/3rd GROUPS व ACCOUNTIBILITY GROUPS हे येशूच्या शिष्यांना त्यांचा छळ व यातना इतरांना सांगण्याची संधी देतात.

ह्या गटांमध्ये संधी मिळते शिष्यांना हे शिकवायला की आपण कठीण काळाची अपेक्षा करायला हवी व परमेश्र्वराच्या प्रीतीवर विश्वास ठेऊन त्यांना योग्य प्रतिसाद देण्यास त्यांची तयारी करायला हवी जरी चुकीच्या गोष्टी भोवताली होत असल्या तरीही.

पवित्र शास्त्र. प्रार्थना. मंडळीतले जीवन / OR मंडळीसोबतचे. छळ / व यातना या मार्गाद्वारेच परमेश्वर आपल्याला त्याच्या योग्य पुत्रासारखे, येशूसारखे बनवितो.

साध्या पद्धतीने आपण केवळ परमेश्वराने दिलेल्या उत्तम गोष्टींचे ग्राहक नव्हे तर निर्माणकर्ते बनून ते इतरांना देखील सांगू.

चर्चा करा

(10 min)

  1. वर वर्णन केलेल्या चार क्षेत्रांपैकी (प्रार्थना, देवाचे वचन इ.) तुम्ही आधीपासून कोणत्या गोष्टींचा सराव करत आहात?
  2. तुम्ही कोणत्या गोष्टी विषयी अनिश्चित आहात?
  3. तुम्ही किती तैयार आहेत असे तुम्हाला वाटते जेव्हा इतरांना प्रशिक्षण देण्याची गोष्ट येते?

READ

(5 min)

प्रार्थना चक्र

येशू आपल्या शिष्यांना नेहमी प्राथनेच्या हेतू विषयी, सवयीविषयी व वचनांविषयी शिकवत असे.

येशूने म्हटले - "मागा म्हणजे तुम्हांस दिले जाईल, शोधा म्हणजे तुम्हांस सापडेल, ठोका म्हणजे तुम्हांस उघडले जाईल कारण जो कोणी मागतो त्याला मिळते, जो शोधतो त्याला सापडते व जो ठोकतो त्यांस उघडले जाईल."

येशूने त्याच्या शिष्यांना शिकविले की प्रार्थना ही जाहिर गौरवाकरता, स्वार्थी इच्छेकरता नसते तसेच वावटळ बडबडीकरताही नसते.

येशूने दाखवले / दर्शविले की प्रार्थनेत सामर्थ्य असते कारण हे आपल्या स्वर्गीय पित्याशी जो आपल्यावर प्रीती करतो त्याच्याशी आपले थेट संभाषण असते. कुठल्याही उत्तम संभाषणासारख उत्तम प्रार्थनेत दोन्ही बाजू ऐकतात व बोलतात. परंतू, सृष्टीच्या निर्माणकर्त्यांशी बोलणं म्हणजे दडपण येऊ शकत. आणि त्याच्याकडून परत ऐकणे - सुद्धाखरतर बहूतेक लोकांना हे भायाण देखील वाटू शकतं.

सूसमाचार असा आहे की प्रार्थना करणे अधिकोत्तम आहे - आपल्यावर प्रेम करणाऱ्या परमेश्वरासोबत व गहन संभाषण करणं - हे केवळ शक्यच नव्हे - तर परमेश्वराला हे असच हवं आहे.

पण जर प्रार्थना करणे म्हणजे एखादी नवीन भाषा शिकण्यासारखे असेल तर मग तुम्ही काय कराल ? उत्तर सोपं आहे - पुन्हा पुन्हा करा. प्रार्थना चक्र हे प्रार्थनेची सवय करण्याची एक सोप साधन आहे जे तुम्ही इतरांनाही सांगू शकता.

बारा सोप्या पद्धतीने - प्रत्येक पाच मिनिटे - प्रार्थना चक्र तुम्हाला मार्गदर्शन करेल, बायबलमधल्या बारा पद्धती जेणेकरून तुम्ही प्रार्थना करायला शिकाल. शेवटी तुम्ही तासभर प्रार्थना कराल. बायबल आपल्याला सांगतं - "न थांबता प्रार्थना करा." आपण असं करतो असं बहूतेक जण म्हणू शकणार नाही. पण प्रार्थनेच्या ह्या तासानंतर तुम्ही एक पाऊल पुढे असाल.

प्रार्थना चक्र - ZUME साधनसामग्रीतलं आणखी एक सोपं साधन.

क्रियाकलाप

(60 min)

प्रार्थना चक्र

QR कोड स्कॅन करा.

एक तास प्रार्थना चक्राचा उपयोग करून प्रार्थना करा

गटाला परत येण्यासाठी आणि पुन्हा जुडण्यासाठी वेळ निश्चित करा. शांत जागा शोधून प्रार्थना करण्यासाठी आणि परत गटामध्ये जाण्यासाठी प्रत्येकांना काही अतिरिक्त मिनिटे मिळावी हे सुनिश्चित करा.

१२ साध्या पायऱ्यांतून - प्रत्येक पायरीसाठी ५ मिनिटे देऊन - हे प्रार्थना चक्र आपण प्रार्थना कशी करावी हे ज्या केवळ १२ साध्या पायऱ्यांतून बायबल आपल्याला शिकविते त्यातून मार्ग दाखवून पुढे नेईल. हे संपता संपता, तुमची एक तासभर प्रार्थना करून झालेली असेल.

स्तुती: तुमचा प्रार्थनेचा तास प्रभूची स्तुती करून सुरु करा. अगदी ह्या क्षणी तुमच्या मनात घोळत असणाऱ्या गोष्टींसाठी त्याची स्तुती करा. गेल्या आठवड्यात त्याने तुमच्या जीवनात केलेल्या एका विशेष गोष्टीसाठी त्याची स्तुती करा. त्याने तुमच्या कुटुंबाप्रत दाखवलेल्या चांगुलपणाबद्दल त्याची स्तुती करा.

थांबून राहा: प्रभू उत्तर देईपर्यंत थांबून राहा. स्तब्ध राहा आणि तुम्ही मनन करावे म्हणून त्याने तुम्हाला विचार पुरविण्यासाठी त्याला वेळ द्या.

पाप कबुली करा: तुमच्या जीवनात पवित्र आत्म्याला नापसंत असलेले काहीही त्याने तुम्हाला दाखवावे अशी त्याला याचना करा. तुमच्या चुकीच्या मनोवृत्ती आणि तसेच ज्यांबद्दल तुम्ही अद्याप पाप कबुलीची प्रार्थना केली नाही ती विशिष्ट कृत्ये तुम्हाला दाखवावी असे त्याला विनवा. आता प्रभूपुढे ती कबुल करा यासाठी की तुम्ही शुद्ध व्हावे.

देवाचे वचन वाचा: स्तोत्रें, संदेष्टे आणि नव्या करारात दिलेले प्रार्थनेवरील उतारे वाचण्यात वेळ घालवा.

मग: आपणास्वतःसाठी विनंत्या करा.

रदबदली: दुसऱ्यांच्या वतीने विनंत्या करा.

वचन घेऊन प्रार्थना करा. विशिष्ट शास्त्रवचन घेऊन प्रार्थना करा. शास्त्रवचन घेऊन केलीली प्रार्थना तसेच अनेक स्तोत्रे या उद्देशासाठी योग्य आहेत.

आभार माना: तुमच्या जीवनातील गोष्टींसाठी, तुमच्या कुटुंबाच्या वतीने आणि तुमच्या चर्चच्या वतीने प्रभूचे आभार माना.

गाणी गा: स्तुती किंवा आराधनेची गाणी किंवा दुसरे गीत किंवा आत्मिक गाणे गा.

मनन करा: देवाने तुमच्याशी बोलावे अशी याचना करा. देव तुमच्या मनावर जे विचार बिंबवितो ते लिहून ठेवण्यासाठी पेन आणि कागद तयार ठेवा.

देवाची वाणी ऐका: तुम्ही वाचलेल्या गोष्टी, तुम्ही प्रार्थना केलेल्या गोष्टी, तुम्ही ज्या गाऊन म्हटल्या त्या गोष्टी ह्या सर्व एकत्र विलीन करण्याला वेळ द्या. प्रभू त्या सर्व तुमच्यापुढे आणून तुमच्याशी कसे बोलतो ते पहा.

स्तुती करा: प्रभूच्या सहवासात तुम्ही घालवलेला समय आणि त्याने तुमच्या मनावर बिंबविल्या विचारांसाठी त्याची स्तुती करा. त्याच्या गौरवशाली गुणविशेषांबद्दल त्याची प्रशंसा करा.

डिक ईस्टमन यांच्या द अवर दॅट चेंजेस द वर्ल्ड (C) २००२ मधील डिक ईस्टमन, चॉसेन बुक्स, ग्रँड रॅपिड्स, एमआय, परवानगीने वापरलेले पुस्तक.

चर्चा करा

(10 min)

  1. प्रार्थनेत एक तास घालवण्याबद्दल तुमची प्रतिक्रिया काय आहे?
  2. तुम्हाला कसे वाटत आहे?
  3. तुम्ही काही शिकलात किंवा ऐकले आहे का?
  4. तुम्ही अशा प्रकारच्या प्रार्थनेची नेहमीची सवय लावली तर जीवन कसे असेल?

READ

(5 min)

100 ची यादी

येशूने म्हटले - "जा व शिष्य करा...." व त्याच्या अनुयायांनी तसेच केले.

ते त्यांच्या परिवारात गेले. ते त्यांच्या मित्रमंडळीत गेले. ते शहरातल्या परिचयांकडे (परिचित असलेल्यांकडे) गेले. ते त्याच्या सहकर्मचाऱ्यांकडे गेले. ते गेले.

येशूने म्हटले - "जा" व ते गेले. व परमेश्र्वराचं कुटूंब वाढलं.

परमेश्वराने आपल्याल सहसंबंधी / नातीगोती दिलेलीच आहेत, आपण केवळ "जाऊन शिष्य करायचे आहेत." हे आपले परिवार, मित्रमंडळी, शेजारी, सहकर्मचारी, वर्गमित्र आहेत - आपण हयांना जन्मभर ओळखतो, व नुकतेच भेटलेलं लोकंसुद्धा.

परमेश्वराने आपल्या आयुष्यात / जीवनात अगोदरच ठेवलेल्या लोकांशी विश्वासू राहून आपण शिष्य बनविण्याचा सर्वात मोठा टप्पा पार करू शकतो. व हयाची सुरवात एका सोप्या पद्धतीने होऊ शकते ती म्हणजे यादी तयार करून.

शिष्य करण्याकरता शंभराची यादी तयार करणे हे ZUME साधनसामग्रीतले एक सोपे साधन आहे.

क्रियाकलाप

(30 min)

तुमची स्वतःची 100 ची यादी तयार करा

QR कोड स्कॅन करा किंवा कागदाचा तुकडा वापरा.

तुमच्या गटातील प्रत्येकाला पुढील 30 मिनिटे त्यांच्या स्वतःच्या नातेसंबंधांची यादी भरण्यासाठी द्या. तुम्ही लिहू शकता तेवढ्यांची नावे लिहा.

मग देवाशी त्यांच्या नातेसंबंधाची तुमची उत्तम समज चिन्हांकित करा: शिष्य, अविश्वासी किंवा अज्ञात.

तुमची संबंधित कारभारीपणाची यादी तयार करा: तुमच्या प्रभावाच्या वर्तुळात असलेल्या लोकांची नावे लिहा. प्रत्येक व्यक्ती शिष्य, अजून विश्वास न ठेवणारी किंवा अज्ञात आहे का ते चिन्हांकित करा.

गट म्हणून वेळ काढा जेणेकरून प्रत्येक जण स्वतःची यादी तयार करू शकेल. तुम्ही कागद किंवा तुमच्या प्रशिक्षण साहित्यामधील डिजिटल साधने वापरू शकता.

विहंगावलोकन (आढावा)

(1 min)

या सत्रात ऐकलेली संकल्पना:

या सत्रात ऐकलेली साधने:

  • ग्राहक विरुद्ध उत्पादक (निर्माते) जीवनशैली
  • प्रार्थनेत एक तास कसा घालवावा
  • संबंधित कारभारीपण (रिलेशनल स्टुअर्डशिप) - 100 ची यादी

NEXT STEP

आज्ञापालन

तुम्ही “अविश्वासू” किंवा “अज्ञात” म्हणून चिन्हांकित केलेल्या तुमच्या 100 च्या यादीतील पाच लोकांसाठी या आठवड्यात प्रार्थना करण्यासाठी समय घालवा. देवाच्या कहाणी (गोष्टी) साठी त्यांची अंतःकरणे तयार करण्यास देवाकडे प्रार्थना करा.

सामायिक करा

देवाला विचारा की तुम्ही कोणाबरोबर 100 ची यादी साधन सामायिक करावे अशी त्याची इच्छा आहे. तुम्ही जाण्यापूर्वी या व्यक्तीचे नाव गटाला सांगा आणि पुढील सत्रापूर्वी त्यांच्यापर्यंत पोहोंचा.

सत्र 3

चेक-इन

(1 min)

सर्व सहभागी आणि फॅसिलिटेटर चेक-इन करा.

Or six.zume.training/checkin and use code: 6543

प्रार्थना करा

(5 min)

प्रार्थना करा आणि देवाचे आभार माना शेवटच्या सत्रात तुम्ही ज्या प्रकारे त्याचा अनुभव घेतला त्यासाठी आणि त्याच्या पवित्र आत्म्याला तुमच्या वेळेचे एकत्रितपणे नेतृत्व करण्यास आमंत्रित करा.

मागे वळून पहा

(5 min)

प्रारंभ करण्यापूर्वी, मागे वळून पहाण्यासाठी थोडा वेळ काढा.

शेवटच्या सत्राच्या शेवटी, तुमच्या गटातील प्रत्येकाला तुम्ही शिकलेल्या गोष्टींचा सराव करण्याचे आव्हान दिले गेले होते.

या आठवड्यात आपल्या गटाने कसे केले हे पाहण्यासाठी काही क्षण घ्या.

विहंगावलोकन (आढावा)

(1 min)

या सत्रात, आपण ही संकल्पना ऐकू आणि त्यावर चर्चा करू:

आणि आम्ही ही साधने आमच्या टूलकिटमध्ये जोडू:

  • देवाच्या राज्याची अर्थव्यवस्था (द किंगडम इकॉनॉमी)
  • सुवार्ता आणि ती इतरांना कशी सांगावी
  • बाप्तिस्मा आणि तो कसा द्यावा

READ

(5 min)

अध्यात्मिक अर्थशास्त्र

Zume प्रशिक्षणात आपलं स्वागत असो. ह्या सत्रात, आपण परमेश्वराच्या अर्थशास्त्राविषयी चर्चा करणार आहोत. ह्या तुटक विश्वात, लोकांना काही बक्षीस मिळयाची तेव्हा भावना येते जेव्हा ते घेतात किंवा जेव्हा त्यांना काही मिळतं व इतरांपेक्षा त्यांच्याकडे अधिक असतं.

पवित्र शास्त्रात, परमेश्वर त्याच्या लोकांना सांगतो की - माझे विचार हे तुमचे नव्हेत व तुमचे मार्ग हे माझे मार्ग नव्हेत. परमेश्वर आपल्याला दाखवून देतो की त्याच्या राज्याच्या अर्थशास्त्रात आपल्याला मिळाल्याने लाभ होत नाही - तर दिल्याने होतो. परमेश्र्वर म्हणतो की - तुझे तारण करीन व तू इतरांकरता आशीर्वाद ठरशील. येशूने म्हटले - घेण्यापेक्षा / देणे बरे. आपण अगोदरच शिकलो की अध्यात्मिक श्वाच्छ्वासाचा पाया म्हणजे परमेश्वराने आपल्याला ज्या गोष्टींनी आशीर्वादीत केलं आहे ते इतरांना दिल्याने त्यांना देखील आशीर्वादीत करणे. आपण श्वास आत घेतो म्हणजेच देवाचं ऐकतो. आपण श्र्वास बाहेर सोडतो म्हणजेच ऐकलेल्या गोष्टीचं आपण पालन करतो व इतरांना सांगतो.

जेव्हा आपण आज्ञापालनास विश्वासू असतो व जे प्रभूने आपल्याला सांगितलं ते इतरांना सांगू अधिक सांगण्याचे वचन देतो. येशूने म्हटले - जो अगदी, अल्प गोष्टीविषयी विश्वासू असतो, तो पुष्कळविषयी देखिल विश्वासू ठरेल.

हाच मार्ग आहे खोल अंतर्ज्ञानाचा, जवळीक साधण्याचा व परमेश्वराने निर्माण केलेल्या भरपूर आयुष्य जगण्याचा. परमेश्वराच्या इच्छेनुसार सत्कृत्याच्या मार्गावर आपण वाटचाल करू शकू. आपल्याला जर परमेश्वराकडून सर्वात मोठं बक्षीस हवं असेल तर त्या आशीर्वादाकरता आपण त्याने सांगितलेल्या दोन गोष्टी करायलाच हव्यात.

आपण -

  • आपण आज्ञापालन करून इतरांना त्याविषयी सांगायला हवे.
  • तसे करून ते शिकवायला हवे.
  • त्याचा सराव ठेऊन ते पूढे चालू ठेवायला हवे

- ते सर्व जे परमेश्वर आपल्याला करायला सांगतो.

आणि जर इतरांना परमेश्वराचा तो सर्वात मोठा लाभ प्राप्त व्हावा असे तुम्हाला वाटत असेल तर तीच गोष्ट कशी करावी हे त्यांनादेखील दाखवायला हवं. शिष्य बनण्याचा व बनविण्याचा हा सर्वात मोठा भाग आहे.

  • आपण शिष्य आहोत पण पुढारी सुद्धा
  • आपण विद्यार्थी आहोत पण शिक्षकही
  • आपण आशीर्वादित आहोत व आशीर्वादही

परमेश्वराची अशी इच्छा नाही की आज्ञापालन करून इतरांना सांगण्याअगोदर आपल्याला सर्व काही ठाऊक असावं. असा दिवस कधीच येणार नाही. वाढत जाण्यापूर्वी आपण परिपक्व व्हावं अशी परमेश्वराची अपेक्षा नाही. आपण त्वरीत उन्नती करावी असं त्याला वाटतं.

जे माहिते त्याचं आज्ञापालन करावं व जे ऐकलं तेच इतरांना सांगावं असं त्याला वाटतं.

व तेच कसं करावं हे आपण इतरांना शिकवाव - शेवटी आज्ञापालन करणं व जे माहिते ते इतरांना सांगणं / हाच परिपक्वतेचा व उन्नतीच मार्ग आहे.

चर्चा करा

(10 min)

  1. देवाचे अध्यात्मिक अर्थशास्त्र आणि गोष्टी पूर्ण करण्याच्या आपल्या सांसारिक मार्गामध्ये तुम्ही काय फरक पाहता?

येशू म्हणाला, “परंतु पवित्र आत्मा तुमच्यावर येईल तेव्हा तुम्हांला सामर्थ्य प्राप्त होईल, आणि यरुशलेमेत, सर्व यहूदीयात, शोमरोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल.”

चर्चा करा

(10 min)

  1. जेव्हा तुम्ही देवाचा “साक्षीदार” होण्याची आणि त्याची कहाणी सांगण्याची त्याची आज्ञा ऐकता तेव्हा तुमच्या मनात काय येते?
  2. येशूने त्याची सुवार्ता सांगण्यासाठी इतर मार्गांऐवजी सामान्य लोकांची निवड का केली असे तुम्हाला वाटते?
  3. देवाची कहाणी सांगण्यास तुम्हाला अधिक सुलभ वाटावे यासाठी अजून काय आवश्यक आहे?

सुवार्ता

परमेश्वराची कहाणी (ज्याला सुवार्ता देखील म्हणतात) सांगण्याचा एकच “उत्तम मार्ग” नाही , कारण तुम्ही ती कोणाला सांगत आहात यावर उत्तम मार्ग अवलंबून असतो. प्रत्येक शिष्याने पवित्र शास्त्रातील वचनानुसार जी सत्य आहे आणि ज्या श्रोत्यांना ती सांगितली जात आहे त्यांच्याशी ती जुडते अशारितीने परमेश्वराची कहाणी सांगण्यास शिकले पाहिजे.

खालील दोन सादरीकरणांचे पुनरावलोकन करा आणि सराव करण्यासाठी एक निवडा.

READ

(5 min)

सादरीकरण १

Zume प्रशिक्षणात तुमचं पुन्हा एकदा स्वागत. या सत्रात, परमेश्वरांची कहाणी - ती सुर्वाता निर्मितीपासून न्यायापर्यंत व मानवजातीच्या प्रारंभापासून ते हया युगाच्या समाप्तीपर्यंत कशी सांगावी हे आपण शिकणार आहोत. परमेश्वराची कहाणी सांगण्याच्या अनेक पद्धती आहेत.

सर्वोत्तम पद्धत त्या व्यक्तिवर अवलंबून असते सांगता त्यांच्या मतावर त्यांच्या आयुष्यातील अनुभवांवर.

इतरांना सांगू इच्छीणाऱ्या हृदयांचा वापर परमेश्वर ऐकू इच्छीणाऱ्याकरता करतो.

हे त्याचं कार्य आहे व तसे करण्यास तो आपल्याला आमंत्रीत करतो.

परमेश्र्वराची कहाणी सांगण्याची एक पद्धत म्हणजे त्याच्या निर्मितीपासून या युगाच्या न्यायापर्यंत सगळं सांगणे (OR स्पष्ट करणे) अशा पद्धतीने सांगत असताना आपण ती मोठी किंवा छोटी, विस्तारीत किंवा ढोबळ रित्या सांगू शकतो पण ऐकणाऱ्याच्या संस्कृतीला जोडून असावी. विविध संस्कृतींना व जागतीक दृष्टीकोनातून सांगत असताना तुम्ही हातवाऱ्यांचा देखील उपयोग करु शकता जेणेकरून शिकायला व शिकवायला सोपं होईल.

ही सुर्वार्तची (शुभ वार्तेची) परमेश्र्वराची कथा आहे -

प्रारंभी परमेश्वराने संपूर्ण जग व त्यातले सगळे काही निर्माण केलं. त्याने पहिला पुरुष व पहिली स्त्री निर्माण केली. त्यांना एका संदूर बागेत ठेवलं. त्यांना त्याने आपल्या कुटूंबाचाच एक भाग केलं व त्यांच्यासोबत जवळचं नातं स्थापन केलं. त्यांनी सदैव जगाव म्हणून त्यांना घडवलं. मरण नावाची काहीच गोष्ट नव्हती. एवढ्या सर्वोत्तम जागी सुद्धा मनुष्याने परमेश्वराशी बंड केला व जगात पाप व यातना आणल्या. परमेश्वराने मनुष्याला त्या बागेतून काढलं. परमेश्वर व मनुष्यातला संबंध तुटला. आता मनुष्याचा सामना मरणाशी होणार होता.

कित्येक शंभर वर्षानुवर्ष परमेश्वर जगात त्याच्या संदेष्यांना पाठवत राहिला. ते मनुष्याला पापाची आठवण करून देत राहिले. देवाच्या विश्वासूपणाविषयी सांगत राहिले व जगात एक तारणहार पाठवण्याच्या वचनाबद्दलही.

पमेश्र्वराच व मनुष्यातलं जवळचं नातं तो तारणारा पुर्नःस्थापीत करेल. तो तारणाला मनुष्याला मरणापासून वाचवेल. तो तारणारा अनंत जीवन देईल व मनुष्यासोबत सदैव राहिल.

परमेश्वर आपल्यावर एवढं प्रेम करतो की योग्य वेळी त्याने आपल्या पुत्राला जगात तारणारा म्हणून पाठवलं. येशू हा परमेश्वराच्या पुत्र होता. तो कुमारीच्या पोटी जन्माला आला. त्याचं आयुष्य परिपूर्ण होतं. त्याने कधीच पाप केलं नाही.

येशूने लोकांना परमेश्वराबद्दल शिकवण दिली. त्याच्या सामर्थ्याने त्याने अनेक चमत्कार केले. त्याने भूतं काढली. त्याने लोकांना बरे केले. त्याने अंधांना दृष्टी दिली. त्याच्यामुळे बहिऱ्यांना ऐकू आले. त्याने लंगड्यांना चालविले. त्याने मृतांनादेखिल उठविले. अनेक धार्मिक पुढारी येशूला घाबरत व त्याचा मत्सर करत. त्यांना त्याचं मरण हवं होतं.

येशूने कधीच पाप न केल्याने त्याला मरण येणार नव्हतं. पण आपल्याकरता बळी जाण्याची निवड ज्याने केली. त्याच्या वेदनेपूर्ण मरणाने मानवाच्या पापाला झाकले. ह्यानंतर, येशूला कबरेत ठेवण्यात आलं. येशूचे बलिदान परमेश्वराने पाहिले व स्वीकारले. येशूला मरणातून तिसऱ्यादिवशी उठवून परमेश्वराने त्याची स्वीकृती दर्शविली.

परमेश्वराने म्हटले की आपल्या पापाकरता येशूच्या बलिदानावर विश्वास ठेऊन आपण स्वीकार केला -- पापापासून दूरावलो व येशूचे अनुयायी झालो तर परमेश्वर आपल्याला पापमुक्त करेल व त्याच्या कुटूंबात पुन्हा आपले स्वागत करतो.

आपल्यात वास करण्याकरता परमेश्वर पवित्र आत्म्याला पाठवतो व आपल्याला येशूचे अनुयायी होण्यास मदत करतो. हे पुनःस्र्थापित नातं दर्शविण्याकरता आपण पाण्याने बाप्तीस्मा घेतो. मरणाचं चिन्ह म्हणून आपण पाण्यात बुडतो व नव जीवनाचं चिन्ह म्हणून येशूच्या मागे वाटचाल करण्याकरता पुन्हा वर येतो. येशू मरणातून उठल्यानंतर तो ह्या भूतलावर चाळीस दिवस राहिला.

जगात सर्वत्र जाऊन सुवार्ता सांगायला. येशूनी आपल्या शिष्यांना शिकवलं. येशूने म्हटले जा व सर्व राष्ट्रातील लोकांना शिष्य करा, त्यांना पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तीस्मा दया. झे सर्व काही मी तुम्हाला आज्ञापिले ते त्यांना पाळायला शिकवा आणि मी युगाच्या समाप्तीपर्यंत मी सदोदित तुमच्यासोबत आहे.

येशूला त्यांच्या डोळ्यादेखत स्वर्गात उचलण्यात आले. ज्या प्रकारे तो गेला त्याच प्रकारे एके दिवशी येशू परतेल. ज्यांनी त्याच्यावर प्रीती न करता आज्ञाभंग केली त्यांना तो शिक्षा देईल. ज्यांनी प्रीति करून आज्ञापालन केले त्यांचा स्वीकार करून त्यांना मोबदला देण्यात येईल. नव्या स्वर्गात व नव्या पृथ्वीवर आपण त्याच्यासोबत सदैव वास करू.

माझ्या पापाकरता केलेल्या येशूच्या बलिदानावर माझा विश्वास आहे व त्याचा मी स्वीकार करते. त्याने मला साफ परमेश्वराच्या कुटूंबात पुर्नःस्थापीले. तो माझ्यावर प्रीती करतो मी त्याच्या सोबत त्याच्या राज्यात सदैव वास करीन.

परमेश्र्वर तुमच्यावर प्रेम करतो हे दान तुम्ही देखील ग्रहण करावं अशी त्याची इच्छा आहे. तुम्हाला ते त्वरीत करायचं आहे का?

READ

(5 min)

3-वर्तुळे

झुमे प्रशिक्षणात पुन्हा आपले स्वागत आहे.

या सत्रात, आपण "तीन मंडळे" नावाच्या साधनाचा वापर करून देवाची गोष्ट (कहाणी) - सुवार्ता - कशी सामायिक करायची ते शिकू.

देवाची गोष्ट सामायिक करण्याचे अनेक मार्ग आहेत.

सर्वोत्तम मार्ग तुम्ही ज्या व्यक्तीला ती सांगत आहात त्यावर आणि जगाबद्दलच्या त्यांच्या दृष्टिकोनावर व त्यांच्या जीवनातील अनुभवांवर अवलंबून असेल. देव ऐकण्यास इच्छुक असलेल्या हृदयांमध्ये कार्य करण्यासाठी सामायिक करण्यास इच्छुक हृदयांचा उपयोग करतो. हे त्याचे कार्य आहे. तो आपल्याला फक्त त्यात सामील होण्यासाठी आमंत्रित करतो.

देवाची गोष्ट सांगण्याचा एक मार्ग म्हणजे एक असे साधे रेखाचित्र सामायिक करणे आणि त्याचे वर्णन करणे ज्याला आपण तीन मंडळे म्हणतो.

आपण सर्वजण एका अतिशय भंग पावलेल्या जगात राहतो.

आपण दुःख, मृत्यू, युद्ध, रोग, व्यसनांच्या कथा पाहतो आणि ऐकतो. त्या सर्वत्र आहे. पण ही देवाची मूळ रचना नाही.

देवाची परिपूर्ण रचना प्रीती, आनंद, एकता आणि शांतीने भरलेली जग आहे.

बायबल ज्याला "पाप" म्हणून संबोधते त्याद्वारेच आपण स्वतःला देवाच्या परिपूर्ण रचनेतून बाहेर काढले आणि भग्नावस्थेत आलो.

पाप म्हणजे देवाच्या मार्गापासून दूर जाणे आणि स्वतःच्या मार्गाचे अनुसरण करणे होय. पाप आपल्याला देवापासून वेगळे करते. पाप आपल्याला भग्नावस्थेत टाकते. पाप आपल्याला अध्यात्मिक मृत्यूकडे घेऊन जाते.

लोक भग्नावस्थेतून बाहेर पडू इच्छितात. आपण बाहेर पडण्यासाठी सर्व प्रकारच्या वेगवेगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो. आपल्यापैकी काहीजण ड्रग्ज घेऊन आणि दारू पिऊन प्रयत्न करतात. आपल्यापैकी काही चांगल्या नोकरीद्वारे किंवा भरपूर पैसे कमवून यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतात. आपल्यापैकी काहींना वाटते की एखादा नातेसंबंध त्यांना यातून बाहेर काढेल. काही जण धर्माचाही प्रयत्न करतात - आपल्याला वाटते की चांगले वर्तन किंवा इतरांना मदत केल्याने आपल्याला मुक्तता मिळेल.

यापैकी कोणतीही गोष्टी कधीही भग्नावस्थेची समस्या सोडवत नाहीत. जरी आपल्याला असे वाटते की आपण क्षणभर दूर झाले आहोत ... तरी आपण जिथे सुरुवात केली तिथेच परत येतो. येथे एक कठीण सत्य आहे. जर आपण अजूनही तिथेच आहोत - अजूनही भग्नावस्थेत आहोत - तर जेव्हा हे जीवन संपेल, बायबल सांगते की तेव्हा आपण देवापासून कायमचे वेगळे झालेले असू. सदासाठी.

बायबल त्या जागेला "नरक" म्हणून संबोधते.

पण आपण भग्नावस्थेत राहावे अशी देवाची इच्छा नाही.

बायबल सांगते कि -- देवाने आपल्यावर एवढी मोठी प्रीती केली की त्याने आपल्या एकुलत्या एक पुत्राला आपल्यासाठी मार्ग काढण्यास पाठवले. येशू आपले पाप पुसून टाकण्यासाठी आणि भग्नावस्थेतून आपल्याला बाहेर काढण्यासाठी पृथ्वीवर आला.

म्हणून देवाचा पुत्र येशू, त्याने आपल्या मृत्यूने आपले पाप रद्द केले.

येशूचा मृत्यू आणि त्याला गाढल्याच्या तीन दिवसानंतर, तो मेलेल्यांतून उठला. त्याच्या महान बलिदानामुळे, देवाने येशूला स्वर्गातील आणि पृथ्वीवरील सर्व गोष्टींचा राजा बनवले.

राजा येशूने आपल्यासाठी भग्नावस्थेतून बाहेर पडण्याचा मार्ग तयार केला. देवाने म्हटले की जर...

... आपण आपल्या पापापासून मागे फिरतो ...

...आणि विश्वास ठेवतो की येशू आपल्यासाठी मरण पावला...

...आणि पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा घेतो...

तर मग देव आपल्याला - येशूप्रमाणेच - देवाच्या कुटुंबाचा भाग म्हणून एका नवीन प्रकारचे जीवन जगण्यास - सदासाठी उठवतो.

मग आपण भंग पावलेल्या जगात या नवीन जीवनाचे एक उदाहरण बनवतो, आणि येशूच्या परत येण्याची वाट पाहतो जेव्हा तो एक नवीन स्वर्ग आणि नवीन पृथ्वी बनवेल जिथे आपण त्याच्यासोबत परिपूर्ण संपूर्णतेत सदासाठी राहू शकू.

देवाची इच्छा आहे कि आपण त्याच्या सोबत असलेल्या आपल्या नातेसंबंधात वाढावे. देव आपल्याला त्याच्या मूळ परिपूर्ण रचनेत परत आणू इच्छितो.

देवाच्या कुटुंबाचा भाग म्हणून, येशू आपल्याला एक मिशन देतो - जगण्याचे कारण - आणि सर्वोत्तम जीवन जगण्याचा मार्ग.

आपल्यासाठी येशूचे मिशन आहे - जा.

येशू आपल्याला - जसे त्याच्या पित्याने त्याला पाठवले होते - तसेच इतरांना मुक्त होण्यास आणि देवाच्या अनंत कुटुंबाचा भाग बनण्यास मदत करण्यासाठी पुन्हा भंग पावलेल्या स्थितीत पाठवतो.

या तीन मंडळांच्या जगात, फक्त दोन प्रकारचे लोक आहेत -

असे लोक ... जे देवाच्या परिपूर्ण रचनेचा एक भाग असून देवाच्या बचाव मोहिमेत (मिशनमध्ये) जगत आहेत ... देवाला त्याच्या अनंत कुटुंबाशी पुन्हा जोडण्यास मदत करत असताना.

किंवा ...

असे लोक... जे अजूनही भंग पावलेल्या अवस्थेत आहेत... सुटका मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत... कोणीतरी त्यांना वाचवेल अशी आशा ठेवत असताना.

  • तुम्हाला माहिती आहे का तुम्ही आता कुठे आहात?
  • तुम्हाला माहिती आहे का तुम्ही कुठे असावे अशी तुमची इच्छा आहे?

देवाची गोष्ट (कहाणी) सांगण्याचे अनेक मार्ग आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे सांगणे आहे. देव ऐकण्यास इच्छुक असलेल्या हृदयांमध्ये कार्य करण्यासाठी सामायिक करण्यास इच्छुक हृदयांचा उपयोग करतो. हे त्याचे कार्य आहे. तो आपल्याला फक्त त्यात सामील होण्यासाठी आमंत्रित करतो.

क्रियाकलाप

(45 min)

सुवार्ता सांगा

QR कोड स्कॅन करा.

तुम्ही पाहिलेल्या दोन सादरीकरणांपैकी एक निवडा.

दोन किंवा तीन लोकांच्या गटात विभाजित व्हा.

एक-एक करून एकमेकांना सुवार्ता सांगा.

देवाची गोष्ट: उत्पत्ती ते न्यायाची शैली पर्यंत

त्याने पहिला पुरुष आणि पहिली स्त्री निर्माण केली.

देवाने त्यांना एका सुंदर बागेत ठेवले. त्याने त्यांना त्याच्या कुटुंबाचा एक भाग बनवले आणि त्यांच्याशी गाढ नातेसंबंध ठेवले.

सदा सर्वकाळ जिवंत राहण्यासाठी त्याने त्यांना उत्पन्न केले. मरण/मृत्यू असे काहीही तेव्हा नव्हते. "अशा ह्या परिपूर्ण ठिकाणी देखील, मनुष्याने देवाविरुद्ध बंड केले आणि ह्या जगात पाप आणि वेदना/दुःखे आणलीत. देवाने मनुष्याला बागेतून बाहेर काढून टाकले. मानव आणि देव ह्यांमधील नातेसंबंध तुटले. तेव्हापासून आता मनुष्याला मरण आले. त्यानंतर अनेक शतकांच्या काळात, देव जगात त्याचे संदेष्टे पाठवीत राहिला. त्यांनी मानवाला पुन्हा पुन्हा त्याच्या पापाची जाणीव करून दिली पण त्यांना हे देखील सांगितले की देव विश्वासू आहे आणि त्याने जगात एक तारणारा पाठवण्याचे वचन दिले आहे.

तो तारणारा, देव आणि मनुष्य ह्यामधील नातेसंबंध पुन्हा पूर्ववत करील. तो तारणारा मानवाची मरणापासून सुटका करील. तो तारणारा मानवाला सार्वकालिक जीवन देईल आणि अनंत काळासाठी त्यांच्या बरोबर राहील. "देव आपल्यावर एवढी मोठी प्रीती करतो की योग्य वेळ आल्यानंतर त्याने त्याच्या पुत्राला तो तारणारा होण्यासाठी ह्या जगात पाठवले.

"येशू देवाचा पुत्र होता. एका कुमारिकेद्वारे ह्या जगात त्याचा जन्म झाला. तो परिपूर्णपणे निष्पाप जीवन जगला. त्याने कधीही पाप केले नाही. येशूने लोकांना देवाविषयी शिक्षण दिले. त्याने त्याचे महान सामर्थ्य दाखवणारे पुष्कळ चमत्कार केले. त्याने पुष्कळ भूतें/दुष्टात्मे काढून टाकले. त्याने पुष्कळ लोकांना रोगमुक्त केले. त्याने अंधांना दृष्टी दिली. त्याने बहिऱ्यांना श्रवणक्षमता दिली. त्याने पुष्कळ लंगडे/पंगू लोकांना बरे केले आणि ते चालू लागले. येशूने मृत लोकांना देखील पुनर्जीवित केले. "पुष्कळ धार्मिक पुढाऱ्यांना येशूची धास्ती वाटू लागली आणि त्याचा मत्सर देखील वाटू लागला.

तो ठार मारला जावा ही त्यांची इच्छा होती. येशूने कधीही पाप केले नव्हते म्हणून त्याला मृत्युदंड होऊ शकत नव्हता.

पण आपण सर्वांसाठी प्रायश्चित-यद्न्य म्हणून त्याने मरणे स्वीकारले. त्याच्या अत्यंत क्लेषपूर्ण मरणाने मानवजातीच्या पापांची भरपाई केली. त्यानंतर, येशूला एका कबरेत पुरण्यात आले. "येशूने केलेला प्रायश्चित-यद्न्य देवाने पाहिला आणि तो स्वीकारला. मरणानंतर तिसऱ्या दिवशी येशूला जिवंत करून पुन्हा उठवण्याद्वारे देवाने ही स्वीकृती दाखवून दिली.

देवाने म्हटले आहे की जर आपण आपल्या पापांसाठी येशूच्या बलिदानावर विश्वास ठेवला आणि त्याचा स्वीकार केला - जर आपण आपल्या पापांपासून मागे वळतो आणि येशूचे अनुसरण करतो, तर देव आपल्याला सर्व पापांपासून शुद्ध करतो आणि आपले त्याच्या कुटुंबात परत स्वागत करतो.

देवाने आपल्या आत राहण्यासाठी आणि आपल्याला येशूचे अनुसरण करण्यास सक्षम करण्यासाठी पवित्र आत्मा पाठवला आहे. हे पुन्हास्थापित नाते दर्शविण्यासाठी आणि त्यावर शिक्कामोर्तब करण्यासाठी आपल्याला पाण्यात बाप्तिस्मा दिला जातो.

मृत्यूचे प्रतीक म्हणून आपल्याला पाण्याखाली बुडविले जाते. नवीन जीवनाचे प्रतीक म्हणून आपल्याला येशूचे अनुसरण करण्यासाठी पाण्यातून वर उठविले जाते.

"मरणातून पुन्हा जिवंत होऊन उठल्यानंतर, येशू ह्या पृथ्वीवर ४० दिवस वावरला.

येशूने त्याच्या अनुयायांना जगातील सर्व भागात जाऊन त्याने तयार केलेल्या तारणाची सुवार्ता सांगण्याची शिकवण दिली. "येशूने म्हटले - जा आणि सर्व राष्ट्राच्या लोकांना शिष्य बनवा, त्यांना पित्याच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या; आणि जे काहीं मी तुम्हाला आज्ञापिले ते सर्व पाळावयास त्यांना शिकवा. युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्वदा तुमच्याबरोबर आहे.

मग त्यांच्या डोळ्यांदेखत येशूला वर घेतल्या गेले. "एके दिवशी, ज्या रीतीने येशू वर गेला होता तसाच तो पुन्हा येईल. ज्यांनी त्याच्यावर प्रीती करून त्याच्या आज्ञा पाळल्या नाहीत त्यांना तो सार्वकालिक शिक्षा देईल. ज्यांनीं त्याच्यावर प्रीती केली आणि त्याच्या आज्ञा पाळल्या त्यांना तो स्वीकारील आणि सार्वकालिक जीवन प्रदान करील. नवीन स्वर्गात आणि एका नवीन पृथ्वीवर आपण त्याच्याबरोबर सदा सर्वकाळ राहू.

"माझ्या पापांसाठी येशूने केलेल्या प्रायश्चित-यज्ञावर मी विश्वास ठेवला आणि तो ग्रहण केला. त्याने मला स्वच्छ/शुद्ध केले आणि मला देवाच्या कुटुंबात पुन्हा आणून वसवले. तो माझ्यावर प्रीती करतो आणि मी त्याच्यावर प्रीती करतो आणि मी त्याच्या राज्यात त्याच्याबरोबर सर्वकाळ राहीन. "देव तुम्हावर प्रीती करतो आणि तुम्ही देखील ही ईश्वरी देणगी स्वीकारावी अशी त्याची इच्छा आहे. तुम्ही आत्ता ह्या क्षणी तो स्वीकार कराल का?

तुम्हाला गोष्ट सांगण्यास सोयीस्कर वाटेपर्यंत सुवार्तेच्या या सादरीकरणाचा स्वतः अभ्यास करत रहा.

READ

(5 min)

बाप्तिस्मा

येशूने म्हटले - "सर्व राष्ट्रात शिष्य करा व त्या पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तीस्मा दया..." बाप्तीस्मा - किंवा मूळ भाषेत बाप्तीझो म्हणजे संपूर्णपणे भिजणे किंवा बुडणे उदाः जेव्हा एखादया कापडाला रंग देताना ते कापड तो रंग शोशून घेतो व नवं बनून परिवर्तित होतं.

बाप्तीस्मा हे आपल्या नव्या जीवनाचं चित्र आहे, जे येशूच्या प्रतिमेत बुडलं आहे, देवाच्या आज्ञापालनाने परिवर्तित झाले आहे. हे आपल्या पापाचा मृत्यू ह्याचं चित्र आहे, जसं येशू आपल्या पापाकरता मरण पावला; जसं आपल्या जुन्या आयुष्याला पुरलं गेलं, जसं येशूला पुरलं; ख्रिस्तात नव्यजीवनाविषयी, जसं येशू पुनःरूथ्थित होऊन आजही जीवीत आहे.

तुम्ही जर पूर्वी कोणाला बाप्तीस्मा दिला नसेल, तर हे दडपण येणारं ठरू शकतं, पण ह्याची गरज नाही. हे अगदी सोपं आहे. थोडं खोल असं पाणी शोधा, नवशिष्य त्यात बुडेल इतकं. मग हे तळं, नदी, किंवा समूद्रदेखिल असू शकतो. हा बाथटब किंवा असच काही पण असू शकत.

तुम्ही तुमच्या एका हाताने त्या शिष्याचा हात धरा व दुसऱ्या हाताने त्याच्या पाठीला आधार द्या.

तुम्ही त्यांना असे दोन प्रश्न विचारा, जेणेकरून त्यांना त्याच्या निर्णयांची समज येते.

  • "तुम्ही येशू ख्रिस्ताला तुमचा प्रभू व तारणारा म्हणून स्वीकारता का?"
  • "तुमचा राजा म्हणून तुम्ही त्याचे आज्ञापालन करून त्याची सेवा कराल का?"

या दोन्ही प्रश्नं त्यांचा "होकार" असल्यास असं म्हणाः

  • "येश ख्रिस्तावरचा विश्वास तुम्ही जाहिर केल्यामुळे मी तुमचा पिता, पुत्र व पवित्र आत्म्याच्या नावात बाप्तीस्मा करतो."

त्यांना पाण्यात संपूर्णपणे बुडून पुन्हा वर येण्यास सहाय्य करा.

तुम्ही बाप्तीस्मा दिला आहे येशूच्या नव्या शिष्याला - स्वर्गातील नव्या नागरीकाला - जीवीत परमेश्वराच्या नव्या बालकाला. साजरा करण्याची वेळ आहे!

बाप्तीस्मा - येशूने प्रथम आपल्या शिष्यांना दिला व ZUME साधनसामग्री चा पाया.

चर्चा करा

(10 min)

  1. तुम्ही कधी कोणाचा बाप्तिस्मा केला आहे का?
  2. आपण याचा विचार कराल का?
  3. जर महान आदेश येशूच्या प्रत्येक अनुयायांसाठी आहे तर याचा अर्थ असा आहे की प्रत्येक अनुयायांना इतरांना बाप्तिस्मा देण्याची परवानगी आहे? का किंवा का नाही?

महत्त्वपूर्ण स्मरणपत्र - तुमचा बाप्तिस्मा झाला आहे का?

तसे नसल्यास, आम्ही तुम्हाला या प्रशिक्षणातील आणखी एका सत्रापूर्वीच ह्याचे नियोजन करण्यास प्रोत्साहित करितो. जेव्हा तुम्ही येशूला “होय” म्हणत उत्सव साजरा करिता तेव्हा तुमच्या गटाला या महत्त्वपूर्ण दिवसाचा भाग होण्यासाठी आमंत्रित करा.

विहंगावलोकन (आढावा)

(1 min)

या सत्रात ऐकलेली संकल्पना:

या सत्रात ऐकलेली साधने:

  • देवाच्या राज्याची अर्थव्यवस्था (द किंगडम इकॉनॉमी)
  • सुवार्ता आणि ती इतरांना कशी सांगावी
  • बाप्तिस्मा आणि तो कसा द्यावा

NEXT STEP

आज्ञापालन

उत्पत्तीपासून न्यायपर्यंतच्या कहाणीचा (किंवा देवाची कहाणी सांगण्याचा कोणताही अन्य मार्ग) वापर करण्यासाठी तुम्ही कोणाला प्रशिक्षण द्यावे अशी त्याची इच्छा आहे असे देवाला विचारा. तुम्ही जाण्यापूर्वी या व्यक्तीचे नाव गटाला सांगा.

सामायिक करा

या आठवड्यात देवाच्या कहाणीचा (गोष्टीचा) सराव करण्यात वेळ घालवा, आणि नंतर तुमच्या 100 च्या यादीतून तुम्ही “अविश्वासू” किंवा “अज्ञात” म्हणून चिन्हांकित केलेल्या किमान एका व्यक्तीला ती सांगा.

महत्त्वपूर्ण स्मरणपत्र - तुमचा गट पुढच्या सत्रामध्ये प्रभू भोजन घेणार आहे. गरजेच्या वस्तूंचा पुरवठा (ब्रेड आणि वाइन / रस) लक्षात ठेवण्याची खात्री करा.

सत्र 4

चेक-इन

(1 min)

सर्व सहभागी आणि फॅसिलिटेटर चेक-इन करा.

Or six.zume.training/checkin and use code: 8764

प्रार्थना करा

(5 min)

प्रार्थना करा आणि देवाचे आभार माना की त्याने त्याची सुवार्ता इतरांना सांगण्यासाठी आपल्याला आमंत्रित केले आहे.

त्याला तुमच्या गटातील प्रत्येक सदस्याला ख्रिस्ताचे मन देण्यास - आणि प्रत्येकाला त्याच्या आत्म्याने भरण्यास सांगा.

मागे वळून पहा

(5 min)

प्रारंभ करण्यापूर्वी, मागे वळून पहाण्यासाठी थोडा वेळ काढा.

शेवटच्या सत्राच्या शेवटी, तुमच्या गटातील प्रत्येकाला तुम्ही शिकलेल्या गोष्टींचा सराव करण्याचे आव्हान दिले गेले होते.

या आठवड्यात आपल्या गटाने कसे केले हे पाहण्यासाठी काही क्षण घ्या.

विहंगावलोकन (आढावा)

(1 min)

या सत्रात, आपण या संकल्पना ऐकू आणि त्यावर चर्चा करू:

आणि आम्ही ही साधने आमच्या टूलकिटमध्ये जोडू:

  • दूरदृष्टी / दर्शन (व्हिजन) सर्वात मोठ्या आशीर्वादावर दृष्टिक्षेप टाकताना
  • बदकाच्या पिल्लू सारिखे शिष्यत्व - त्वरित पुढाकार करिताना
  • डोळे हे पहाण्यासाठी कि देवाचे राज्य कोठे नाही आहे
  • तुमची ३-मिनिटांची साक्ष तयार करा
  • प्रभू भोजन आणि त्याचे नेतृत्व कसे करावे

READ

(5 min)

3-मिनिटांची साक्ष

येशूने आपल्या शिष्यास सांगितले - "ह्या गोष्टींचे तुम्ही साक्षी आहात." येशूचे शिष्य ह्या नात्याने तुम्ही सुद्धा "साक्षी" आहात येशूचा तुमच्या जीवनावर ऐणाऱ्या प्रभावाची "साक्ष देण्याकरता." परमेश्वरासोबत तुमच्या असलेल्या संबंधाची कहाणी हीच तुमची साक्ष आहे. सर्वांचीच एक कहाणी असते. तुमच्या कहाणीचा सराव करण्याची ही संधी.

आहे सरावाकरता एक दोन अनुयायांची निवड करा आणि नंतर तुमच्या शंभराच्या यादीतून पाच नावं निवडा. अविश्वासू किंवा अध्यात्मीक स्थर अजाण असलेल्यांची निवड करायला विसरू नका. येशूच्या कथेचा तुमच्या कहाणीद्वारे - त्या साक्षेचा सराव होऊ द्या - ते ही त्या पार्टनर सोबत जो स्वतःला त्या यादीतल्या पाचापैकी एक मानेल. त्या पाचही लोकांना ती स्वतःशी जोडता येईल अशा पद्धतीने सांगण्याचा सराव करत रहा. तुमची कहाणी तुम्ही तीन मिनिटाच्या थोडक्या काळात संपवायला हवी.

कहाणी सांगण्याच्या शेकडो तर्हा आहेत पण काही तर्हा अधिक प्रभावी ठरतात हे आम्ही अनुभवलं आहे. तुम्ही येशूचे अनुयायी बनण्याचा निर्णय का घेतला ह्याविषयी एखादद्यादुसऱ्या वाक्यात व्यक्त करा. हे एक नव विश्वासणाऱ्याला अधिक प्रभावी ठरतं. "पूर्वी" तुमचं जीवन कसं होतं अन् "आता" कसं आहे ते ही येशूला ओळखायच्या अगोदर व नंतर या विषयी साध्या परंतू प्रभावीपणे सांगा.

"येशू विना" तुमचं आयुष्य कसं होतं व "त्या सोबत" कसं आहे हे ही तुम्ही सांगू शकता. हे अधिक प्रभावी ठरतं जर तुमच्या तारूण्यापासून येशूवर विश्वास असेल.

तुमचं सांगून झाल्यावर तुमच्या पार्टनरला सराव होण्याकरता त्याला सांगू दया. तुमच्या दोघांचे ते पाच लोकं पूर्ण होईपर्यंत ते पुन्हा पुन्हा करत रहा. तुम्हाला सर्वात मोठा प्रभाव पाडायचा आहे का?

तुमची कहाणी सांगत असताना, ही तीन पदरी पद्धत, (असायला वाटयला हरकत नाही) आणि (आहे अशाने अधिक फायदेशीर ठरते.):

  • त्यांची कहाणी त्यांच्या अध्यात्मीक प्रवासाविषयी व्यक्तिला विचारा.
  • तुमची कहाणी - त्यांच्या अनुभावाशी निगडीत तुम्ही तुमची साक्ष सांगा.
  • देवाची कहाणी त्यांच्या जगाच्या असणाऱ्या मातांशी, मोलांशी व प्राधान्यांशी संबंध जोडेल अशा रितिने परमेश्वराची कहाणी सांगा.

अन् सुरवात कशी करावी हे कळत नसेल तर ते साधं सोपं ठेवा.

येशूचे शिष्य बनण्याचा निर्णय तुम्ही का घेतला ह्याविषयी एका वाक्यात सांगा. इतरांचे आयुष्य परिवर्तीत करण्याकरता परमेश्वर तुमच्या कहाणीचा वापर करू शकतो, पण लक्षात ठेवा ही केवळ तुम्हीच सांगू शकता.

तुमची तीन मिनिटाची साक्ष, ZUME साधनसामग्रीतले आणखीएक सोपं साधन.

क्रियाकलाप

(30 min)

तीन-मिनिटांची साक्ष

QR कोड स्कॅन करा.

तुमची कहाणी (गोष्ट) लिहून ती फक्त तीन मिनिटांपर्यंत ठेवण्याचा अभ्यास करा. (10 मि)

दोन किंवा तीनच्या गटात विभाजित व्हा आणि इतरांना ती सांगण्याचा सराव करा. (20 मिनिटे)

तीन मूलभूत प्रकारची साक्ष

आपली गोष्ट सांगायचे अनंत मार्ग आहेत, पण त्यातूनही जे मार्ग चांगले यशस्वी ठरले ते येथे देत आहोत:

  • एक साधे विधान - तुम्ही येशूला अनुसरणे का पत्करले ते सांगणारे एक साधे विधान तुम्ही करू शकता. अगदी नवीन विश्वासणाऱ्यासाठी हे उपयुक्त ठरते.
  • पूर्वी आणि नंतर - तुम्ही आपली "पूर्वी" आणि "नंतर" अशी गोष्ट सांगू शकता - येशूकडे येण्यापूर्वी तुमचे जीवन कसे होते आणि आता तुमचे जीवन कसे आहे. साधे आणि शक्तिशाली.
  • सह आणि शिवाय - तुम्ही आपली "सह" आणि "शिवाय" गोष्ट सांगू शकता - येशूसह तुमचे जीवन कसे आहे आणि त्याच्याशिवाय ते कसे राहिले असते. तुम्ही विश्वासात जर लहान/तरुण/कोवळ्या वयात आला असाल तर तुमच्या गोष्टीचे असे रूप किंवा आवृत्ती चांगले कार्य करते.

तुमची साक्ष देण्याचे तीन भाग

तुमची साक्ष सांगतांना, ती एक तीन भागांची प्रक्रिया आहे असे समजणे फायदेशीर ठरते:

  • त्यांची गोष्ट - तुम्ही ज्या व्यक्तीशी बोलत आहात तिला तिच्या आत्मिक प्रवासाबाबत विचारा.
  • तुमची गोष्ट - मग, त्यांच्या अनुभवाशी जुळती ठेवून तुम्ही तुमची गोष्ट सांगा.
  • देवाची गोष्ट - शेवटी, त्यांचा एकूण दृष्टिकोन, मूल्यें आणि अग्रक्रमांशी सांगड घालेल अशा रीतीने तुम्ही त्यांना देवाची गोष्ट सांगा.

तुमच्या साक्षीचा चांगला परिणाम होण्यासाठी, ती फार लांबलचक किंवा खूप तपशील देणारी असण्याची गरज नाही. खरे म्हणजे, तुमची साक्ष ३ मिनिटांत आवरली तर प्रश्न विचारण्यासाठी आणि अधिक सखोल संभाषणासाठी समय उपलब्ध करील. सुरुवात कशी करावी ह्याचा तुम्हाला प्रश्न पडला असेल - साक्ष एकदम साधी सुधी अशी ठेवा. जीवने बदलण्यासाठी देव तुमच्या गोष्टीचा उपयोग करू शकतो, पण हे लक्षात असू द्या की - ती गोष्ट सांगायची संधी केवळ तुम्हालाच आहे.

READ

(5 min)

मोठा, खूप मोठा, आणि सर्वात मोठा आशीर्वाद

Zume प्रशिक्षणात आपलं स्वागत. या सत्रात आपण बोलणार आहोत OR परमेश्र्वराच्या मोठ्या, खूप मोठ्या, सर्वात मोठ्या आशीर्वादाविषयी व आपण इतरांना कसं सांगू शकतो. जेव्हा कोण येशूचं शिष्य व्हायला ठरवतं तेव्हा तुम्ही योग्य मार्गावर चालण्याकरता त्यांची मदत कशी करू शकाल? परमेश्वर देऊ इच्छीणारे सर्व आशीर्वाद ग्रहण करण्यास तुम्ही त्यांनी मदत कशी कराल? परमेश्वर देऊ इच्छीणारे सर्व आशीर्वाद ग्रहण करण्यास तुम्ही त्यांची मदत कशी कराल?

मी त्यांना असं सांगून सूरवात करतो...

  • येशूचे शिष्य होणे हाच एक आशीर्वाद आहे.
  • इतरांना येशूचे शिष्य होण्याचा मार्ग दाखवणे त्याहूनही मोठा आशीर्वाद आहे.
  • नवीन अध्यात्मीक कुटूंब सुरू करण्यात एक मोठा आशीर्वाद आहे.
  • इतरांना नवीन अध्यात्मीक परिवार सुरू करता येण्याकरता मदत करणं हा सर्वात मोठा आशीर्वाद आहे.

तुम्ही येशूचे अनुयायी व्हायचे ठरवले आणि म्हणून परमेश्वराने तुम्हाला आशीर्वादीत केलं आहे. माझी इच्छा आहे की तुम्हाला परमेश्वराचा मोठा आशीर्वाद / खूप मोठा / व सर्वात मोठा आशीर्वाद मिळावा. कसं ते सांगू का?

जर त्यांना अधिक माहिती हवी तर मी त्यांच्या परिचयाची १०० नावं लिहायला सांगतो. मग त्या यादीतून त्यांना ५ अशी नाव लिहायला सांगते जे येशूला ओळखत नाही - त्यांना ते त्वरीत येशूविषयी सांगू इच्छीतात.

येशूचे अनुयायी बनन्यात आशीर्वाद आहे. तुम्हाला हे आशीर्वाद आणखी कोणाला सांगायचे आहेत?

त्यांची साक्ष इतरांना सांगायला मी त्यांना शिकवतो - त्यांच्या आयुष्यात परमेश्वर काय करत आहे ह्याची गोष्ट. मी त्यांना सुवार्ता सांगायला शिकवतो - परमेश्वर जगात काय करत आहे ह्याची गोष्ट मी त्यांना परमेश्वराच्या मोठ्या, खूप मोठ्या व सर्वात मोठ्या आशीर्वादाविषयी शिकवतो.

हयातली प्रत्येक गोष्ट मी त्या यादीतल्या पाचही लोकांसोबत करण्यास सांगतो. सर्वप्रथम त्यांची गोष्ट. मग परमेश्वराची गोष्ट, मग परमेश्वराचे आशीर्वाद. प्रत्येक वेळी, मी त्या पाचापैकी स्वतःला एक असल्याचं मानतो. प्रत्येक वेळी, ते आपली (त्यांची) गोष्ट सांगतात. ते परमेश्वराची गोष्ट सांगतात. ते येशूचा शिष्य होण्याचं आमंत्रण देतात. ते परमेश्वराच्या मोठ्या, खूप मोठ्या व सर्वात मोठ्या आशीर्वादाविषयी शिकवतात. प्रत्येक वेळी, मी असे काही प्रश्न विचारतो किंवा टिप्पण्या करते जे बहूदा ते सुद्धा करतील. थोडा सराव झाल्यावर मी त्यांना त्या व्यक्तिंना पुन्हा भेटायला सांगतो - शक्यतो दोन दिवसात - केवळ हे कसं चाललं आहे हे पाहण्याकरता.

त्या यादीतून पाचीही व्यक्तिंना भेटायला मी त्यांना भरपूर वेळ देतो पण इतकाही नाही की ते विसरून जातील.

मी संपर्क साधण्याकरता नेहमी फोन नंबर. ईमेल किंवा इतर काही विचारतो. मला सांगत असताना परमेश्वराने त्यांना योग्य शब्द दयावे अशीच प्रार्थना मी करतो.

दोन दिवसांनी आम्ही पुन्हा भेटतो व इतरांची देवाणघेवाण कशी चालली आहे याची चौकशी करतो.

त्यांनी जर सांगीतलं नसेल, तर त्यांना मी अधिक सवय होण्याची संधी देतो. नाहीतर त्या पाचापैकी एका व्यक्तिकडे मी त्यांच्यासोबत जाऊ शकतो. इतरांना सांगता यावं म्हणून मी नेहमीच प्रयत्नशील असतो. पण मी कशाही नवीन गोष्टीविषयी त्यांना सांगणार नाही. जे शिकलो त्याच्याशी निष्ठावान राहण्याची पूर्ण संधी मी त्यांना देतो.

ते जर नकार देतात किंवा निमित्त करतात तर फळद्रूप होण्याकरता ही "उत्तम माती" आहे का असा प्रश्न मी परमेश्र्वराला करते नाहीतर मी इतर कोणात गुंतवणूक करायला हवी असं ही विचारते.

त्यांनी जर इतरांना सांगितलं असेल - तर आम्ही ते साजरं करतो!

त्यांच्या यादीतल्या कोणीच विश्वास ठेवला नाही तर मला ह्या गोष्टीचा आनंद वाटतो की त्यांनी ऐकलं, त्याचं पालन केलं व इतरांना सांगितलं. त्यालाच विश्वासू होणं म्हणतात.

ते थोडक्यात विश्वासू होते म्हणून मला त्यांना अधिक सांगण्यास आनंद होतो. मी त्यांना बाप्तीस्म्याविषयी सांगतो व त्यांना आणखी एक साधन देतो. याप्रकारेकिंवा त्याप्रकारे संधी देतो.

मग त्या शंभरातल्या यादीतून आणखी लोक निवडायला सांगतो - जे येशूला ओळखत नाही किंवा त्याचे शिष्य नाहीत. मी त्यांना त्याचीदेखील सवय करवतो - पूर्वीसारखं - अगोदर त्यांची कहाणी, मग परमेश्वराची आणि परमेश्वराचे आशीर्वाद. आणि आम्ही प्रार्थना करतो. मग त्यांनी सांगितल्यावर जर कोणी (त्या यादीतले). विश्वास ठेवलां तर आम्ही ते साजरं करतो!

परमेश्वराचं कुटूंब मोठं होत आहे! त्यांनी मोठ्या, खूप मोठ्या व सर्वात मोठ्या आशीर्वादाविषयी त्यांना सांगितलं का हे ही मी विचारते कारण परमेश्वराचं कुटुंब ह्यानेच वाढत राहते.

त्यांनी जर परमेश्र्वराच्या आर्शीर्वादाविषयी सांगितलं नसेल तर आम्ही पुन्हा सुरवात करतो -- ते आशीर्वाद, येशूचा नवा शिष्य यादी कशी बनवू शकतो, आपली कहाणी कशी सांगू शकतो, परमेश्वराची कथा कशी सांगू शकतो व आशीर्वादाविषयीही -- हे सर्व केवळ एका नव्या शिष्याला इतरांना सांगता यावं म्हणून.

सराव झाल्यानंतर मी पुन्हा त्यांना इतरांना सांगण्याकरता पाठवतो. पण त्यांचं काय ज्यांना सांगण्यात आलं व त्या यादीतल्या काहींनी विश्वास ठेवला व त्यांनी देखील इतरांना सांगायला सुरवात केली?

काय होतं मला अत्यानंद होतो!

अशा व्यक्तिला परमेश्वराच्या वचनात "उत्तम माती" म्हटलं आहे -- अशी व्यक्ति जी परमेश्र्वराचं कुटूंब अतिशय उत्तम रितिने वाढवत जाईल! अशी व्यक्ति जेव्हा मला भेटते, मी त्यांना पुन्हा भेटण्याचं ठरवतो व त्यांच्या अध्यात्मीक उन्नतीत वाढ करण्याकरता त्यांच्यात गुंतवणूक करतो.

मी बाप्तीस्म्यासारखे नवीन विषयावर सांगते व 3/3rd GROUP कसा सुरू करावा. मग ते नवीन अध्यात्मिक कुटूंबाची सूरवात करू शकतात - त्याच येशूच्या नव्या शिष्यांसोबत.

त्यांच्या विश्वासूपणामुळे, मलाही सांगण्याचा उत्साह असतो व हे पाहण्याचा की परमेश्वर पुढे काय करणार आहे. प्रत्येक वेळी एक. एक पाऊल उचला. नेहमी त्यांना शिकण्याची, आज्ञापालनाची व सांगण्याची संधी दया.

मी अशा व्यक्तिसाठी प्रार्थना करतो - देवाला नेहमी - धन्यवाद देतो की त्यांना सांगत असताना मी देखील शिकत गेलो व त्यांनादेखील सर्वात मोठा आशीर्वाद लाभो.

चर्चा करा

(10 min)

  1. तुम्ही येशूचे अनुसरण करण्यास सुरुवात केली तेव्हा हीच पद्धत तुम्हाला शिकविण्यात आली होती का? नसल्यास, काय वेगळे होते?
  2. तुम्ही विश्वासात आल्यानंतर, तुम्ही इतरांना शिष्य बनविण्यास सुरू करे पर्यंत किती वेळ लागला?
  3. तुमच्या मते काय होईल जर नवीन अनुयायांनी ताबडतोब इतरांना सांगणे आणि त्यांना शिष्य बनविणे सुरू केले तर?

READ

(5 min)

बदकाच्या पिल्लू सारखे शिष्यत्व

Zume प्रशिक्षणा मध्ये पुन्हा स्वागत आहे. या सत्रामधे, आपण शिकणार आहोत की कशी बदकाची पिल्ले केवळ पोहायला शिकत असताना आपली मदत करू शकतात शिष्य बनविण्याच्या दोन महत्वाच्या सिध्दांतामध्ये.

तुम्ही कधी बदकाच्या पिल्लांना बाहेर फिरताना पाहिले आहे का?

तुम्ही जगात कुठेही असा. हे नेहमीच एकसारखे दिसते. एक बदक माता नेतृत्व करत असते, आणि तिची पिल्ले तिच्यामागे चालत असतात - एक एक करून सगळे - एका रांगेल. बदक माता पुढे चालत असते. लहानशी बदके मागे जात रहातात.

परंतु जर तुम्ही जवळून पाहिले. तुम्हाला दिसेल की आणखीही काहीतरी घडत असते. प्रत्येक लहान बदक एकावेळी दोन भूमिका निभावत आहे. प्रत्येक छोटे बदक अनुयायी आहे कारण ते बदक मातेचे अनुकरण करत असते किंवा आणखी एखा‌द्या बदकाचे जे त्याच्या समोर चालत असते.

आणि एकाच वेळी - प्रत्येक छोटे बदक स्वतःमधे एक नेता आहे, कारण ते बदकांच्या मुलांचे (किंवा बदकाच्या पिल्लांचे) नेतृत्व करित असते जे त्याच्या ठिक त्याच्या मागे चालत असतात.

तर मग एक पिल्लू अनुयायी आहे की नेता हे दोन्हीही आहे. म्हणून "फिरायला जाण्याऱ्या" बदकांचा शिष्य बनविण्यासाठी बराचसा संबंध आहे.

देवाचा अशी इच्छा आहे की त्याचा परिवार खूप वाढावा म्हणून तो अपेक्षा करतो की प्रत्येक अनुयायाने नेतृत्व करावे, प्रत्येक विश्वासणारा भागीदार असावा आणि प्रत्येक शिष्य. शिष्य बनविणारा असो एकाच वेळेस.

एक फासा ज्यामधे आपण फसतो शिष्य आणि शिष्य-निर्माणकर्त्याच्या रुपात तो आहे हा खोटा विश्वास कि आपल्याला सगळे माहित असण्याची गरज आहे किंवा बऱ्याचशा गोष्टी जाणण्याची गरज आहे, आपण काही सांगण्याआधी. परंतु शिष्यत्व असे कार्य करित नाही.

शिष्य बदकांच्या पिल्लांसारखे असतात. पुढारी होण्यासाठी त्यांना सगळे काही ठावूक असण्याची गरज नाही. त्यांना फक्त एक पाऊल पुढे टाकायचे आहे. परमेश्वराची अपेक्षा आहे की त्याच्या कुटुंबाची विश्वासूपणात वाढ व्हावी म्हणून तो अपेक्षा करतो की प्रत्येक नेता हा अनुयायी असावा. प्रत्येक सहभागी विश्वासणारा असावा, आणि प्रत्येक शिष्य तयार करणारा एक शिष्य असावा अगदी एकाच वेळेस.

आणखी एक फास ज्यामधे आपण अडकतो. शिष्य आणि शिष्य - तयार करणाऱ्याच्या स्वरूपात, एक खोटा विश्वास असतो की एखा‌द्याला. कुठेतरी सगळे ठावूक आहे आणि आपण जर त्याला केवळ शोधून त्याचा पीछा केला कि मग आपले काम झाले.

परंतु शिष्यत्व असे काही कार्य करित नाही.

परमेश्वराच्या राज्यात केवळ एकच 'बदक माता असते जिचे अनुकरण आपण सगळे करतो -- आणि तो आहे येशू ख्रिस्त कोणी मिशनरी नाही, कोणी पास्टर नाही, कोणी सेमिनरी अध्यापक नाही, केवळ येशूच आपल्या विश्वासाचा संपूर्णपणे हक्कदार आहे.

उर्वरित आपण सगळे "प्रक्रियेत" आहोत. कायम येशूच्या अगदी जवळ कोणीतरी असेल ज्याचे आपण अनुसरण करू शकतो. आणि जो खूप दूर असेल ज्याचे आपण नेतृत्व करू शकतो. पण आपली स्थिती कशीही असली तरी आपले डोळे आपले हृदय - नेहमीच पूर्णतः येशूकडे लागलेले असावे.

पौल, ज्याने बायबलमधील नविन करारातील बराचसा भाग लिहीलेला आहे, आणि पुष्कळशा प्राथमिक मंडळीची सुरवात केली, केवळ लिहिलेच नाही की - "माझ्या मागे या." तर त्याने लिहीले - "माझ्या मागे या, जसे मी येशूच्यामागे चालतो."

पौलाला ठावूक होते बदकाच्या पिल्लांना सगळीकडे काय ठावूक असते आणि प्रत्येक शिष्यालाही काय ठावूक असावे - देवाच्या राज्यातील प्रत्येक नेता अनुसरणारा असावा आणि आपण सगळ्यांनी येशूला अनुसरावे.

बायबलमध्ये पौलाने असेही लिहीले आहे: "माझ्याकडून ज्या गोष्टी तू पुष्कळ साक्षीदारांसमोर ऐकल्यास.... त्या घे व इतरांना शिकविण्यास समर्थ अशा विश्वासू लोकांवर सोपवून दे."

पौलाला ठावूक होते बदकांच्या पिल्लांना सगळीकडे काय ठावूक असते आणि प्रत्येक शिष्यालाही काय ठावूक असावे. देवाच्या राज्यातील प्रत्येक अनुसरणारा नेता असावा - आणि आपण सगळ्यांनी येशू सारखे नेतृत्व केले पाहिजे. दुसऱ्यांसाठी आपले जीवन समर्पित करुन.

जर तुम्हाला परमेश्वराच्या परिवाराला खूप मोठे होताना आणि विश्वासामधे वाढताना पहायचे असेल - तर मग बदकांच्या पिल्लांसारखा शिष्य बनविण्याचा विचार करा अनुयायी बना आणि पुढारीही अगदी त्याच वेळी.

चर्चा करा

(10 min)

  1. शिष्यत्वाचे ते एक क्षेत्र कोणते आहे (बायबल वाचणे / समजणे, प्रार्थना करणे, देवाची कहाणी सांगणे इ.) ज्याबद्दल तुम्ही अधिक जाणून घेऊ इच्छित आहात? कोण आहे जो तुम्हाला शिकण्यास मदत करू शकेल?
  2. शिष्यत्वाचे एक क्षेत्र कोणते आहे जे तुम्हाला वाटते की तुम्ही इतरांसह सामायिक करू शकाल? तो कोण आहे ज्याबरोबर तुम्ही सामायिक करू शकता?

READ

(5 min)

डोळे हे पहाण्यासाठी कि देवाचे राज्य कोठे नाही आहे

Zume प्रशिक्षणात आपलं स्वागत असो. अनुयायी परमेश्वराचे राज्य नसणाऱ्या जागा जेव्हा पाहू लागतात. तेव्हा ते दूर दूर व तीव्र गतीने कसे वाढू लागतात हे आपण पाहू.

मनुष्यस्वभावाने, आपण दिसणाऱ्या गोष्टींवर विचार करतो, लक्ष केंद्रित करतो मिळवण्यासाठी धडपडतो. आपण त्याला वास्तव म्हणतो. गोष्टी आहेत तशा. पण अदृष्य गोष्टींवर लक्ष केंद्रित करून देवाचं राज्य अधिक लवकर वाढतं. ज्या गोष्टी नाहीत अशावर. किंवा ज्या अजूनतरी नाहीत.

आपल्या भोवती अशा अनेक जागा आहेत ज्यात जशी परमेश्वराची इच्छा स्वर्गात आहे तशीच, अजून पृथ्वीवर नाही - ज्याच्या दैनंदिन व सर्वसामान्य जीवनात खूप फटी आहेत - वेदनेंच्या, तुटकपणाच्या, छळाच्या यातनेच्या व मृत्यूच्या देखिल.

परमेश्वराचं राज्य केवळ कुठे आहे इतकच नव्हे तर कुठे नाही हे पण - प्रत्येक शिष्याला - प्रत्येक अनुयायाला बघता आलं पाहिजे. राज्याचं कार्य म्हणजे त्या जागी व अंधाऱ्या स्थळी पोहोचणे व ते बंद करण्याचा प्रयत्न करून आपल्या भूतलावरच्या ह्या कालावधीत ती जागा प्रकाशमय व चैतन्यपूर्ण करणे.

परमेश्र्वराचं राज्य कुठे नाही हे आपण दोन प्रकारे पाहू शकतो -- आपल्या परिचयाच्या लोकांद्वारे व ज्यांना आपण अजून भेटलो नाही अशानद्वारे.

पहिलं म्हणजे आपल्या परिचयाच्यालोकांद्वारे - आपली अनेक वर्तमानातली अनेक नाती आपले मित्र मंडळी, परिवार, सहकारी, वर्गमित्र, शेजारी वगैरे. ह्यांच्याद्वारे परमेश्वराची कहाणी सर्वात वेगाने पसरते. आपण त्यांना ओळखतो म्हणून ते आपल्याला आवडतात व आपण त्यांची काळजी करतो. हे स्वाभाविक आहे.

येशूने आपल्याला एका स्वार्थी मनुष्याची कथा सांगितली - जो अतिशय श्रीमंत व उद्घट होता व त्याला शिक्षा मिळून तो नर्कात होता. त्याने याचना केली की - "लाझरसाला माझ्या वडिलांच्या घरी जाऊन माझ्या भावांना ताकिद देऊ दे म्हणजे ते ह्या भयाण जागी येणार नाही."

येशूने दाखवून दिले की एखादया स्वार्थी व यातनामय मनुष्याला आपल्या जवळ असलेल्यांची काळजी असते.

आपल्या परिचयाचे लोक आपल्या आयुष्यात असतात कारण परमेश्वर त्यांच्यावर प्रीति करतो व आपणनही करावी अशी त्याची इच्छा असते. असल्या नात्यांचे आपण उत्तम सेवक असायला हवं ते ही प्रेमाने, संय्यमाने व सात्त्याने. शिष्यांची वाढ तेव्हा होते जेव्हा परमेश्वराने त्यांच्या भोवताली ठेवलेल्या लोकांची काळजी त्यांना असते व ते त्याविषयी काही करू इच्छीतात.

ती काळजी तुम्ही वाढवू शकता व वाढीकरता एक सोपी पद्धत योजू (आखू) शकता.

ही अशी त्यांच्या परिचयाच्या १०० लोकांच्या नावाची यादी त्यांना बनवायला सांगा. त्याचे तीन गट यादीप्रमाणे करायला सांगा.

  • जे येशूचे शिष्य आहेत
  • जे येशूचे शिष्य नाहीत
  • ज्यांना ते आहेत की नाही हेच मुळात ठाऊक नाही.

शिष्यांकरता - ते त्यांना अधिक फळद्रूप व विश्वासू होण्याकरता प्रोत्साहन देऊ शकतात. जे शिष्य नाहीत त्यांची ओळख ते त्या प्रेमळ परमेश्वराशी करून देऊ शकतात. ज्यांना ठाऊक नाही - त्यांच्यासोबत शिष्य अधिक वेळ गुंतवून, त्यांना शिकवण देऊ शकतात.

ज्यांना आपण भेटलो नाही त्यांच्याद्वारे परमेश्र्वराचं राज्य कुठे नाही हे पण आपण पाहू शकतो. आपल्या नात्यासंबंध्यापेक्षा बाहेरचे लोक असतात - ज्यांना आपण ओळखत नाही, शेजारी ज्यांना "नमस्ते" खेरीज आपण काहीच म्हणत नाही, रस्त्यावरचे येणारे जाणारे, स्त्रीयां, व्यापारी, प्रत्येक शहर, गावातले अनोळखी लोक ज्यांना आपण भेटलोच नाही.

येशूने म्हटले - सर्व राष्ट्रांत शिष्य करा. येशूने म्हटले - माझ्याविषयी सर्वांना सांगा - यरूशलेमात, यहूदेत, समारियात व भूतलावरच्या शेवटपर्यंत.

परिचयाच्या लोकांना परमेश्र्वराची कथा सांगितल्यानेच ती तीव्र गतीने पसरते. अपरिचयाच्या लोकांना परमेश्र्वराची कथा सांगितल्यानेच ती दूरदूरवर पोहोचते.

अनोळखी लोकांबद्दल प्रेम व काळजी वाटणे हे स्वाभावीक नव्हे. हे दैवी आहे व हा एक पुरावा आहे की पवित्र शास्त्र आपल्या आयुष्यात कार्यरत आहे. परमेश्र्वराचे आवडते हे सुल्लक, शेटवचे व हरवलेले असतात. तो पुन्हा पुन्हा आपला जीव अशांवर ओततो.

आपण परमेश्वरासारखे जर बनू इच्छीतो तर आपले आयुष्य आपण अशांमध्ये गुंतवायला हवे. परमेश्र्वर आपल्याला जाण्याची आज्ञा देतो. व हयाचाच एक भाग म्हणजे केवळ जे जवळ आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचणं नव्हे तर अध्यात्मीक जगाच्या सर्वात काळोखी कोपऱ्यात जाऊन सांगणे - व काहींनी तर कधी येशूचे नाव देखील ऐकलं नसेल कधीच.

परमेश्वराचं वचन सांगतं की - देव गर्विष्ठांचा विरोध करतो पण लीनांस कृपादान देतो. येशूचे शिष्य ह्या नात्याने आपणही कृपादान दयायला हवं जसं तो लीनांस, निराशजनांस व हरवलेल्यास देतो. शिष्यांची वाढ होते जेव्हा परमेश्वराने त्यांच्या आयुष्यात दिलेल्या व्यक्तिंची काळजी ते करू लागतात. शिष्यांची वाढ अधिक होते जेव्हा परमेश्वराने लांब ठेवलेल्यांची काळजी देखील आपण करतो. पण अशाकरता देखिल एका योजनेची आवशकता असते.

इतरांची काळजी करण्याची एखादया शिष्याची इच्छा तुम्ही वाढवू शकता व त्यांच्या वाढीकरता प्रशिक्षणाची सोपी योजना तुम्ही आणू शकता म्हणजे देवाचं वचन ऐकू इच्छीणारे कान त्यांना शोधण्यास सोप जाईल. येशूने म्हटले - जेव्हा तुम्ही घरी जाल, तेव्हा म्हणा, "परमेश्वर हे घर शांतीने आशीर्वादीत करो." त्या घरातले लोक जर शांती-प्रीय असतील तर तुमच्या प्रार्थनेने ते आशीर्वादीत होतील. पण तसे नसतील तर तुमची प्रार्थना तुम्हाला परतवेल.

ऐकण्यास तयार व्यक्तिलाच आपण बोलावतो. परमेश्वराने एक शांतीप्रिय व्यक्ति परमेश्र्वराच्या संदेशाला प्रतिसाद देणारी व्यक्ति- जी आज्ञापालनास विश्वासू व इतरांना सांगण्यास तयार असेल अशी. जिथे आपण थोड्याच लोकांना ओळखतो, अशांसोबत म्हणजेच मित्र मंडळी, परिवार, सहकर्मचारी, वर्गमित्र, शेजारी इत्यादींसोबत नव्हे तर अशा शांतीप्रिय व्यक्तिला प्रशिक्षण देऊ जो त्याच्या परिचयांपर्यंत देखील पोहोचू शकेल.

विश्वासूपणार लक्ष केंद्रित केल्यावर सर्वोत्तम निकाल (परिणाम) निश्चितच लाभतात, लक्षात ठेवा आज्ञापालनानेच व इतरांना सांगण्यानेच विश्वासूपणा दर्शवला जातो. येशूने सांगितलेल्या सर्वोत्तम मातीचे उदाहरण म्हणे आज्ञापालन करून इतरांना सांगणारे हेच लोकं असतात.

येशूने म्हटले की - काही बीया उत्तम मातीवर पडल्या व त्यातून तीस किंवा साठ किंवा शंभर पटीने पीक आले.

  • परमेश्वराच्या वचनाला नकार देणारे कठोर हृदय विश्वासूंचे नसते.
  • जगाच्या चिंतेने व नाश होणाऱ्या धनाने विश्वासूचे लक्ष भरकटत नाही.
  • विश्वासू माणसं ही अतिशय दुर्मिळ आणि त्यामुळेच महत्वाची असतात ज्यांच्यामुळे येशूला ओळखण्यास मदत होते.
  • विश्वासू लोक त्या गरसेतल्या भूताने पछाडलेल्या मनुष्यासारखे असतात जे येशूने दाखवलेल्या गोष्टी सांगत आज्ञापालन करतात.

एका विश्वासू माणसांना सांगून आज्ञापालन केल्याने अनेक उत्पन्न झाले, अनेक जण ज्यांना येशूची ओळख व्हायची होती.

परमेश्वराचं राज्य कुठे नाही ह्याकडे लक्ष ठेवावं व आपल्या परिचयाच्या लोकांना व अपरिचयाच्या लोकांना येशूविषयी सांगूनच शिष्याची वाढ होते व परमेश्र्वराचे राज्य दूरवर व तीव्र गतीने पसरते.

चर्चा करा

(10 min)

  1. तुम्ही कोणाला सांगण्यासाठी अधिक सोयीस्कर आहात - ज्या लोकांना तुम्ही आधीच ओळखत आहात किंवा ज्यांना तुम्ही अजूनपर्यंत भेटलेले नाही?
  2. असे का आहे असा तुम्ही का विचार करिता?
  3. ज्या लोकांसह तुम्ही कमी सोयीस्कर आहात त्या लोकांना सांगण्यासाठी तुम्ही कसे अधिक चांगले होऊ शकाल?

READ

(5 min)

प्रभू भोजन आणि त्याचे नेतृत्व कसे करावे

येशूने म्हटले - "स्वर्गातून उतरलेली जीवंत भाकर मी आहे. ह्या भाकरींतून जो कोणी खाईल तो सर्वकाळ वाचेल; जी भाकर मी देईन ती जगाच्या जीवनासाठी माझा देह अशी आहे."

पवित्र सहभागीता किंवा "प्रभू भोजन" हे येशूसोबतचे आपले जवळचे संबंध साजरे करण्याची एक पद्धत आहे.

साजरी करण्याची ही एक सोपी पद्धत -

जेव्हा तुम्ही येशूचे अनुयायी म्हणून भेटता, तेव्हा शांततेत, चिंतन करत व पापांना मान्य करत वेळ घालवा.

कोणालाही शास्त्रपाठ वाचू दया -- "कारण जे मला प्रभूपासून मिळाले, तेच मी तुम्हाला सांगून दिले, ज्या रात्री प्रभू येशूला धरून दिला गेला त्या रात्री त्याने भाकर घेतली. ईशोपकारस्मरण करून ती मोडली आणि म्हटले तुम्हांसाठी जे माझे शरीर ते हे, माझ्या स्मराण हे करा" (करंथीकरांस पत्र ११:२३-२४)

तुम्ही बाजूला ठेवलेली भाकर सर्वांमध्ये वाटून त्याचं सेवन करा / OR बाजूला ठेवलेल्या भाकरीचं तुम्ही सर्वांनी सेवन करा.

वाचन चालू ठेवा --"मग भोजन झाल्यावर त्याला घेऊन त्याने तसेच केले आणि म्हटले हा प्याला माझ्या रक्तात नवा करार आहे, जितकेदा तुम्ही हा पिता तितकेदा माझ्या स्मरणार्थ हे करा." (करंथीकरांस पत्र ११:२५)

वेगळा ठेवलेल्या द्राक्षरसाचं किंवा रसाचं गटातल्या सर्वानी सेवन करा.

वाचन संपवा - "कारण जितकेदा तुम्ही ही भाकर खाता व हा प्याला पिता तितकेदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करता" (करंथीकरांस पत्र ११:२६).

तुम्ही प्रभू भोजनाचं एकत्र सेवन केलं आहे.

प्रार्थना करत व गाणी गात ते साजरं करा - कारण तुम्ही त्याचे आहात व तो तुमचा!

प्रथम मंडळीची प्रभूभोजन - ही पवित्र सहभागीता आहे व ZUME साधन सामग्रीतले एक महत्वाचं साधन.

क्रियाकलाप

(10 min)

प्रभू भोजन

QR कोड स्कॅन करा.

तुमच्या गटासह प्रभू भोजन साजरे करण्यासाठी पुढील 10 मिनिटे घालवा.

जेव्हा तुम्ही येशूचे अनुयायी म्हणून एकत्र जमता:

  1. तेव्हा केलेल्या पापांचा विचार करून व ती पापे कबूल करीत, शांतपणे मनन करा.
  2. जेव्हा तुमची तयारी होते, तेव्हा कोणाला तरी हा शास्त्रभाग वाचायला सांगा - "कारण जे मला प्रभुपासून मिळाले तेच मी तुम्हाला सांगितले आहे की, ज्या रात्री प्रभू येशूला धरून देण्यात आले त्या रात्री त्याने भाकर घेतली; आभार मानून ती मोडली, आणि म्हटले, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी आहे. माझ्या स्मरणार्थ हे करा" १ करिंथ ११:२३.
  3. तुमच्या गटासाठी तुम्ही काढून ठेवलेली भाकर सर्वांना द्या, आणि खा.
  4. शास्त्रभाग पुढे वाचा -- _" मग भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन तसेच केले आणि म्हटले, हा प्याला माझ्या रक्ताने झालेला नवा करार आहे; जितक्यांदा तुम्ही ही भाकर खाता व हा प्याला पिता तितक्यांदा माझ्या स्मरणार्थ हे करा." _१ करिंथ ११:२५.
  5. तुमच्या गटासाठी ठेवलेला द्राक्षारस किंवा मद्य सर्वांना द्या, आणि प्या.
  6. शास्त्रभाग वाचन संपवा -कारण जितक्यांदा तुम्ही ही भाकर खाता व हा प्याला पिता तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करता" १ करिंथ ११:२६.

प्रार्थना करून किंवा गाणी गाऊन प्रसंग साजरा करा. तुम्ही प्रभू भोजनात भाग घेतला आहे. तुम्ही त्याचे आहात आणि तो तुमचा आहे!

विहंगावलोकन (आढावा)

(1 min)

या सत्रात ऐकलेल्या संकल्पना:

या सत्रात ऐकलेली साधने:

  • दूरदृष्टी / दर्शन (व्हिजन) सर्वात मोठ्या आशीर्वादावर दृष्टिक्षेप टाकताना
  • बदकाच्या पिल्लू सारिखे शिष्यत्व - त्वरित पुढाकार करिताना
  • डोळे हे पहाण्यासाठी कि देवाचे राज्य कोठे नाही आहे
  • तुमची ३-मिनिटांची साक्ष तयार करा
  • प्रभू भोजन आणि त्याचे नेतृत्व कसे करावे

NEXT STEP

आज्ञापालन

या आठवड्यात समय घालवा तुमच्या 3-मिनिटांच्या साक्षीचा सराव करिताना, आणि नंतर तुमच्या 100 च्या यादीतून तुम्ही “अविश्वासू” किंवा “अज्ञात” म्हणून चिन्हांकित केलेल्या किमान एका व्यक्तीला ती सांगा.

सामायिक करा

देवाला विचारा कि तुम्ही तुमच्या 3-मिनिटांच्या साक्षीच्या साधनाद्वारे कोणाला प्रशिक्षण द्यावे अशी त्याची इच्छा आहे. तुम्ही जाण्यापूर्वी त्या व्यक्तीचे नाव गटाला सांगा.

सत्र 5

चेक-इन

(1 min)

सर्व सहभागी आणि फॅसिलिटेटर चेक-इन करा.

Or six.zume.training/checkin and use code: 6542

प्रार्थना करा

(5 min)

प्रार्थना करा आणि देवाचे आभार माना त्याच्या लोकांच्या साक्षीने तो ज्या प्रकारे कार्य करतो त्यासाठी. त्याच्या पवित्र आत्म्याला तुमच्या वेळेचे एकत्रितपणे नेतृत्व करण्यास आमंत्रित करा.

मागे वळून पहा

(5 min)

प्रारंभ करण्यापूर्वी, मागे वळून पहाण्यासाठी थोडा वेळ काढा.

शेवटच्या सत्राच्या शेवटी, तुमच्या गटातील प्रत्येकाला तुम्ही शिकलेल्या गोष्टींचा सराव करण्याचे आव्हान दिले गेले होते.

या आठवड्यात आपल्या गटाने कसे केले हे पाहण्यासाठी काही क्षण घ्या.

विहंगावलोकन (आढावा)

(1 min)

या सत्रात, आपण ही संकल्पना ऐकू आणि त्यावर चर्चा करू:

आणि आम्ही ही साधने आमच्या टूलकिटमध्ये जोडू:

  • शांतीप्रिय व्यक्ती आणि त्याला कसे शोधावे
  • BLESS (बी.एल.इ.एस.एस) प्रार्थना नमुना
  • प्रार्थनेतील वाटचाल आणि हे कसे करावे

READ

(5 min)

प्रार्थनेतील वाटचाल

परमेश्वर म्हणतो की "सर्व मनुष्यांसाठी विनंत्या, प्रार्थना, रदबदल्या व ईशोपकारस्मरण करावें, राजाकरता व सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांकरत करावे -- यासाठी की आपण सर्व सुभक्तिनें व गंभीरपणे शांतीचे व स्वस्थपणे असे आयुष्यक्रमण करावे. हे आपला तारणारा देव याच्या दृष्टीने चांगले व स्वीकारावयास योग्य आहे. त्याची इच्छा आहे की सर्व मनुष्यांचे तारण व्हावे व त्यांनी सत्याच्या पूर्ण ज्ञानास पोहचावे."

प्रार्थनेची वाटचाल म्हणजे इतरांसाठी प्रार्थना करण्याची आज्ञा पालनाची एक सोपी वाट. प्रार्थनेची वाटचाल म्हणजे जणू - चालता फिरता परमेश्वराशी बोलणं.

डोळेबंद करून मान खाली घालण्यापेक्षा आपण डोळे भोवतालच्या गरजा पाहण्याकरता उघडे ठेऊ व हृदय वाकवून नम्रतेत देवाला विनंती करू. दोषी तिघे मिळून तुम्ही प्रार्थनेत वाटचाल करू शकता किंवा एकटे सुद्धा.

समुहात प्रार्थना करत असल्यास सर्वांनी मोठ्यानी प्रार्थना करावी म्हणजे प्रत्येकाला एकमेकांच्या गरजा समजतील, व देव देखील त्यांच्या मनी गरजा निर्माण करू शकेल.

स्वतः करत असला - व जर कोण सोबत भेटलं तर शांतपणे प्रार्थना करा किंवा मोठ्याने करा.

कशाकरता प्रार्थना करावी हे कळण्याकरता चार गोष्टींकडे लक्ष दयायला हवेः

  • निरिक्षण -- तुम्हाला काय दिसतय? तुम्हाला एखादं खेळणं दिसलं तर बहूदा तुम्हाला शेजारच्या मुंलाकरता किंवा कुटूंबाकरता किंवा शाळेकरता प्रार्थना करावीशी वाटेल.
  • संशोधन -- तुम्हाला काय माहित आहे? तुम्ही एखादया परिसराचं काही वाचलं असेल तर त्यातील लोकांची काही माहिती तुम्हाला असेल. किंवा जर त्या परिसरात कुठले गन्हे किंवा अन्याय होत असेल तर ठाऊक असेल. ह्या बद्दल प्रार्थना करत परमेश्वराची मदत मागा.
  • प्रकटीकरण -- पवित्र आत्मा तुमच्या ध्यानीमनी एखादी कल्पना किंवा विचार आणेल - ते कान देऊन ऐका व प्रार्थना करा!
  • पवित्र शास्त्र -- वाटचालीच्या सुरवातीला तुम्ही देवाचं वचन वाचलं असेल किंवा वाटचाल करत असता तुमच्या मनी एखादं वचन पवित्र आत्मा दर्शवेल. अशा वेळी त्याचा परिणाम तितल्या लोकांवर होण्याकरता प्रार्थना करा.

प्रार्थनेत वाटचाल करताना तुम्ही ह्या पाच प्रभावशाली क्षेत्रांवर आपले लक्ष केंद्रित करू शकताः

  • सरकार - सरकारी कार्यालयांकरता प्रार्थना करा जसे न्यायालय, इतर सरकारी इमारती, कायदा व नियम लागू करणारे कार्यालयं त्या क्षेत्राच्या सुरक्षिकतेसाठी प्रार्थना करा व पुढाऱ्यांच्या विवेकबुद्धी करताही.
  • व्यवसाय व वाणिज्य - वाणिज्य क्षेत्रांकडे लक्ष ठेऊन त्यांच्याकरता प्रार्थना करा उदाः वाणिज्य विभाग, आर्थिक जिल्हे व खरेदीविक्रिचे क्षेत्र. योग्य गुंतवणूकीकरता व साधनसंपत्तीच्या योग्य सेवेकरता प्रार्थना करा. आर्थिक न्यायाकरता, संधीकरता व फायदयापेक्षा लोकांना श्रेष्ठ मानणाऱ्यांकरता व सढळपणे देणाऱ्यांकरता प्रार्थना करा.
  • शिक्षण - शैक्षणिक विभागांकरता उदाः शाळा, कारभारविषयक इमारती, व्यवसाईक प्रशिक्षण केंद्र, कॉलेजेस् व विद्यापीठांकरता प्रार्थना करा. प्रार्थना करा की नितिमान शिक्षक परमेश्वराचं सत्य शिकवतील व आपल्या विद्यार्थ्यांच्या मनाचं रक्षण करतील. खोटारडेपण व गोंधळ होऊ नये म्हणून देवाची मदत मागा अशी प्रार्थना करा की हया जागेतून नेतृत्व करणारे व सेवा करणारे नागरिक निघतील.
  • दळणवळण - दळणवळणाच्या विभागांकरता उदाः रेडिओ स्टेशन, TV Station व वर्तमानपत्र प्रकाशकांकरता प्रार्थना करा. परमेश्वराच्या कहाणी करता प्रार्थना करा व शहरात व जगभरात त्याची साक्ष पसरण्याकरता प्रार्थना करा. परमेश्वराचं कार्य व संदेश हा सर्वापर्यंत सर्वत्र पोहोचण्याकरता ह्या माध्यमाचा उपयोग व्हावा अशी तुम्ही प्रार्थना करा.
  • अध्यात्मीकता - अध्यात्मीक केंद्रांकडे लक्ष ठेऊन त्यांच्याकरता प्रार्थना करा. उदा: चर्चेस, मस्जीदी, मंदीरं इ. प्रत्येक अध्यात्मीक शोधकाला येशूत शांती व समाधान प्राप्त व्हावे व त्याने खोट्या धर्मात भटकून किंवा गोंधळून जाऊ नये म्हणून प्रार्थना करा.

शेवटी, प्रार्थनेत वाटचाल करत असताना तुम्ही पाच पद्धतीने प्रार्थना करू शकताः

वाटचाल व प्रार्थना करत असताना लोकांकरता व गटांकरता प्रार्थना करणाऱ्या देवाच्या संकेतांकडे लक्ष असू द्या. तुम्ही असंही म्हणू शकता, "आम्ही ह्या समाजाकरता प्रार्थना करत आहोत, त्याकरता काही विशेष प्रार्थना करण्यालायक आहे का?" किंवा "मी अमूक एका क्षेत्रासाठी प्रार्थना करत आहे त्यात काही विशिष्ठ आहे का?" तुम्ही त्यांचा प्रतिक्रिया ऐकल्यावर त्यांच्या गरजा विचारा. त्या सांगितल्यास, त्वरीत प्रार्थना करा. प्रभूने प्रेरित केल्यास, इतर गोष्टींकरता प्रार्थना करा.

प्रार्थनेच्या पद्धतीकरता तुम्हाला इंग्रजीतला BLESS हा शब्द लक्षात ठेवावा लागेल.

  • शरिर (आरोग्य)
  • काम व आर्थिक बाब.
  • मनोबल.
  • सामाजीक नाते संबंध.
  • अध्यात्मीक

बहूतांश वेळा, तुम्ही प्रार्थना केल्याबद्दल लोक आभारी असतात.

समोरची व्यक्ति ख्रिस्ती नसल्यास अध्यात्मीक चर्चेची व परमेश्वराची कथा व तुमची कहाणी सांगण्याची संधी तुम्हाला लाभते. तुम्ही Bible Study करता त्यांना आमंत्रीन करू शकता किंवा त्यांच्या घरी तुम्ही घेऊ शकता.

ख्रिस्ती असल्यास त्यांना तुम्ही प्रार्थनेकरता आमंत्रीत करू शकता किंवा त्यांने त्याचे प्रशिक्षण देऊ शकता किंवा प्रभाव क्षेत्रांकरता प्रार्थना करू शकता किंवा BLESS पद्धतीचा वापर करून देवाचं कुटूंब वाढवू शकता.

प्रार्थनेची वाटचाल ZUME साधन सामग्रीतलं आणखी एक सोपं साधन.

READ

(5 min)

शांतीप्रिय व्यक्ती

पुन्हा स्वागत आहे Zume ट्रेनिंगमध्ये. आधिच्या सत्रामध्ये तुमची ओळख झाली आहे शांत व्यक्तीच्या कल्पनेशी ह्या सत्रामध्ये आपण अधिक तपशिलात शिरुयात कि ती व्यक्ति कोण आणि तुम्हाला ती कशी सापडली हे कसे ओळखावे.

एक शांत स्वभावाची व्यक्ति शिष्य तयार करण्यासाठी तातडीने मदत करू शकते अशा जागी सुध्दा जिथे येशूचे अनुयायी खूप कमी किंवा एखाद दुसराच असेल.

येशूने जेंव्हा आपल्या शिष्यांना नविन ठिकाणी पाठविले शिष्य बनवण्यासाठी, तेंव्हा त्याने त्यांना एक साधी आणि महत्वाची आज्ञा दिली.

येशू म्हणाला -- पिशवी, झोळी किंवा पायतण बरोबर घेऊ नका वाटेने कोणाला मुजरा करू नका. ज्या कोणत्या घरात जाल तेथे, 'ह्या घरास शांति असो प्रथम म्हणा, तेथे कोणी शांतिप्रिय माणूस असला तर तुमची शांति त्याच्यावर राहील, नसला तर तुम्हाकडे ती परत येईल. त्याच घरात वस्ती करून ते जे देतील ते खातपीत राहा, कारण कामकरी आपल्या मजुरीला योग्य आहे, घरे बदलू नका.

परंतु ह्या सगळ्याचा अर्थ काय आहे?

आपण जेंव्हा शिष्य बनविण्याचा विचार करतो. कदाचीत आपला पहिला विचार असतो की आपली आर्थिक स्थिती उत्तम क्रमात असावी. एक विशेष लक्ष निवडावे, आणि एक स्पष्ट योजना निश्चित करावी. जर येशू म्हणतो, "जा", तर आपण "जावे" आणि जात रहावे! सगळ्यांना सांगावे सगळ्या ठिकाणी सर्व वेळी!!!

परंतु येशूने दिलेल्या सूचनांमधून जाणवते की तो आर्थिक किंवा उत्साहची फारशी चिंता करत नाही, तर लक्ष्यावर लक्ष केंद्रीत करतो. येशूला हवय की त्याच्या शिष्यांनी शोध घेऊन एखा‌द्या शांति प्रिय व्यक्ती मधे निवेश करावा.

आपण जर अशा ठिकाणी शिष्य तयार करू इच्छित असाल ज्या ठिकाणी बरेचशे किंवा कदाचित कुणीही नसेल, तर मग एका शांतिप्रिय व्यक्तिचा शोध घेणे ही महत्वाची गोष्ट तुम्ही करु शकता.

एक शांतिप्रिय व्यक्ति ती असतेः

  • जी तुमची कहाणी, देवाची कहाणी आणि येशूचे शुभवर्तमान ऐकण्यास तैयार असते.
  • जो कोणी आतिथी सत्कार करणारा असेल, आणि आपल्या घरात तुमचे स्वागत करील किंवा आपल्या कार्यालयात किंवा आपल्या परिवारासह आणि आपल्या मित्रांसह आपल्या कार्यक्रमात सहभागी होईल.
  • जो कोणी इतरांना ओळखत असेल. (किंवा इतरांमधे प्रसिद्ध असेल) आणि एखा‌द्या छोट्याश्या गटाला किंवा गर्दीला गोळा करण्यास उत्साहीत असेल.
  • एखादा जो ईमानदार आहे आणि इतरांसोबत जे काही शिकला असेल ते वाटू इच्छित असेल, आपण तिथून गेल्यावर सुध्दा.

बायबल मधे आपण पहातो की येशू आणि त्याचे शिष्य शांतताप्रिय लोकांना भेटतात जे थोडेसे - अनपेक्षित आहे.

गदरेकरांच्या प्रदेशात, येशू एकट्या रहाणाऱ्या दुष्टात्माग्रस्त व्यक्तिला भेटला ज्याला साखळ्यांनी बांधलेले होते. आपण कधीही त्याचा शांतताप्रिय व्यक्ति म्हणून विचार करू शकरणार नाही. परंतु तो येशूचे ऐकायला तैयार होता व त्याने अतिथिचा सतकार केला आणि येशुला राहात्या ठिकानावरून स्वागत सहीत बोलावले. तो प्रसिध्द होता आणि सहज गदीं गोळा करु शकत होता. अगदी केवळ त्याच्या उपद्रवी व्यवहारामुळेही.

आणि येशूला आढळले कि तो विश्वासू राहिला आणि येशूने त्याच्यासाठी काय केले हे ल्याने त्याच्या परिवाराला, समुदायाला, आणि त्याच्या संपूर्ण नगराला सांगितले. खरतर येशू जेंव्हा त्या जागी परत आला, मोठी गर्दी त्या ठिकाणी गोळा झाली, आणि ज्या व्यक्तीबद्दल त्यांनी एवढे ऐकले त्याला पाहण्यासाठी ते खूप उत्साहित होते.

शोमरोनामधे, येशू एका स्त्रीला विहीरीवर भेटल, जी येशूला तैयार होती आणि अतिथी सत्कार करण्यास व त्याच्या पाणी पिण्याच्या विनंतीस उत्तरही दिले. आपणास दिसते की तिचे पाच नवरे होते. आणि सध्या एका परक्या मनुष्यासोबत ती रहात होती आणि त्या छोटया गावात, तिला लोक नक्कीच ओळखत असतील, आणि येशूच्या तिच्यासोबतच्या संभाषणानंतर, ती विश्वासू राहिली आणि तिने सर्व काही ताबडतोब सांगितले मग संपूर्ण नगर येशूला विनंती करून म्हणू लागले कि त्याने त्यांनाही सांगावे आणि त्याने तसे केले.

तेव्हा, जर एखादी शांतताप्रिय व्यक्ति कुठेही राहत असली आणि काहीही करत असली आणि कदाचित कोणीही असू शकतो आपल्या माहितीतला किंवा भेटलेला - आपण त्याला कसे शोधायचे?

इथे तीन सोपे प्रकार आहेत --

आपण समाजातील लोकांकडून त्याची सिफारिश मागावी इथे कोण भरवशाचे आहे? इथे कोणी असा आहे का जो स्वतःविषयी विचार करण्यापूर्वी इतरांचा विचार करतो? जर आपल्याला एकच नाव वारंवार ऐकू आले - तर त्यांना भेटण्याचा आपण प्रयत्न करावा, त्यांना आत्मिक कल्पना दयावी, आणि पहावे कि ते ऐकण्यास आणि ते व्यक्त करण्यास तयार आहेत कि नाही ते.

आपण कोणासाठी तरी प्रार्थना करू शकतो प्रार्थनेच्या चालीमध्ये, किंवा कामाच्या जागी अथवा खेळत असताना - जेंव्हा संधी मिळेल तेंव्हा आणि मग त्या प्रार्थनेचे रुपांतर एका आत्मिक वार्तालापामधे करा.

आपण प्रत्येक संभाषणामधे आत्मिक विचार प्रस्तुत करू शकतो हे पहाण्यासाठी की देव एखा‌द्याच्या जीवनात कार्य करीत आहे की नाही ती व्यक्ती जर उत्सुक आणि इच्छुक असेल, तर त्यांना विचारू शकता की एखा‌द्या समूहाला गोळा करुन आणखी चर्चा करण्यास ते इछुक आहेत का? सिफारीशी मागवा, प्रार्थनेचा प्रस्ताव ठेवा, आत्मिक विचारांचा परिचय करा हे सगळे प्रकार आहेत ज्या‌द्वारे आपण शांतताप्रिय व्यक्तिला शोधण्याच्या प्रक्रियेची सुरुवात करु शकतो.

आपण त्यांना कसेही शोधलेले असो, लक्षात ठेवा येशू म्हणतो एक शांतताप्रिय व्यक्ति अशी व्यक्ती आहे जिच्यासोबत शिष्य बनविण्यासाठी आपण जास्तीत जास्त वेळ व्यतित करतो.

असा विचार करणे सोप्पे आहे कि आपल्या वेळेचा अधिक चांगला उपयोग हाच आहे की आपला स्वतःचा थोडासा वेळ प्रत्येकाला, समानतेने दयावा. परंतु येशू म्हणाला आणि त्याने दाखविले कि त्याची इच्छा नाही की आपण प्रत्येका बरोबर उथळ असावे तर अगदी थोड्यांना गहनतेने दयावे.

येशू बऱ्याचवेळा गर्दीला आकर्षित करीत असे, परंतु बायबल आपल्याला वारंवार सांगते की येशू त्या गर्दीतून बाजूला होऊन आपला अधिक समय आपल्या जवळच्या केवळ बारा अनुयायां सोबत व्यतित करित असे.

बऱ्याचदा असे होत असे की येशू आपला अधिक समय अगदी तिघांच्या छोट्याशा गटासोबत व्यतित करित असे.

जर येशू, ज्याच्याकडे खूप अधिक सामर्थ्य, खूप अधिक ऊर्जा, खूप अधिक अधिकार, अनुशासन, बुध्दीमता, ज्ञान, समज आणि करुणा होती. त्याने निवड केली की अगदी थोड्‌याशां सोबतच आपला वेळ गांभिर्याने घालवायचा आणि त्याने आपल्या शिष्यांना तसेच करायला सांगितले. ह्यावरून असे समजून येत नाही का कि आपणही त्याचेच अनुकरण करावे आणि त्याचा उत्कृष्ट नमुना दयावा?

एक शांतताप्रिय व्यक्ति:

ते सापडणे सोप्पे नाही - कदाचित हजारात एक असेल. परंतु एका लपलेल्या खजिन्यासारखा शोध घेणे उचित आहे. देवाचा परिवार वाढविण्यासाठी त्यांचे मोल मोजता येणे शक्य नाही.

चर्चा करा

(10 min)

  1. ज्याला “वाईट प्रतिष्ठा” मिळाली आहे (जसे की एक शोमरोनी स्त्री किंवा गरसेकरांतील भूतग्रस्त माणूस) खरोखर तो शांतीचा व्यक्ती असू शकतो का? का किंवा का नाही?
  2. तुमच्या जवळचा असा कोणता समुदाय किंवा समाजाचा भाग आहे ज्यामध्ये राज्याची उपस्थिती कमी (किंवा नाही) आहे?
  3. शांतीचा व्यक्ती (असा कोणी जो खुला आहे, पाहुणचार करणारा आहे, इतरांना ओळखणारा आणि सांगणारा आहे) त्या समुदायात सुवार्तेच्या प्रसाराचा वेग कसा वाढवू शकतो?

क्रियाकलाप

(10 min)

बी.एल.इ.एस.एस. प्रार्थना

QR कोड स्कॅन करा.

दोन किंवा तीनच्या गटात विभाजित व्हा आणि B.L.E.S.S. प्रार्थनेतील पाच भागांच्या प्रार्थना करण्याचा सराव करा. एकमेकांसाठी प्रार्थना करा.

BLESS प्रार्थना नमुना

BLESS प्रार्थना नमुना द्वारे तुम्हाला पाच पद्धती प्राप्त होतात ज्याद्वारे तुम्ही तुम्हाला केव्हाही भेटणाऱ्या, परंतु विशेषतः प्रार्थना वाटचाल करिताना भेटणाऱ्या लोकांसाठी प्रार्थना करू शकता.

  • शरीर - आरोग्य
  • कष्ट - नोकरी आणि आर्थिक तरतूद
  • भावनिक -नीतिधैर्य)
  • सामाजिक - नातेसंबंध
  • आत्मिक - देवावर अधिक प्रीती करणे

क्रियाकलाप

(90 min)

प्रार्थनेतील वाटचाल

QR कोड स्कॅन करा.

दोन किंवा तीनच्या गटात विभाजित व्हा आणि प्रार्थनेतील वाटचालीचा सराव करण्याकरीता समुदायामध्ये जा.

एखादे ठिकाण निवडणे, आता तुम्ही जेथे आहात तेथून बाहेर चालून जाण्या इतके सोपे असू शकते, किंवा तुम्ही एखाद्या विशिष्ट गंतव्यस्थानावर जाण्याचा विचार करू शकता.

देव जसा मार्ग दाखवितो त्याप्रमाणे जा, आणि या क्रियाकलापात 60-90 मिनिटे घालविण्याची योजना बनवा.

सत्राची समाप्ती प्रार्थनेतील वाटचाल क्रियाकलापासह होते.

तुमच्या प्रार्थनेचे मार्गदर्शन करणारे चार स्रोत:

  1. निरीक्षण - तुम्हाला काय दिसते? तुम्हाला जर अंगणात पडलेले एखादे खेळणे दिसले तर तुमच्या परिसरातील लहान मुलांसाठी, कुटुंबांसाठी किंवा त्या भागातील शाळांसाठी प्रार्थना करण्याचे विचार तुमच्या मनात येतील.
  2. चिकित्सक अभ्यास - तुमच्याकडे काय माहिती उपलब्ध आहे? तुमच्या परिसराविषयी तुमच्या वाचनात काही आले असेल तर, तेथे राहणाऱ्या लोकांविषयी तुम्हाला काहीतरी माहित असेल, किंवा त्या भागात गुन्हेगारी किंवा अन्याय होत आहेत का हे कळाले असेल तर ह्या गोष्टींविषयी प्रार्थना करून देवाने कृती करावी हे मागा.
  3. प्रकटीकरण - पवित्र आत्मा एखाद्या विशिष्ट गरजेसाठी किंवा प्रार्थनेबाबत तुमच्या अंतःकरणाला ढोसणी देईल किंवा तुमच्या मनात एखादी कल्पना घालील. तिकडे लक्ष द्या - आणि प्रार्थना करा!
  4. शास्त्रभाग - तुमच्या प्रार्थना पदयात्रेच्या तयारीसाठी तुम्ही देवाच्या वचनाचा एखादा भाग वाचला असेल किंवा तुम्ही चालत असतांना, पवित्र आत्मा तुमच्या मनात एखादा शास्त्रभाग आणील. त्या शास्त्रभागाविषयी आणि त्या भागातील लोकांवर त्याचा कसा प्रभाव पडेल त्याविषयी प्रार्थना करा.

प्रभावाचे पाच क्षेत्र ज्यावर प्रार्थना केंद्रित करावी:

  1. सरकार - न्यायालयें, आयुक्तालये, किंवा कायदा अंमलबजावणी कार्यालये ह्यांसारखी सरकारी केंद्रे शोधा. त्या प्रदेशाच्या संरक्षणासाठी, न्यायासाठी आणि त्याच्या पुढाऱ्यांना धार्मिक सुज्ञता लाभावी म्हणून प्रार्थना करा.
  2. व्यवसाय आणि व्यापार - आर्थिक उलाढालीचे मोहल्ले किंवा बाजार अशासारखी व्यापारी केंद्रे शोधा आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करा. नैतिकदृष्ट्या योग्य गुंतवणूक आणि साधनसामग्रीचे योग्य व्यवस्थापन व्हावे म्हणून प्रार्थना करा. अर्थशास्त्रीय न्याय आणि संधी आणि नफेखोरीऐवजी लोकांना अधिक महत्व देतील असे उदार आणि धार्मिक दातें लाभावे म्हणून प्रार्थना करा.
  3. शिक्षण - शाळा आणि प्रशासकीय इमारतीं, व्यवसाय प्रशिक्षण केंद्रे, जमातीची महाविद्यालयें आणि विद्यापीठें यांसारखी शैक्षणिक केंद्रे शोधा आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करा. देवाचे सत्य शिकविण्यासाठी आणि त्यांच्या विद्यार्थ्यांच्या मनांचा सांभाळ करणारे नीतिमान शिक्षक लाभावे म्हणून प्रार्थना करा. लबाड्या आणि गोंधळ वाढवण्याचा प्रत्येक प्रयत्न हाणून पाडावा यासाठी देवाने हस्तक्षेप करावा म्हणून प्रार्थना करा. सेवा करून नेतृत्व करणारे सुद्न्य नागरिक ह्या संस्थांमधून तयार व्हावे म्हणून प्रार्थना करा.
  4. संदेशवहन आणि प्रसार माध्यमे - रेडिओ स्टेशन्स, टीव्ही स्टेशन्स आणि वर्तमानपत्रें प्रकाशक शोधा आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करा. देवाची गोष्ट/सुवार्ता आणि त्याच्या अनुयायांच्या साक्षी संपूर्ण शहरात आणि जगभर पसराव्या म्हणून प्रार्थना करा. देवाचा संदेश त्याच्या माध्यमाद्वारे त्याच्या लोकांप्रत पोहोचावा आणि सगळीकडचे देवाचे लोक देवाचे कार्य पाहतील असे व्हावे यासाठी प्रार्थना करा.
  5. आत्मिकता केंद्रे - चर्च इमारतीं, मशिदी किंवा मंदिरें ह्यांसारखी आत्मिक केंद्रें शोधा आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करा. प्रत्येक आत्मिक शोधकाला येशूमध्ये शांती आणि दिलासा मिळावा आणि त्याने कोणत्याही खोट्या धर्माने भलतीकडे जाऊ नये म्हणून प्रार्थना करा.

प्रार्थना करा

(5 min)

तुम्ही तुमच्या प्रार्थनेतील वाटचाल क्रियाकलापाला जाण्यापूर्वी, तुमचा वेळ एकत्र संपवण्यासाठी तुमच्या गटासोबत प्रार्थना करण्याचे सुनिश्चित करा.

देवाचे आभार माना की तो हरवलेल्या, शेवटच्या आणि सर्वात कमी लोकांवर प्रीती करतो - आपणही त्यात शामिल आहोत!

त्याला तुमचे हृदय आणि तुम्ही चालत असताना ज्यांना तुम्ही भेटाल त्यांचे हृदय त्याच्या (देवाच्या) कार्यासाठी खुले राहण्यास तयार करण्यासाठी सांगा.

सत्र 6

चेक-इन

(1 min)

सर्व सहभागी आणि फॅसिलिटेटर चेक-इन करा.

Or six.zume.training/checkin and use code: 1235

प्रार्थना करा

(5 min)

प्रार्थना करा आणि देवाचे आभार माना शेवटच्या सत्रात त्याने जे केले त्यासाठी, जेव्हा तुम्हाला आज्ञा पाळण्यास कठीण वाटते तेव्हा त्याला मदत करण्यास सांगा, आणि तुमच्या समयाचे एकत्रित नेतृत्व करण्यास पवित्र आत्म्याला आमंत्रित करा.

मागे वळून पहा

(5 min)

प्रारंभ करण्यापूर्वी, मागे वळून पहाण्यासाठी थोडा वेळ काढा.

शेवटच्या सत्राच्या शेवटी, तुमच्या गटातील प्रत्येकाला तुम्ही शिकलेल्या गोष्टींचा सराव करण्याचे आव्हान दिले गेले होते.

या आठवड्यात आपल्या गटाने कसे केले हे पाहण्यासाठी काही क्षण घ्या.

विहंगावलोकन (आढावा)

(1 min)

या सत्रात, आपण ही संकल्पना ऐकू आणि त्यावर चर्चा करू:

आणि आम्ही हे साधन (टूल) आमच्या टूलकिटमध्ये जोडू:

  • विश्वासू असणे हे ज्ञानापेक्षा चांगले आहे
  • 3/3 गट मीटिंग चा नमुना

READ

(5 min)

विश्वासूपणा

Zume प्रशिक्षणात आपलं स्वागत असो. ज्ञान व प्रशिक्षणापेक्षा विश्वासूपणा हे अध्यात्मीक परिपक्वतेचं उत्तम मोजमाप कसं आहे ह्याविषयी या सत्रात आपण पाहणार आहोत. आजकालच्या मंडळ्यांमध्ये दोन प्रकारच्या कल्पनेने अनेक समस्या निर्माण केल्या आहेत.

सर्वप्रथम म्हणजे एखादयाची अध्यात्मीक परिपक्वता ही त्यांना देवाचं वचन किती माहिते ह्यावर अवलंबून असतं. एखाद्याच्या विश्वासाचं मोजमाप म्हणजे - योग्य विश्वास - किंवा परंपरानिष्ठता.

दुसरी कल्पना अशी की नेतृत्व करण्याच्या क्षमतेला व सेवाकार्य सूरू करण्याअगोदर "संपूर्ण प्रशिक्षणाची" आवश्कता असते. त्यांचा समज असा असतो की संपूर्ण ज्ञान - हेच अध्यात्मीक परिपक्वतेचे उत्तम मोजमाप आहे.

पहिल्या समजूतीची समस्या अशी आहे की परंपरानिष्ठा - किंवा "योग्य विश्वासाची" समस्या अशी की सैतानाला मानुष्यापेक्षा शास्त्राचे ज्ञान अधिक असते. परमेश्र्वराचं वचन म्हणतं की - एकच देव आहे असा विश्वास तुम्ही ठेवा.

चांगली गोष्ट आहे! सैतानाचादेखील तोच विश्वास आहे-- म्हणूनच ते थरारतात.

त्यापेक्षा अध्यात्मीक परिपक्वतेचे अधिक योग्य मोजमाप म्हणजे ORTHOPRAXY म्हणजेच - "योग्य वागणूक". केवळ काय व किती माहिती आहे, ह्यानुसार अध्यात्मीक मोजमाप करण्याऐवजी आपलं लक्ष हे आज्ञापालन करून इतरांना त्याविषयी सांगण्याकडे असून विश्वासू होण्याकडे असायला हवं.

दुसऱ्या कल्पनेची समस्या अशी की - नेतृत्व करण्याकरता एखादाचे संपूर्ण प्रशिक्षण झाले पाहिजे परंतू संपूर्ण प्रशिक्षण हे कोणाचेच कधी होत नसतं.

येशूने असे करून दाखवले जेव्हा त्याने युवा पुढारी पाठवले जेव्हा त्यांना परमेश्वरातल्या राज्यातले अनेक महत्वाचे कार्य करण्यास शिकायचे होते.

परमेश्वराचं वचन सांगतं की - येशूने आपल्या बारा शिष्यांना एकत्र बोलावून त्यांना भूतप्रेतांवर व रोगराईवर संपूर्ण सामर्थ्य दिले / मग परमेश्वराच्या राज्याविषयी सांगण्याकरता व आजाऱ्यांना बरं करण्याकरता त्यांना त्याने पाठविले.

येशू तारणारा आहे ह्या पेत्राच्या विश्वासाच्या जाहिर होण्यापूर्वीच ह्या लोकांना पाठविण्यात आलेले - ज्याला आपण विश्वासाचं पहिलं पाऊल म्हणू. पाठविण्यात आल्यावरही येशूने पेत्राला अनेक वेळा. वाक्ताडन केले, त्याच्या अनेक चुकिंकरता, तरीही पुढे जाऊन पेत्राने येशूला नकारले. सर्वश्रेष्ठ कोण ह्यावर शिष्यांनी वाद घातलां व प्रत्येकाचा देवाच्या राज्यात काय कार्य असेल हयावरही.

त्यांना अजून भरपूर शिकायचं होतं पण जे माहिते ते इतरांना सांगण्यासाठी येशूने त्यांना कार्यरत केलं विश्वाससाची - ज्ञानापेक्षाही महत्वाच - येशूवर भाव ठेवल्यासोबतच ह्याच सुरवात होते.

प्रशिक्षणापेक्षा श्रेष्ठ - विश्वासूपणा - आपल्याला काय दिले आहे ह्यापेक्षा मोठे मोजमाप म्हणजे आपण काय करतो हे आहे.

आज्ञापालन करून ठाऊक असलेलं जर इतरांना सांगतो तर आपण अधिक विश्वासू असतो.

जर इतरांना काहीच न सांगता आज्ञापालन करण्यास नकार दिल्यास आपण अविश्वासू ठरतो.

शिष्य वाढवत असताना आपण योग्य तेच मोजमाप करत आहोत याची दक्षता बाळगूया.

चर्चा करा

(10 min)

  1. तुम्हाला आधीपासून माहित असलेल्या देवाच्या आज्ञांचा विचार करा. त्या गोष्टींचे पालन करण्याच्या आणि सामायिक करण्याच्या बाबतीत तुम्ही किती “विश्वासू” आहात?

READ

(75 min)

3/3 गट मिटिंग

झुमे प्रशिक्षणात पुन्हा आपले स्वागत आहे. या सत्रात, आपण शिकणार आहोत की 3/3 (टीप: "तीन-तृतीयांश" म्हणून उच्चार) गट ही बैठकीची एक पद्धत आहे जी येशूच्या अनुयायांना एकमेकांना येशूचे अनुसरण करण्यास मदत करते.

येशू म्हणाला -- "जिथे दोघे किंवा तिघे माझ्या नावात एकत्र येतात, तेथे मी आहे." हे एक सामर्थ्यशाली अभिवचन आहे, आणि येशूच्या प्रत्येक अनुयायाने याचा फायदा घ्यायला हवा. पण जेव्हा तुम्ही एका गटाच्या रूपात एकत्र येता, तेव्हा तुम्ही तुमचा वेळ कसा घालवला पाहिजे?

3/3 (टीप: "तीन-तृतीयांश" म्हणून उच्चार) गट असा आहे जो त्यांचा एकत्रित वेळ 3 भागांमध्ये विभाजित करतो, जेणेकरून ते येशूने आज्ञा दिलेल्या काही महत्त्वाच्या गोष्टींचे पालन करण्याचा सराव करू शकतील.

हा असा कार्य करतो:

  • मागे पहा (दृश्य - 1/3) गटाच्या वेळेचा पहिला तिसरा भाग आपण एकत्र असल्यापासून काय घडले ते मागे वळून पाहण्यात व्यतीत होतो.
  • वर पहा (दृश्य - 2/3) गटाच्या वेळेचा मधला तिसरा भाग पवित्रशास्त्र, चर्चा, आणि प्रार्थनेद्वारे देवाचे ज्ञान आणि मार्गदर्शन मिळविण्यासाठी वर पाण्यात व्यतीत होतो.
  • पुढे पहा (दृश्य - 3/3) गटाच्या वेळेचा शेवटचा तिसरा भाग आपण शिकलेल्या गोष्टी कशा लागू करू शकतो आणि त्यांचे पालन कसे करू शकतो यासाठी पुढे पाहण्यात व्यतीत होतो.

या सत्रात तुमच्या गटाला एका 3/3 गटाच्या छोट्या आवृत्तीमधून नेले जाईल जेणेकरून तुम्हाला वास्तविक जीवनात पूर्ण आवृत्तीसाठी तयार करण्यात मदत होईल. आध्यात्मिक श्वासोच्छवासावरील सत्र आठवते का? श्वास घ्या, देवाकडून ऐका. श्वास सोडा, तुम्ही जे ऐकता त्याचे पालन करा आणि ते इतरांसोबत शेअर करा. 3/3 गट म्हणजे हेच आहे. 3/3 गट म्हणजे असा गट जो त्यांचा वेळ 3 भागात विभागतो, जेणेकरून ते देवाकडून ऐकण्याचा आणि येशूने आज्ञा दिलेल्या काही महत्त्वाच्या गोष्टींचे पालन करण्याचा आणि त्या सामायिक करण्याचा सराव करू शकतील.

हे सत्र साधारण तासाभरपेक्षा थोडा वेळ अधिक चालेल, पण ते पटकन संपेल. जर तुमचा गट मोठा असेल किंवा ज्यांना सखोल चर्चा आवडत असेल, तर तुम्ही गटातील एका सदस्याला घड्याळ किंवा टाइमरसह तुम्हाला ट्रॅकवर ठेवण्यास मदत करण्यासाठी सांगू शकता.

वास्तविक जीवनात, हे टप्पे कमी वेगाने पुढे वाढतील, परंतु तुम्ही सराव करत असताना वेळ कमी पडणार नाही याची खात्री करून घ्या. कोणतेही टप्पे (स्टेप्स) वगळू नका - ते सर्व महत्वाचे आहेत!

लक्षात ठेवा 3/3 गट हा बायबल अभ्यासासारखा नाही - त्याचा एक उद्देश आहे! या अनुभवाला देवाने तुम्हाला एकत्र वेळ घालवण्यासाठी योजलेल्या चांगल्या गोष्टीसाठी भेटण्याचा आणि ती पाहण्याचा एक नवीन मार्ग शिकण्याची संधी म्हणून पहा. तयार आहात का? चला तर सुरुवात करूया!

मागे पाहणे

आपल्या गटातल्या सभासदांकरता प्रार्थना करत, आपले संघर्ष एकमेकांना सांगत व धन्यवाद देत आपण आपल्या वेळेतला पहिला तृतीयांश वेळ घालवू. आपण हे देखील पाहू (अथवा) पडताळू कि गेल्या वेळेच्या भेटीपासून आता पर्यंत गटातल्या प्रत्येक व्यक्तीला आज्ञा पळून, शिकलेल्या गोष्टी कोणाला सांगता आल्या का?

पहिला टप्पा (स्टेप 1): "आभार माना "

प्रत्येक व्यक्ती मनापासून कशासाठी आभारी आहे हे सांगण्याकरता वेळ काढा. ह्या ह्या विडिओ ला थांबवून, हे करा ... ऐकताय ना? खरोखर, आमची इच्छा आहे कि तुम्ही पॉझ बटन दाबून, गटातल्या प्रत्येकाने हे व्यक्त करावं कि तुम्ही परमेश्वराचे कशासाठी महापासून आभार मानता. तुम्ही परतून येईपर्यंत आम्ही इकडेच आहोत. (2 मिनिटे)

दुसरा टप्पा (स्टेप 2): "तुमचे संघर्ष व्यक्त करा " व "एकमेकांकरता प्रार्थना करा."

आता तुमच्या गटातल्या प्रत्येक व्यक्तीला त्यांचे संघर्ष व्यक्त करू द्या. कोणालातरी त्यांनी जे व्यक्त केलं त्याकरता प्रार्थना करू द्या. आता (पॉझ) करा, व्यक्त करा व प्रार्थना करा. (8 मिनिटे)

तिसरा टप्पा (स्टेप 3): " गटावर लक्ष केंद्रित करा."

प्रत्येक भेटीत, वेळ काढून, तुम्ही का भेटता हे आठवा (अथवा ) त्याची आठवण ठेवा - देवावर प्रेम करायला, इतरांवर प्रेम करायला, येशूबद्दल बोलायला व इतरांना त्याच्या विषयी बोलण्यास मदत करायला. ध्येयाकडे गटाचं लक्ष केंद्रित करण्याकरता बरेच मार्ग आहेत, पण ह्या सराव सत्राकरता कोणालातरी मत्तय 22:37-38 जोरात वाचायला सांगा. पॉझ करून वाचा. (2 मिनिटे)

चौथा टप्पा (स्टेप 4): "तपासणी करणे"

हा तो टप्पा आहे जो काही गट वगळू इच्चीतात, कारण ह्यात प्रश्न विचारले जातात जे कधीतरी कठीण असू शकतात. कृपया वगळू नका.

कठीण प्रश्न विचारावे इतके प्रेम येशू आपल्या अनुयायांवर करत होता. आपल्याला जर येशू सारखं व्हायचं असेल तर आपण हे करण्याइतकं प्रेम एकमेकांवर कार्यकाळ हवं. ह्या टप्प्यात गटातल्या प्रत्येक व्यक्तीने, गेल्या वेळी भेटल्यापासून त्यांनी परमेश्वराचे काय ऐकून कशाचे आज्ञापालन केले हे व्यक्त करायचे.

देव त्यांना मागच्या वेळी तुम्ही एकत्र असताना असे करण्यास सांगो. प्रत्येक झुमे सत्रात, आम्ही आमच्या 'पुढे पहा' स्टेपमध्ये या वचनबद्धतेची प्रतिकृती करतो जिथे आम्ही तुम्हाला आज्ञा पाळण्यास, सामायिक करण्यास, आणि प्रार्थना करण्यास सांगतो. आमच्या 'मागे पहा' स्टेपमध्ये आम्ही उत्तरदायीपणाची प्रतिकृती करतो जिथे आम्ही तुम्हाला त्याच वचनबद्धतेवर चेक-इन करण्यास सांगतो.

ह्या प्रशिक्षणात तुम्ही जर आतापर्यंत पुरेसा वेळ घालवत नसाल तर सुरवात करण्यास हि उत्तम वेळ आहे.

परमेश्वरावर प्रेम करण्यातला एक भाग म्हणजे त्याचे आज्ञा पालन करणे. एकमेकांवर प्रेम करणे म्हणजे जे परमेश्वराकडून काही ऐकतात, तर त्यांना त्याचे आज्ञापालन करण्यास मदत करणे. प्रेम म्हणजे एखाद्याची वचनबद्धता गंभीरपणे घेणे व त्यांच्याप्रती उदारपणे प्रेम दर्शविणे - सगळं काही एकाच वेळी.

पॉझ दाबा व प्रत्येकाला खालील प्रश्नांची उत्तरे देऊ द्या:

  • आतापर्यंत शिकलेल्या गोष्टींचे तुम्ही आज्ञापालन केले का?
  • तुम्ही जे शिकला, ते इतर कोणाला शिकवलं का?
  • गटात समाविष्ट झाल्यापासून तुम्ही तुमची कहाणी किंवा परमेश्वराची कथा कोणाला सांगितली का?

(12 मिनिटे)

आपल्या तीन तृतीयांश गटातल्या, " मागे पहा सत्राचा शेवट करत असताना, तुमच्या सत्राची अधिक मदत होईल ह्या करता ह्या काही गोष्टी.

झुमे मार्गदर्शन टिप्पणी:

कधीकधी गटात अशी एक व्यक्ती असते जी सर्वाधिक वेळ बोलते. असं होऊ देऊ नका. प्रत्येकजण मौलवान आहे, म्हणूनच प्रत्येकाला बोलण्याची संधी मिळू द्या. जर इतरांना बोलण्याची संधी मिळत नसेल तर नम्रपणे अधिक बोलणाऱ्याला आठवण करून द्या कि प्रत्येकाला संधी मिळायला हवी. (अथवा) प्रत्येकाचं ऐकायला हवं.

वर पाहणे

आपल्या एकत्रित असलेल्या वेळेतल्या मधल्या भागात, आपण परमेश्वराच्या पवित्र आत्म्याला आमंत्रित करतो, आपल्या गटाला देवाचं वचन समजण्यास मदत व आपले मार्गदर्शन करण्यास. आम्ही बायबल मधील एक उतारा मोठयाने वाचू आणि नंतर परमेश्वराच्या चांगल्या योजना व हेतू समजून घेण्यासाठी आणि समजून घेण्यात मदत करण्यासाठी गट म्हणून काही सोप्या प्रश्नांची उत्तरे देऊ.

**पहिला टप्पा (स्टेप 1): मार्गदर्शन करण्यास परमेश्वराच्या पवित्र आत्म्यास आमंत्रित करा. **

छोटीशी प्रार्थना करा. परमेश्वराशी साधं व थोडक्यात बोला. तुम्ही जे वाचणार आहात त्यातून तुम्हाला शिकवण्यास पवित्र आत्म्यास सांगा. पॉझ करा व प्रार्थना करा. (2 मिनिटे)

**दुसरा टप्पा (स्टेप 2 ): परमेश्वराचे वचन वाचा व प्रश्न विचारा. **

गटातल्या कोणालातरी बायबल (पवित्र शास्त्रातून) वाचायला सांगा ह्या सराव सत्राकरता लूक 18:9-14 वाचा. वाचून झाल्यावर, गटाने ह्या दोन प्रश्नांची उत्तर द्यायची.

  • ह्या शास्त्रभागाबद्दल तुम्हाला काय आवडले?
  • तुम्हाला काय आव्हानात्मक किंवा समजण्यास कठीण वाटले?

जर तुमच्या गटात तोंडी शिकणारे लोक असतील - असे लोक ज्यांना नीट वाचता येत नाही किंवा जे ऐकून शिकण्यास प्राधान्य देतात - तर तुम्ही शास्त्रभाग किमान दोनदा वाचला आहे याची खात्री करून घ्या.

पॉज बटन दाबा, नंतर वाचा आणि प्रश्नांची उत्तरे द्या. (10 मिनिटे)

आता कुणालातरी तोच शास्त्रभाग दुसर्यांदा (किंवा) पुन्हा वाचायला सांगा, आणि नंतर गटाने ह्या दोन प्रश्नांची उत्तरे द्यायची.

  • ह्या शास्त्रभागातल्या लोकांपासून आपण काय शिकू शकतो?
  • ह्या शास्त्रभागातून आपण परमेश्वराबद्दल काय शिकू शकतो?

शास्त्रभागाकडे लक्ष ठेवा व तो सोपा ठेवा! (10 मिनिटे)

आमच्या 3/3 गटाच्या वर पहा विभागाचा हा शेवट आहे, आणि तुमचे सत्र आणखी चांगले होण्यास मदत करण्यासाठी येथे काहीतरी आहे:

झुमे मार्गदर्शन टिप्पणी:

जेव्हा तुम्ही परमेश्वराच्या वचनाचा अभ्यास करता, तेव्हा त्याच्या वचनांवर लक्ष केंद्रित करा, इतर पुस्तकांवर, शिक्षकांवर किंवा मतांवर नाही. "तुमच्या मते ह्याचा अर्थ काय?" असं विचारण्यापेक्षा " हा शास्त्रभाग काय सांगतो?" असं विचारा. तुमच्या गटातल्या कोणाला जर शिकवण्याची हौस असेल तर त्यांना सौमतेने आठवण करून द्या कि परमेश्वराचा पवित्र आत्मा व परिपूर्ण वचन गटाला शिकवू शकतात. आपण सर्वजण एकत्र शिकण्यासाठी येथे आहोत. आणि चर्चेत शांतता किंवा विराम देण्यास घाबरू नका. शांततेत देखील परमेश्वर कार्य करत असतो. त्याच्या वचनावर लक्ष केंद्रित ठेवा, शास्त्रवचनाला चिकटून राहा व इतर सगळ्यांकरता देवावर विश्वास ठेवा.

पुढे पाहणे

आपल्या वेळेच्या शेवटच्या तिसऱ्या भागात, आपण पुढे पाहून देवाच्या वचनातून शिकलेल्या गोष्टींद्वारे आज्ञापालन कसे करावे आणि इतरांना प्रशिक्षित कसे करावे हे जाणून घेण्यावर लक्ष केंद्रित करणार आहोत. गटातील प्रत्येक सदस्य देवाला काही साधे प्रश्न विचारतो आणि नंतर प्रार्थनेत त्याच्या उत्तराची वाट पाहतो. मग आपण आपल्या वचनबद्धता सामायिक करतो व आचरणात आणतो आणि एकत्र आपला वेळ संपवताना प्रार्थना करतो.

स्टेप 1 - देवाच्या उद्देशासाठी प्रार्थना करणे

तुमच्या गटातील प्रत्येक व्यक्तीला शांतपणे प्रार्थना करण्यास आणि देवाला हे प्रश्न विचारण्यास सांगा:

  • हे देवा, तू मला जे शिकवत आहेस त्याचे मी कसे पालन करू शकतो आणि ते कसे लागू करू शकतो?
  • या शास्त्रभागाद्वारे मी कोणाला प्रशिक्षण देऊ शकतो जेणेकरून ते तुझ्या आज्ञा पाळण्यास आणि तुझ्यावर अधिक प्रीती करण्यास शिकू शकतील?
  • माझी साक्ष किंवा येशूबद्दलची तुझी सुवार्ता मी कोणाला सांगावी अशी तुझी इच्छा आहे?

पॉज बटन दाबा आणि नंतर प्रार्थना करा. (5 मिनिटे)

देवाच्या पवित्र आत्म्याला तुम्हाला विशिष्ट उत्तरे, विशिष्ट नावे, आणि विशिष्ट पावले दाखविण्यास सांगा, जी तुम्ही आता आणि तुमचा गट पुन्हा भेटेल तेव्हाच्या दरम्यान उचलू शकता.

**स्टेप 2 - एकत्रित राहण्याची वचनबद्धता **

तुमच्या गटातील प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक प्रश्नासाठी प्रभूकडून त्यांनी काय ऐकले ते सांगण्यास सांगा. एखाद्याने एक, दोन किंवा तिन्ही प्रश्नांसाठी प्रभूकडून काहीही ऐकले नसेल. ते फक्त असे सांगू शकतात की त्यांना उत्तर मिळाले नाही.

पण लक्षात ठेवा, गटाने प्रभूकडून ऐकले पाहिजे. येशू म्हणाला - "माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात." आणि तुमची आज्ञाधारक पावले जितकी अधिक विशिष्ट असतील तितकेच आपण पुन्हा भेटण्यापूर्वी त्यांचे पालन करणे सोपे होईल.

पॉज बटन दाबा, आणि नंतर तुम्ही जे ऐकले ते शेअर करा. (10 मिनिटे)

स्टेप 3 - तुमच्या योजनेचा सराव करणे

तुमचा एकत्र वेळ संपवण्यापूर्वी, तुमच्या 3/3 गटाला दोन किंवा तीन जणांच्या लहान गटात विभाजित करा आणि तुम्ही ऐकल्याप्रमाणे प्रभूने तुम्हाला जे करण्यास सांगितले आहे त्याचा सराव करा.

लक्षात ठेवा - आचरण म्हणजे आज्ञापालन करणे, प्रशिक्षण देणे (अथवा ) शिकवणे किंवा एकमेकांना सांगणे नव्हे तर ते तुमची तयारी त्याहूनही अधिक चांगल्या गोष्टींकरता करते. प्रत्येक छोट्या गटाने आपल्या सहभागीतेच्या वेळेची समाप्ती प्रार्थनेत करावी. विशेषतः त्या लोकांकरता प्रार्थना करा, तुमच्या मनात परमेश्वराने घातलेल्या योजनेकरता.

तुमच्या गटात जर असे लोक असतील जे तोंडी शिकणारे आहेत तर त्यांच्याकरता देवाच्या वचनाचा शास्त्रभाग पुन्हा एकदा वाचण्यासाठी वेळ काढा. अशाने सभेच्या नंतर व दुसऱ्या सभेआगोदर भेटणाऱ्यांना सांगण्यास, संपूर्ण गटास मदत होईल.

पॉझ करा, गटात जा, आचरण करत प्रार्थना करा. ज्यांच्याकडे विशेष वचनबद्धता नाही अशांनी त्यांची स्वतःची साक्ष किंवा देवाची कहाणी एकमेकांना सांगावी. (10 मिनिटे)

आपला वेळ एकत्र पूर्ण करणे

तुम्ही तुमच्या गटाला पुन्हा एकत्र आणता तेव्हा, आनंद साजरा करण्यासाठी थोडा वेळ काढा! तुम्ही "पुढे पहा" विभाग पूर्ण केला आहे आणि आता संपूर्ण 3/3 गट स्वरूपाचा सराव केला आहे.

तुमचा गट पुढच्या सत्रांमध्ये या व्हिडिओ मार्गदर्शकाशिवाय सराव करत राहील. या प्रक्रियेतून इतरांना गटाचे मार्गदर्शन करू देत आळीपाळीने सराव करा. तुम्ही दान प्राप्त शिक्षक असायला हवं असं नाही, केवळ ह्या सोप्या टप्पांचं पालन करा. तुम्ही निरोप घेण्याअगोदर, तुमचे सत्र अधिकोत्तम होण्यास एक सल्ला.

झुमे मार्गदर्शन टिप्पणी:

जगभरातले तीन तृतीयांश गट हे आपल्या सहभागीतेच्या वेळेत प्रभूभोजन किंवा निदान एक जेवण एकत्र करतात. परमेश्वराने आपल्याला अशा प्रकारची सहभागिता दिली आहे - हेतुतः शिकवण (शिक्षण) व वाढ व हेतुतः जीवन (जगणे) व नातीसंबंध जेणेकरून आपल्याला त्याचा पुत्र येशू ख्रिस्त्रा सारखं होण्यास सामर्थ, प्रोत्साहन व मदत मिळेल.

तर झालं तर - तुमच्या गटाने तीनही भागांचे आचरण केले (अथवा ) सराव केला. मागे पाहणे म्हणजेच गेल्या वेळेपासून आतापर्यंत आपण काय साध्य केले ते पाहणे, वर पाहणे - म्हणजेच आपल्या सहभागीतेद्वारे आपण काय शिकू हे समजण्यास देवाकडे लक्ष लावणे व पुढे पाहणे - म्हणजेच देवाने आपल्या मनात काय पेरले ह्याचे आचरण करणे - तेही आपण एकत्र नसताना.

तीन तृतीयांश गट - येशूसारखं बनण्यास आपली मदत करण्याकरता एक साधी व व्यावहारिक पद्धतीची भेट.

चर्चा करा

(10 min)

  1. काय तुम्हाला काही फरक आढळले आहेत का एका 3/3 गटामध्ये आणि एक बायबल स्टडीमध्ये किंवा पूर्वीच्या एका छोट्या गटामध्ये ज्याचा तुम्ही भाग होता (किंवा त्याविषयी ऐकले होते). जर असे असेल तर, त्या फरकांचा गटावर कसा परिणाम होईल?
  2. काय 3/3 गटाला एक साधारण चर्च मानले जाऊ शकते? का किंवा का नाही?

विहंगावलोकन (आढावा)

(1 min)

या सत्रात ऐकलेली संकल्पना:

या सत्रात ऐकलेले साधन:

  • विश्वासू असणे हे ज्ञानापेक्षा चांगले आहे
  • 3/3 गट मीटिंग चा नमुना

NEXT STEP

आज्ञापालन

या आठवड्यात तुम्ही तुमच्या 3/3 गटाच्या सरावा दरम्यान केलेल्या वचनबद्धतेच्या आधारे आज्ञापालन, प्रशिक्षण आणि शेअर (सामायिक) करण्यात वेळ घालवा.

सामायिक करा

तुमचा गट पुन्हा भेटण्यापूर्वी तुम्ही 3/3 गट स्वरूप (फॉरमॅट) कोणासोबत शेअर करावे यासाठी देवाकडे प्रार्थना करा आणि त्याला विचारा. तुम्ही जाण्यापूर्वी या व्यक्तीचे नाव गटाला सांगा.

सत्र 7

चेक-इन

(1 min)

सर्व सहभागी आणि फॅसिलिटेटर चेक-इन करा.

Or six.zume.training/checkin and use code: 4322

प्रार्थना करा

(5 min)

येशूचे विश्वासूपणे अनुसरण करण्याच्या गटाच्या वचनबद्धतेबद्दल प्रार्थना करा आणि देवाचे आभार माना आणि तुमच्या समयाचे एकत्रित नेतृत्व करण्यास पवित्र आत्म्याला आमंत्रित करा.

मागे वळून पहा

(5 min)

प्रारंभ करण्यापूर्वी, मागे वळून पहाण्यासाठी थोडा वेळ काढा.

शेवटच्या सत्राच्या शेवटी, तुमच्या गटातील प्रत्येकाला तुम्ही शिकलेल्या गोष्टींचा सराव करण्याचे आव्हान दिले गेले होते.

या आठवड्यात आपल्या गटाने कसे केले हे पाहण्यासाठी काही क्षण घ्या.

विहंगावलोकन (आढावा)

(1 min)

या सत्रात, आपण ही संकल्पना ऐकू आणि त्यावर चर्चा करू:

आणि आम्ही हे साधन (टूल) आमच्या टूलकिटमध्ये जोडू:

  • परिपक्व होणाऱ्या शिष्यांसाठी प्रशिक्षण चक्र
  • 3/3 गट मीटिंग चा नमुना

READ

(5 min)

प्रशिक्षण चक्र

Zume प्रशिक्षणात पुन्हा एकदा स्वागत. ह्या सत्रात आपण त्या प्रशिक्षण चक्राविषयी बोलणार आहोत ज्यात एका शिष्यापासून अनेक शिष्य बनतात व एक ध्येय ही एक चळवळ बनते.

सायकल चालवायला तुम्ही कधी शिकला का? कधी कोणाला चालवायला शिकवली का? असेल तर ह्या सायकल प्रशिक्षणाबद्दल तुम्हाला ठाऊकच असेल.

अगदी सोपं आहे - स्वतः करने, मदत करणे, लक्षपूर्वक पाहून, सोडून देणे. आठवा - तुम्ही सायकल चालवण्याअगोदर दुसऱ्या व्यक्तिला चालवताना पाहिले म्हणजेच कोणीतरी ते.

स्वतः केलं व तुम्ही पाहिलं.

स्वतः करा , मदत करा, पहा व सोडा.

स्वतः करणे म्हणजेच एखादी गोष्ट कशी करावी हे दुसऱ्याला स्वतः करून दाखविणे. एखादं मूल जेव्हा दुसऱ्याला सायकल चालवताना पाहतं तेव्हा त्याला त्या गोष्टीची कल्पना येते. स्वतः करण्यात पण हीच बाब आहे की -- ते पुन्हा पुन्हा करण्याची गरज नसते व बहूतेकदा ती एकदाच करावी लागते.

तुमच्या पहिल्यांदा चालवलं ते आठवा. तुम्ही केवळ पाहतच राहिला का? की तुम्हालाही प्रयत्न करण्याची उत्सुकता होती? तुम्हाला कोणी संधी दिली नसता तर?

दाखवण्यात अति केल्याने प्रशिक्षणाची क्रिया बिघडते. हयात केवळ थोडक्यात दाखवून इतरांना संधी देण्यात भर दयायला हवा. प्रथम सायकल चालवताना काय झालं? ते तुम्हाला सायकल हाती देऊन निघून गेले का?

बहूदा नाही. बहुतेक लोक जेव्हा सायकल चालवायला शिकतात, तेव्हा त्यांच्या सोबत कोणी ना कोणी असतच योग्य मार्ग दाखवायला.

त्यालाच मदत करणे म्हणतात.

स्वतः करा, मदत करा , पहा व सोडून द्या.

एखाद्या कौशल्याचा सराव होण्याकरता सहाय्यता करणे पण त्यांना अधिक बाधा येऊ नये ह्याची दक्षतादेखील बाळगणे. स्वतः करण्यापेक्षा मदत करण्यास जास्त वेळ लागतो. कधी हात धरावा लागतो दिशा दाखवावी लागते तर कधी मदत करावी लागते तर कधी मदत करावी लागते हा एक गट असल्याने पण त्यानेच पुढे जाता येणं हे महत्वाचं.

तुम्हाला वाटतं का की तुम्ही वेगाने चालवू लागल्यावर ती व्यक्ति तुमच्यासोबत धावत राहिल किंवा ती तितक्या लांब धावू शकेल? अशाने तुम्ही तुमचा तोल सावरू शकणार नाही.

सहाय्य करणे म्हणजे सुरवात करून देणे व त्यांना स्वतःहून पुढे जाण्यास संधी देणे. थसं करत असताना नकळत त्यांना पाहणाऱ्या लोकांकरता ती एक शिकवण असते. सायकलवर जसे तुमचेच हात असले तरी तुम्ही एकटे नसत. कोणाची तरी तुमच्यावर नजर असते - पण लांबूनच.

ते पाहत असतात.

स्वतः करा, सहाय्य करा, पहा व सोडा.

एखादया नवशिख्याचे कौशल्य सक्षम होईपर्यंत त्यांवर लक्ष ठेवणे म्हणजेच प्रभाव पाडणे असते तेही नियंत्रण हाती न घेता. एखादी व्यक्ति उठून जर पटकन सायकल चालवत असेल तर ह्याचा अर्थ असा नाही की त्यांना रस्त्याचे सर्व नियम माहितेयत. लक्ष देणे म्हणजेच समोरची व्यक्ति सुरक्षित आहे ही दक्षता बाळगणे - आजूबाजूला कोणीही नसलं तरी. लक्ष देणे म्हणजे कोणाला काय येतं इतकच नव्हे तर - कोणी पाहत नसताना ती व्यक्ति योग्य तेच करेल ही खात्री.

प्रशिक्षणाच्या ह्या टप्प्यात ती शिकाऊ व्यक्ति इतरांना कसं वाढाव हे शिकवत जाईल.. व शिकवत जाईल.. व शिकवत जाईल. शिष्य ते शिष्य करतील. ते शिष्य आणखी शिष्य करतील व ते आणखी करतील. आणकी पिढ्यांपिढ्या.

लक्ष देण्याचा अर्थ असाही होतो की शिकाऊ व्यक्ति परिपक्व होते हयाची खात्री करणे व त्याचप्रमाणे तो इतरांना मदतही करू शकतो. लक्ष देण्यात वेळ लागतो. खूप वेळा स्वतः करून दाखवणे व सहाय्यता करण्यापेक्षाही पण त्या वेळेचं चीझ होतं. कालांतराने -- चालकच वाहन चालवतो.

त्यालाच सोडणं असे म्हणतात.

स्वतः करणे, मदत करणे, लक्ष देणे**** व सोडणे.

सोडणं हे Graduation सारखं असतं. विद्धार्थी शिक्षक बनतो. कर्मचारी हा सहकर्मचारी बनतो शिष्य हा मित्र बनतो. सायकल चालवतानां शिकवणारी व्यक्ति तुमच्यासोबत दरवेळी नसते. अधूनमधून असू शकते. कधीकधी तुम्ही एकटे किंवा दुसऱ्यांसोबत चालवत जाऊ शकता.

सोडणे हे तुमच्या प्रिय व्यक्तीला दिलेलं जणू बक्षिस किंवा - दान असू शकतं. सोडणे म्हणजे तुम्ही गेला असाल त्या ठिकाणी जाण्याकरता किंवा अजून गेला नसाल अशा ठिकाणी जाण्याकरता. त्या व्यक्तीला प्रोसाहन देत एखादया व्यक्तिला तयार / सक्षम करणे.

स्वतः करणे, मदत करणे, लक्ष देणे, सोडणे. प्रशिक्षण चक्र.

एकापेक्षा अनेक. ध्येय्य ते चळवळ.

चर्चा करा

(10 min)

  1. तुम्ही कधी प्रशिक्षण चक्राचा (द ट्रेनिंग सायकल) भाग झाले आहात का?
  2. तुम्ही कोणाला प्रशिक्षण दिले? किंवा तुम्हाला प्रशिक्षण कोणी दिले?
  3. विभिन्न कौशल्ये शिकत असताना समान व्यक्ती प्रशिक्षण चक्राच्या (द ट्रेनिंग सायकलच्या) वेगवेगळ्या भागात असू शकते का?
  4. अशा प्रकारे एखाद्याला प्रशिक्षण देणे हे कसे दिसेल?

क्रियाकलाप

(90 min)

3/3 गट बैठक

QR कोड स्कॅन करा.

मागे वळून पाहा - एकमेकांशी चेक-इन करण्यासाठी शेवटच्या सत्रातील आज्ञापालन, प्रशिक्षण आणि सामायिक आव्हाने वापरा. (30 मि)

वर पहा - तुमच्या गटाचा वाचन परिच्छेद म्हणून मार्क 5:1-20 वापरा आणि वर पहा विभागादरम्यान 1-4 प्रश्नांची उत्तरे द्या. (30 मि)

पुढे पहा - तुम्ही कसे आज्ञापालन कराल, प्रशिक्षण द्याल आणि सामायिक कराल हे विकसित करण्यासाठी पुढे पहा विभागातील प्रश्न 5, 6 आणि 7 वापरा. (30 मि)

मागे वळून पाहणे

स्टेप 1 - आभार मानणे

प्रत्येक व्यक्तीला ते ज्यासाठी आभारी आहेत ते सामायिक करण्यासाठी वेळ द्या.

स्टेप 2 - तुमचे संघर्ष शेअर करणे आणि एकमेकांसाठी प्रार्थना करणे

तुमच्या गटातील प्रत्येक व्यक्तीला ते ज्या गोष्टीसाठी संघर्ष करत आहेत त्याबद्दल थोडक्यात सांगण्यास सांगा. ते जे काही शेअर करतात त्याबद्दल दुसऱ्या एखाद्याला त्यांच्यासाठी प्रार्थना करण्यास सांगा.

स्टेप 3 - गटावर लक्ष केंद्रित करणे

वेळ काढा आणि तुम्ही एकत्र का आहात हे लक्षात ठेवा - देवावर प्रीती करण्यासाठी, इतरांवर प्रीती करण्यासाठी, येशूबद्दल इतरांना सांगण्यासाठी, आणि इतरांनाही त्याच्याबद्दल सांगण्यास मदत करण्यासाठी.

स्टेप 4 - चेकिंग इन

प्रत्येक व्यक्तीला खालील प्रश्नांची उत्तरे देण्यास सांगा:

  • आतापर्यंत तुम्ही जे शिकलात त्याचे तुम्ही कसे आज्ञापालन केले आहे?
  • तुम्ही जे शिकलात त्यामध्ये तुम्ही कोणाला प्रशिक्षित केले आहे?
  • आपण एक गट म्हणून एकत्र असल्यापासून तुम्ही तुमची गोष्ट किंवा देवाची गोष्ट कोणासोबत शेअर (कोणाला सांगितली) केली आहे?)

वर पाहणे

स्टेप 1 - देवाच्या पवित्र आत्म्याला मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित करा

प्रार्थना करण्यासाठी थोडा वेळ घ्या. देवाशी सोप्या रीतीने आणि थोडक्यात बोला. तुम्ही वाचणार असलेल्या शास्त्रभागातून त्याच्या पवित्र आत्म्याला तुम्हाला शिकवण्यास सांगा.

स्टेप 2 - देवाचे वचन वाचा आणि प्रश्न विचारा

गटातील एखाद्याला बायबलमधून वाचायला सांगा. तुमचे वाचून झाल्यावर, गटाने या दोन प्रश्नांची उत्तरे द्यावीत:

  • तुम्हाला या शास्त्रभागाबद्दल काय आवडले?
  • तुम्हाला काय आव्हानात्मक वाटले किंवा समजण्यास कठीण वाटले?

तोच शास्त्रभाग दुसऱ्यांदा वाचा, आणि नंतर गटाला या दोन प्रश्नांची उत्तरे देण्यास सांगा:

  • आपण या शास्त्रभागामधून लोकांबद्दल काय शिकू शकतो?
  • आपण या शास्त्रभागामधून देवाबद्दल काय शिकू शकतो?

शास्त्रभागाला चिकटून राहण्याची आणि तो सोपा ठेवण्याची आठवण राहू द्या!

पुढे पाहणे

स्टेप 1 - देवाच्या उद्देशासाठी प्रार्थना करणे

तुमच्या गटातील प्रत्येक व्यक्तीला शांतपणे प्रार्थना करण्यास आणि देवाला हे प्रश्न विचारण्यास सांगा:

  • हे देवा, तू मला जे शिकवत आहेस त्याचे मी कसे पालन करू शकतो आणि ते कसे लागू करू शकतो?
  • या शास्त्रभागाद्वारे मी कोणाला प्रशिक्षण देऊ शकतो जेणेकरून ते तुझ्या आज्ञा पाळण्यास आणि तुझ्यावर अधिक प्रीती करण्यास शिकू शकतील?
  • माझी साक्ष किंवा येशूबद्दलची तुझी सुवार्ता मी कोणाला सांगावी अशी तुझी इच्छा आहे?

देवाच्या पवित्र आत्म्याला तुम्हाला विशिष्ट उत्तरे, विशिष्ट नावे, आणि विशिष्ट पावले दाखवण्यास सांगा जी तुम्ही आता आणि तुमचा गट पुन्हा भेटेल तेव्हा पर्यंतच्या दरम्यान उचलू शकता.

स्टेप 2 - एकत्रित राहण्याची वचनबद्धता

तुमच्या गटातील प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक प्रश्नासाठी प्रभूकडून त्यांनी काय ऐकले ते सांगण्यास सांगा. एखाद्याने एक, दोन किंवा तिन्ही प्रश्नांसाठी प्रभूकडून काहीही ऐकले नसेल. ते फक्त असे सांगू शकतात की त्यांना उत्तर मिळाले नाही.

पण लक्षात ठेवा, गटाने प्रभूकडून ऐकले पाहिजे. येशू म्हणाला - "माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात." आणि तुमची आज्ञाधारक पावले जितकी अधिक विशिष्ट असतील तितकेच आपण पुन्हा भेटण्यापूर्वी त्यांचे पालन करणे सोपे होईल.

स्टेप 3 - तुमच्या योजनेचा सराव करणे

तुमचा एकत्र वेळ संपवण्यापूर्वी, तुमच्या 3/3 गटाला दोन किंवा तीन जणांच्या लहान गटात विभाजित करा आणि तुम्ही ऐकल्याप्रमाणे प्रभूने तुम्हाला जे करण्यास सांगितले आहे त्याचा सराव करा.

चर्चा करा

(10 min)

  1. 3/3 गटाबद्दल तुम्हाला काय आवडले? का?
  2. सर्वात आव्हानात्मक काय होते? का?

विहंगावलोकन (आढावा)

(1 min)

या सत्रात ऐकलेली संकल्पना:

या सत्रात ऐकलेले साधन:

  • परिपक्व होणाऱ्या शिष्यांसाठी प्रशिक्षण चक्र
  • 3/3 गट मीटिंग चा नमुना

NEXT STEP

आज्ञापालन

तुम्ही Zúme मध्ये शिकलेले एक कौशल्य किंवा संकल्पना निवडा आणि ते एखाद्याने चौथ्या पिढीपर्यंत पुनरुत्पादित करत राहण्यासाठी त्याला मार्गदर्शन करा.

सामायिक करा

अतिरिक्त (पाचव्या) पिढीपर्यंत प्रक्रिया सुरू ठेवण्यासाठी तुम्ही मार्गदर्शन केलेल्या व्यक्तीला आव्हान द्या.

सत्र 8

चेक-इन

(1 min)

सर्व सहभागी आणि फॅसिलिटेटर चेक-इन करा.

Or six.zume.training/checkin and use code: 9870

प्रार्थना करा

(5 min)

तुमच्या गटाला या प्रशिक्षणात इतपर्यंत लागणारी उर्जा, लक्ष आणि विश्वासूपणा दिल्याबद्दल प्रार्थना करा आणि देवाचे आभार माना. देवाला मागा की त्याने त्याच्या पवित्र आत्म्याद्वारे गटातील प्रत्येकांना आठवण करून द्यावी की ते त्याच्याशिवाय काहीही करू शकत नाहीत!

मागे वळून पहा

(5 min)

प्रारंभ करण्यापूर्वी, मागे वळून पहाण्यासाठी थोडा वेळ काढा.

शेवटच्या सत्राच्या शेवटी, तुमच्या गटातील प्रत्येकाला तुम्ही शिकलेल्या गोष्टींचा सराव करण्याचे आव्हान दिले गेले होते.

या आठवड्यात आपल्या गटाने कसे केले हे पाहण्यासाठी काही क्षण घ्या.

विहंगावलोकन (आढावा)

(1 min)

या सत्रात, आपण ही संकल्पना ऐकू आणि त्यावर चर्चा करू:

आणि आम्ही हे साधन (टूल) आमच्या टूलकिटमध्ये जोडू:

  • नेतृत्वाचे गट (कक्ष)
  • 3/3 गट मीटिंग चा नमुना

READ

(5 min)

नेतृत्वाचे गट (कक्ष)

Zume प्रशिक्षणात तुमचं पुन्हा एकदा स्वागत. नेतृत्व गटात कमी वेळात शिष्यांना नेतृत्व करण्यास कसं तयार करतात ह्याबद्दल या सत्रात आपण बोलणार आहोत.

एकाचे दोन बनतात. दोनाचे चार चाराचे आठ. गुणाकार होतो. पिढ्यांची वाढ होते व तीव्र वाढ होते. कुटूंबाची वाढ अशीच व्हावी ही देवाची इच्छा असते. देवाच्या इच्छेप्रमाणेच कुटुंबाची वाढ झाल्यास ते भल्याचे असते. आपण 3/3rds पद्धत शिकलो ज्यात ग्राहक निर्माते बनतात विद्यार्थी पुढारी बनतात व शिष्य हे शिष्य करणारे बनतात.

मागे पहा - वर पहा - पुढे पहा - शिका आज्ञा पाळा - इतरांना सांगा.

अशा पद्धतीच्या भेटण्याने विश्वासणाऱ्यांची अध्यात्मीक वाढ होते व विश्वासणाऱ्यांच्या गटात देखिल शिष्यांची वाढ होत जाते. अशाने शिष्यांची वाढ होण्यास मदत होते.

पण एखादा गट जर कमी वेळाकरता एकत्र असेल तर? परमेश्र्वराच्या राज्याची व त्यांच्या स्वतःची वाढ होऊ शकेल का? नेतृत्व कक्ष तो आहे ज्यात 3/3rds पद्धत अशा पद्धतीने कार्यरत असते की एखादया गटाने किती काळ एकत्र राहावं ह्यावर मर्यादा असते.

नेतृत्व कक्षात कमी वेळात प्रत्येक शिष्याला वाढत जाण्याची पद्धत शिकविली जाते.

नेतृत्व कक्षात शिकाऊंना शिष्य वरून पुढारी बनविण्यात येते जे पुढे जाऊन नव्या गटांची, मंडळ्यांची स्थापना करून परमेश्वराचे कुटूंब वाढवतील.

एखादा गट कार्यरत असेल तरच नेतृत्व कक्ष कार्यरत असतो. स्थालांतर करणारे, विद्यार्थी, सैन्यातले कर्मचारी, हंगामी कर्मचारी जे येशूचे अनुयायी आहेत ह्या नेतृत्व कक्षात उत्तम कार्य करतात. त्यांच्या संस्कृतीमुळे, कामाच्या स्वरूपामुळे किंवा वयामुळे - गट चालवण्यापेक्षा ते जातिल तेथे गटाची स्थापना करणे त्यांना सोपे जाते.

नेतृत्व कक्ष तेव्हापण कार्यरत असतां जेव्हा एकाच गटातले लोक एकाच वेळी एकाच विश्वासात एकत्र येतात. एक परिवार, काही मित्रमंडळींचा गट किंवा एका छोट्याशा गावालादेखील कमी वेळात प्रशिक्षण देऊन आजीवन निर्माणकर्ते बनवता येईल - कुठल्याही अध्यात्मीक मार्गदर्शनाशिवाय किंवा पुनर्भेटिशिवाय.

पुर्वीच्या सत्रात आपण 3/3rds चे शेवटचे दोन भाग पाहिले. आता आपण त्या संपूर्ण पद्धतीचा सराव करूया -- तीन्ही भागांचा -- मागे पाहणे, वर पाहणे, पुढे पाहणे.

चर्चा करा

(10 min)

  1. तुमच्या ओळखींमध्ये येशूच्या अनुयायांचे गट आहेत का जे आधी पासूनच भेटत आहेत किंवा भेटण्यासाठी इच्छुक असून आणि एक नेतृत्व कक्ष (लीडरशिप सेल) तैयार करून Zúme प्रशिक्षण करू इच्छितात?
  2. त्यांना एकत्र आणण्यास काय करावे लागेल?

क्रियाकलाप

(90 min)

3/3 गट बैठक

QR कोड स्कॅन करा.

मागे वळून पाहा - एकमेकांशी चेक-इन करण्यासाठी शेवटच्या सत्रातील आज्ञापालन, प्रशिक्षण आणि सामायिक आव्हाने वापरा. (30 मि)

वर पहा - तुमच्या गटाच्या वाचनाचा भाग म्हणून प्रेषितांची कृत्ये 2: 42-47 वापरा आणि 1- 4 प्रश्नांची उत्तरे द्या. (30 मि)

पुढे पहा - तुम्ही कसे आज्ञापालन, प्रशिक्षण आणि सामायिक करा हे विकसित कराल, यासाठी प्रश्न 5, 6 आणि 7 चा उपयोग करा. (30 मि)

मागे वळून पाहणे

स्टेप 1 - आभार मानणे

प्रत्येक व्यक्तीला ते ज्यासाठी आभारी आहेत ते सामायिक करण्यासाठी वेळ द्या.

स्टेप 2 - तुमचे संघर्ष शेअर करणे आणि एकमेकांसाठी प्रार्थना करणे

तुमच्या गटातील प्रत्येक व्यक्तीला ते ज्या गोष्टीसाठी संघर्ष करत आहेत त्याबद्दल थोडक्यात सांगण्यास सांगा. ते जे काही शेअर करतात त्याबद्दल दुसऱ्या एखाद्याला त्यांच्यासाठी प्रार्थना करण्यास सांगा.

स्टेप 3 - गटावर लक्ष केंद्रित करणे

वेळ काढा आणि तुम्ही एकत्र का आहात हे लक्षात ठेवा - देवावर प्रीती करण्यासाठी, इतरांवर प्रीती करण्यासाठी, येशूबद्दल इतरांना सांगण्यासाठी, आणि इतरांनाही त्याच्याबद्दल सांगण्यास मदत करण्यासाठी.

स्टेप 4 - चेकिंग इन

प्रत्येक व्यक्तीला खालील प्रश्नांची उत्तरे देण्यास सांगा:

  • आतापर्यंत तुम्ही जे शिकलात त्याचे तुम्ही कसे आज्ञापालन केले आहे?
  • तुम्ही जे शिकलात त्यामध्ये तुम्ही कोणाला प्रशिक्षित केले आहे?
  • आपण एक गट म्हणून एकत्र असल्यापासून तुम्ही तुमची गोष्ट किंवा देवाची गोष्ट कोणासोबत शेअर (कोणाला सांगितली) केली आहे?)

वर पाहणे

स्टेप 1 - देवाच्या पवित्र आत्म्याला मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित करा

प्रार्थना करण्यासाठी थोडा वेळ घ्या. देवाशी सोप्या रीतीने आणि थोडक्यात बोला. तुम्ही वाचणार असलेल्या शास्त्रभागातून त्याच्या पवित्र आत्म्याला तुम्हाला शिकवण्यास सांगा.

स्टेप 2 - देवाचे वचन वाचा आणि प्रश्न विचारा

गटातील एखाद्याला बायबलमधून वाचायला सांगा. तुमचे वाचून झाल्यावर, गटाने या दोन प्रश्नांची उत्तरे द्यावीत:

  • तुम्हाला या शास्त्रभागाबद्दल काय आवडले?
  • तुम्हाला काय आव्हानात्मक वाटले किंवा समजण्यास कठीण वाटले?

तोच शास्त्रभाग दुसऱ्यांदा वाचा, आणि नंतर गटाला या दोन प्रश्नांची उत्तरे देण्यास सांगा:

  • आपण या शास्त्रभागामधून लोकांबद्दल काय शिकू शकतो?
  • आपण या शास्त्रभागामधून देवाबद्दल काय शिकू शकतो?

शास्त्रभागाला चिकटून राहण्याची आणि तो सोपा ठेवण्याची आठवण राहू द्या!

पुढे पाहणे

स्टेप 1 - देवाच्या उद्देशासाठी प्रार्थना करणे

तुमच्या गटातील प्रत्येक व्यक्तीला शांतपणे प्रार्थना करण्यास आणि देवाला हे प्रश्न विचारण्यास सांगा:

  • हे देवा, तू मला जे शिकवत आहेस त्याचे मी कसे पालन करू शकतो आणि ते कसे लागू करू शकतो?
  • या शास्त्रभागाद्वारे मी कोणाला प्रशिक्षण देऊ शकतो जेणेकरून ते तुझ्या आज्ञा पाळण्यास आणि तुझ्यावर अधिक प्रीती करण्यास शिकू शकतील?
  • माझी साक्ष किंवा येशूबद्दलची तुझी सुवार्ता मी कोणाला सांगावी अशी तुझी इच्छा आहे?

देवाच्या पवित्र आत्म्याला तुम्हाला विशिष्ट उत्तरे, विशिष्ट नावे, आणि विशिष्ट पावले दाखवण्यास सांगा जी तुम्ही आता आणि तुमचा गट पुन्हा भेटेल तेव्हा पर्यंतच्या दरम्यान उचलू शकता.

स्टेप 2 - एकत्रित राहण्याची वचनबद्धता

तुमच्या गटातील प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक प्रश्नासाठी प्रभूकडून त्यांनी काय ऐकले ते सांगण्यास सांगा. एखाद्याने एक, दोन किंवा तिन्ही प्रश्नांसाठी प्रभूकडून काहीही ऐकले नसेल. ते फक्त असे सांगू शकतात की त्यांना उत्तर मिळाले नाही.

पण लक्षात ठेवा, गटाने प्रभूकडून ऐकले पाहिजे. येशू म्हणाला - "माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात." आणि तुमची आज्ञाधारक पावले जितकी अधिक विशिष्ट असतील तितकेच आपण पुन्हा भेटण्यापूर्वी त्यांचे पालन करणे सोपे होईल.

स्टेप 3 - तुमच्या योजनेचा सराव करणे

तुमचा एकत्र वेळ संपवण्यापूर्वी, तुमच्या 3/3 गटाला दोन किंवा तीन जणांच्या लहान गटात विभाजित करा आणि तुम्ही ऐकल्याप्रमाणे प्रभूने तुम्हाला जे करण्यास सांगितले आहे त्याचा सराव करा.

विहंगावलोकन (आढावा)

(1 min)

या सत्रात ऐकलेली संकल्पना:

या सत्रात ऐकलेले साधन:

  • नेतृत्वाचे गट (कक्ष)
  • 3/3 गट मीटिंग चा नमुना

NEXT STEP

आज्ञापालन

तुमच्या 100 च्या यादीतून काही लोक निवडा जे आधीपासून विश्वासी आहेत. त्यांना नेतृत्वाचे कक्ष (लीडरशिप सेल) समजावून सांगा आणि त्यांना याचा एक भाग बनण्यास स्वारस्य आहे का ते पहा.

सामायिक करा

तुमचा गट पुन्हा भेटण्यापूर्वी तुम्ही कोणाला नेतृत्व कक्ष साधन सामायिक करावे अशी त्याची इच्छा आहे हे प्रार्थना करून देवाला विचारा. त्यांना आव्हान द्या की त्यांनी ते इतर कोणाशी तरी शेअर करावे.

सत्र 9

चेक-इन

(1 min)

सर्व सहभागी आणि फॅसिलिटेटर चेक-इन करा.

Or six.zume.training/checkin and use code: 1355

प्रार्थना करा

(5 min)

प्रार्थना करा आणि देवाचे आभार माना की त्याचे मार्ग आपले मार्ग नाहीत आणि त्याचे विचार आपले विचार नाहीत. त्याला तुमच्या गटाच्या प्रत्येक सदस्याला ख्रिस्ताचे मन देण्यास सांगा - नेहमी त्याच्या पित्याच्या कार्यावर लक्ष केंद्रित असलेले. तुमच्या समयाचे एकत्रित नेतृत्व करण्यासाठी पवित्र आत्म्याला सांगा आणि या सत्राला आता पर्यंतचे सर्वोत्कृष्ट सत्र बनवा.

मागे वळून पहा

(5 min)

प्रारंभ करण्यापूर्वी, मागे वळून पहाण्यासाठी थोडा वेळ काढा.

शेवटच्या सत्राच्या शेवटी, तुमच्या गटातील प्रत्येकाला तुम्ही शिकलेल्या गोष्टींचा सराव करण्याचे आव्हान दिले गेले होते.

या आठवड्यात आपल्या गटाने कसे केले हे पाहण्यासाठी काही क्षण घ्या.

विहंगावलोकन (आढावा)

(1 min)

या सत्रात, आपण या संकल्पना ऐकू आणि त्यावर चर्चा करू:

आणि आम्ही ही साधने आमच्या टूलकिटमध्ये जोडू:

  • क्रम-नसलेल्या वाढीची अपेक्षा करा
  • गुणात्मक वाढीची गती महत्वाची आहे
  • नेहमीच दोन चर्चचा भाग
  • मदतीची नोंदयादी (कोचिंग चेकलिस्ट)
  • चार क्षेत्र साधन
  • पिढीजन्य नकाशा (जनरेशनल मॅपिंग)

READ

(5 min)

क्रम-नसलेली वाढ

Zume प्रशिक्षणात पुन्हा एकदा स्वागत. परमेश्वराच्या राज्याच्या वाढीकरता सरळ विचारपद्धतीची सवय मोडण्याविषयी आपण ह्या सत्रात शिकणार आहोत. अनेक शिष्य बनवणारे शिष्य बनविण्याकरता आपण हे लक्षात ठेवायला हवं की अनेक गोष्टी एकाच वेळी वाढण्याकरता एक ठराविक क्रम नसतो.

क्रमवार नसलेल्या वाढीच्या क्षमतेबद्दल सामर्थ्याबद्दल आपण शिकणार आहोत. शिष्य वाढवण्याचा विचार केला की लोकांना ती एक टप्पेवारी क्रिया वाटते.

प्रथम प्रार्थना, मग तयारी. मग सुर्वार्ता सांगणे. मग शिष्य करणे. मग मंडळी स्थापन करणे. मग पुढारी तयार करणे. मग ते वाढवणे.

जेव्हा आपण हे शिक्षण घेतो तेव्हां ही प्रक्रिया व्यवस्थित टप्प्याटप्याने आपण आत्मसात करू शकतो. समस्या अशी आहे की हे असच दर वेळी होतं असं नाही. त्याहून मोठी समस्या म्हणजे हीच उत्तम पद्धत असते असं नाही.

एक रेष म्हणजे जणू मनुष्याचं जीवन, प्रथम जन्म, ह्यावेळेस प्रथमच ते परमेश्वराचं वचन ऐकतात.

ह्याच वेळी ते येशूचे अनुयायी होण्याची निवड करतात. ह्याच वेळी ते स्वतःची कहाणी व देवाची कथा सांगतात व ते वाढू लागतात. अन् हे आयुष्य येथे संपतं.

तर इथून इथे - येशूबद्दल ऐकण्यापासून येशूविषयी सांगण्यापर्यंत आपण ह्याला अध्यात्मीक पिढी / काळ म्हणतो.

वाढ होण्याअगोदरची वेळ. देवाचं कुटूंब वाढण्याअगोदरची वेळ. सहसा शिष्यत्व अशाच पद्धतीने शिकवलं जातं. पण जेव्हा आपण सर्वोत्कृष्ठ आशीर्वादाची पद्धत वापरतो - पहा काय होतं.

एक नवीन शिष्य ताबडतोब वाढू लागतो. अध्यात्मीक काळ कमी होतो. परमेश्र्वराची सुवार्ता कोणीतरी लवकर ऐकतं. परमेश्वराच्या कुटूंबाची वाढ अधिक गतीने होते. अनेक लोकांचं अनंत काळाकरता तारण होते.

आणि हे सर्व - वाढ होत असताना हालचाल करत राहणे. आपण जात राहिलो तर काय? कोणाची वाढ लवकर होत असली तर काय? विश्वास ठेवण्या अगोदरच ऐकल्याबरोबर कोणी इतरांना सांगत सुटलं तर काय?

काही जण येशूला "हो" म्हणण्याअगोदरच गट प्रस्थापीत करून शिकलेलं परमेश्वराचं वचन परिवारात व मित्र मंडळींना सांगण्यास तयार असतात. अशा लोकांना आपण जर सुर्वाता सांगण्याचं, ते इतर लोकांना सांगण्याचं प्रशिक्षण दिलं तर परमेश्वराचं कुटूंब अधिक गतीने वाढेल.

शिष्यत्व हा येशूकडे जाणारा मार्ग आहे, तारणानंतर सांगण्याची गोष्ट नव्हे. अशाच पद्धतीने एखादं कुटूंब, मित्र किंवा गांव येशूचे अनुयायी बनतात. पण कोणाची वाढ तीव्रतेने होत असेल तर? परमेश्वराच्या पुत्राला भेटण्याअगोदरच कोण परमेश्वराचा मार्ग दाखवत असेल तर?

एखादया गटाला परमेश्वराची सुवार्ता ऐकण्याची तयारी नसेल किंवा ऐकू शकत नसले तरी. पण हे गट नेतृत्व प्रशिक्षणाद्वारे किंवा समाज सुधारणे अंतर्गत - परमेश्वराचे मार्ग जाणू शकतात. असे गट परमेश्वराच्या पद्धती वाढण्याचे कार्य - शिकून आज्ञापालन करून - व इतरांना सांगण्याचे कार्य व त्यांनाही तेच करण्याची शिकवण देऊ शकतात - येशूबद्दल ऐकण्यापूर्वीच.

हे तेव्हाच होतं जेव्हा परमेश्वराचे मार्ग इच्छीत हृदयांमध्ये छापले जातात. त्याच्या पद्धती समाजात व वैयक्तिक जीवनात विणले जातात. परमेश्वराने आपला मार्ग तयार केल्यावर परमेश्वराच्या सुवार्तेचे सत्य त्यांना त्या मार्गावरचं उघडकीस केलं जातं. अशाच प्रकारे एखादी संस्था / समाज किंवा / एक राष्ट्रही येशूचे अनुयायी बनू शकतात.

क्रमवार नसलेल्या वाढीला तरीही गरज असते "अत्त्यावश्क" काय आहे? विचार करा. प्रक्रिया कशी पण असो- सर्वात मोठा प्रश्न एकच असतो - विश्वासू असणारी उत्तम माती कोणती? कोण परमेश्वराचा मार्ग शिकेल व त्याचा सराव ठेवेल?

उत्तम माती उघडकीस आणणे सर्वोत्तम हृदयांचा शोध लावणे - हे आपल्या वेळेचं, ताकदीचं व कष्टाचं चीझ आहे. अशांपूढेच आपण आपले हृदय ओतायला हवे (OR मोकळे करायला हवे). अशांकरताच आपण आपलं आयुष्य अर्पण करायला हवे. असेच लोक परमेश्वराचं राज्य सर्वोत्कृष्ठपणे वाढवितात.

चर्चा करा

(10 min)

  1. कोणता सर्वाधिक रोमांचक विचार तुम्ही या व्हिडिओ मध्ये ऐकला? का?
  2. सर्वात आव्हानात्मक कल्पना काय आहे? का?

READ

(5 min)

गती

Zume प्रशिक्षणात तुमचे स्वागत असो. वाढीचे महत्व काय व त्याहूनही तीव्र गतीने वाढण्याचे महत्व काय ह्याविषयी आजच्या सत्रात आपण बोलणार आहोत. हे सत्र हे गती विषयी आहे. गती म्हणजे वेळ - ख्कुठली गोष्ट लवकर होते की हळू. गतीचे महत्व आहे कारण त्याचा संबंध आपण अनंतकाळ कुठे असू ह्याच्याशी आहे. - आपल्या "जीवन" नामक काळापेक्षा - अधिक टिकणारं.

परमेश्र्वराचं वचन आपल्याला सांगतं की परमेश्वर आपल्या सोबत संय्यम बाळगतो - कोणाचाही नाश होऊ नये व प्रत्येक जण त्याच्या मागे यावा असे त्याला वाटतं. परमेश्वर आपल्याला जास्त वेळ देतो कारण त्याला माहित आहे की आपल्याजवळ करण्याकरता, अधिकाधिकांपर्यंत पोहोचण्याकरता कमी वेळ आहे.

येशूशी जवळीक साधण्याकरता आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायला हवं. आपण वेळ खाऊ शकत नाही. आपण आपली गती वाढवायला हवी.

जागतीक मंडळी -- जगातले सर्व येशूचे अनुयायी हे पूर्वी होते त्याहून सर्वाधिक आहेत. जागतीक मंडळी -- जगातले सर्व येशूचे अनुयायी -- हे जगातल्या जनसंख्येपेक्षा आज सर्वाधिक आहेत. ह्या आकड्यांच्या तुलनेत जागतीक मंडळीची वाढ ही जगाच्या जनसंख्येपेक्षा अधिक नाही.

म्हणजेच पूर्वीपेक्षा येशूचे अनुयायी जरी जास्त असले तरीही येशूचे अनुयायी नसलेल्या लोकांची संख्यादेखील तितकीच जास्त आहे, व हे लोकं अनंतकाळ त्याच्यापासून विभक्त होऊन राहतील.

वाढ करणाऱ्या शिष्यांचे महत्व आहे. एकाच शिष्याने सुरवात करा. त्यांची वाढ झाली व प्रत्येक अठरा महिन्यात एकदा जर वाढ झाली -तर दीढ वर्षात - तेच पुन्हा वाढत जातील - व दहा वर्षात, येशूचे ६४ नावे अनुयायी बनतील. ६४ लोक देवावर प्रीतीकरत अनंतकाळ राहतील.

पण आपण हेच पटपट केलं तर? आपली गती वाढवली तर?

त्यांची वाढ अठरा महिन्यांऐवजी - चार महिन्यात झाली तर ते तेच करतील, त्यामुळे मग - दहा वर्षात, येशूचे एक अब्ज नवे अनुयायी बनतील. विचार करा. शंभरापेक्षा कमी पेक्षा. एक अब्जाहूनही अधीक.

केवळ गती वाढविल्याने.

अठरा महिन्यांएवजी आपण चार महिन्यात ते करतोय म्हणजेच आपली गती साडेचार पटीने वाढवून. पण हा प्रयोग प्रत्येक शिष्याने १० वर्ष केला तर परमेश्वराचं कुटूंब पंधरा दश लक्ष पटीने वाढेल. शंभरापेक्षा कमी. एक अब्ज्यापेक्षा जास्त.

गती महत्वाची आहे.

आपली कहाणी, परमेश्वराची कथा सांगण्याने व कोणाला येशूकडे मार्ग दाखवल्याने परमेश्वराच्या कुटूंबाची वाढ होते. नवशिख्या शिष्याला हे इतरांना कसं सांगावं हे शिकवून परमेश्वराच्या कुटूंबाची वणण्याप्रमाणे वाढ होते. अतितीव्र गतीने.

जसं पीठातलं खमीर.

जसं Zume. केवळ गतीमुळे.

चर्चा करा

(10 min)

  1. गती महत्त्वाची का आहे?
  2. गतीसाठी देवाच्या प्राधान्यामध्ये अधिक चांगले संरेखित होण्यासाठी तुमच्या विचारसरणीत, तुमच्या कृतीत किंवा तुमच्या मनोवृत्तीत काय बदलण्याची गरज आहे?
  3. कोणती अशी एखादी गोष्ट आहे जी तुम्ही करू शकता या आठवड्याची सुरुवात करीत असताना जी काही फरक आणू शकेल?

READ

(5 min)

नेहमीच दोन चर्चचा भाग

Zume प्रशिक्षणात आपलं पुन्हा स्वागत. येशूचे अनुयायी हे दोन मंडळ्यांचा भाग कसे अशू शकतील एक वाढ करण्याकरता व विश्वासू अध्यात्मीक कुटूंबाला तीव्र गतीने वाढणारी मंडळी बनवण्याविषयी आजच्या ह्या सत्रात आपण बोलणार आहोत. परमेश्वराच्या वचनात म्हटल आहे की आपण अध्यात्मीक कुटूंब म्हणून जीवन व्यतीत करावं अशी त्याची योजना आहे. बाईबल ह्या परिवाराला एक मंडळी म्हणतो ज्याचे तीन प्रकार आहेतः

  • एक जागतीक मंडळी -- ज्यात पूर्वी असलेले, सध्या असलेले व पुढे असणारे विश्वासणारे असतील.
  • दुसरं प्रादेशिक मंडळी -- ज्यात एखादया शहरातली किंवा राष्ट्रातल्या प्रदेशातली मंडळी असेल.
  • साधी मंडळी -- तिसरी सर्वसाधारण मंडळी ज्यात एखादया छोट्या गटाचा किंवा कुटूंबाचा समावेश असेल.

छोटा गट म्हणजे - प्राथमिक मंडळी - म्हणजेच एक अध्यात्मीक कुटूंब जे वर्षानूवर्ष कार्य करत एक मेकाना भेटत राहू शकतं. असं होत असतानाच, येशूने आपल्या शिष्यांना सूचना दिल्या की त्यांनी सतत अध्यात्मीक कुटूंबाची स्थापना करत रहायला हवी, त्याची वाढ करावी व त्यांना नवे अध्यात्मीक परिवारांची स्थापना करण्याकरत सहाय्यता करावी.

येशूने म्हटले की - सर्व राष्ट्रात शिष्य करा, त्यांना पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तीस्मा दया व मी आज्ञा दिली त्याप्रमाणे आज्ञापालन करायला शिकवा. तर मग या दोन गोष्टी एकत्र कशा येतात - आपण मंडळीचाच भाग असून नवीन मंडळ्या स्थापन करण्याच्या प्रक्रियेत एकाच वेळी कसे अशू शकू?

एका छोट्या मंडळीची कल्पना करा - केवळ चार कुटूंब. प्रत्येक जण म्हणजे जणू एक जोडपं त्यांच्या परिवाराचं नेतृत्व करत आहेत.

सर्व जोडपी ही एकाच मंडळीचा भाग आहेत - हे त्यांचं एक अध्यात्मीक कुटूंब आहे, ते ह्यांच्यासोबत जीवन व्यतीत करतात - त्यांना प्रेमात व सत्कृत्यात प्रोत्साहन देतात त्यांचे बंधू भगिनी. पण हीच जोडपी नवीन अध्यात्मीक परिवाराची सुरवात करण्याकरता कार्यरत असू शकतात. त्यांचा सहभाग या प्राथमिक मंडळीसारखा नसेल पण ते इतरांना स्वतः दाखवून व सहाय्य करून नवे कुटूंब स्थापन करून वाढण्यासाठी कार्यरत असू शकतात.

कल्पना करा - की एका मंडळीतून एकाच वेळी चार नव्या मंडळ्या सुरू होतात. परमेश्वर त्याचं कुटूंब इतकं पटकन वाढवू शकतो. मंडळी देखील आपली गती अशीचं वाढवू शकतो.

अगोदरच्या सत्रात आपण प्रशिक्षण चक्र शिकलो. स्वतः करणे, सहाय्य करणे, लक्ष देणे व सोडणे. आपण हे ही पाहिलं की पहिल्या दोन गोष्टी आपण पटकन करायला हव्या जेणेकरून नवशिख्या शिष्यांची वाढ विश्वासात आरोग्यमय होत राहते.

मग प्राथमिक मंडळीसोबत व त्यांनी सुरू केलेल्या चार मंडळ्यांसोबत काय होऊ लागतं? स्वतः दाखवून व सहाय्य करून ही जोडपी नवी मंडळी स्थापन करतात पुढे जाऊन इतरांना वाट दाखवून सहाय्य करतात. या चार नवीन मंडळ्यांकरता आपली प्राथमिक मंडळी लक्ष ठेवण्याच्या टप्प्यावर असते जिथून ती हया चार मंडळ्यावर लक्ष ठेवून असतात हे करत असतानाच स्वतः दाखवून, सहाय्य करून आणखी नवीन मंडळ्या स्थापन करण्यास मदत करतात.

अधिकांश लोकांना एकापेक्षा अधिक अध्यात्मीक कुटुंबाला दाखवून सहाय्य करणे जमणार नाही. पण ते इतरांवर लक्ष ठेऊन त्याच्या गाठीभेटी घालून देऊ शकतील त्याच्या प्रगती व वाढीकरता.

म्हणजेच एक अध्यामिक कुटूंब - एक छोटी मंडळी - हे दुसरे व छोट्या मंडळींची स्थापना करण्यास एकाचवेळी आपला हातभार लावू शकतात. हे परिणामकारकच आहे. तर मग या मंडळ्यांचं काय होतं जे कित्येक पटीने नवनवीन मंडळ्या स्थापन करतात? ते परस्परसंबंध कसे जोडतात ? ते एक विस्तारीत अध्यात्मीक कुटूंब म्हणून आपल्या जीवन कसं व्यतित करतात?

हयाचं उत्तर असं आहे की हे सर्व आपल्या शरीरातल्या मासपेशिंसारखं आहे ज्यांचा संबंध प्रादेशिक मंडळीद्वारे जोडला जातो. सर्व मंडळ्यांचे संबंध असतात. त्यांचा अध्यात्मीक DNA एकच असतो त्याचा संबंध त्या प्राथमिक परिवाराशी जोडला असतो.

अन् आता -- एक मार्गदर्शन हे एखादया मोठ्या कार्याकरता एकत्र येतातच.

चर्चा करा

(10 min)

  1. कोणते फायदे आहेत सातत्याने राहणारे अध्यात्मिक कुटुंब टिकवून ठेवण्याचे जे अशा नवीन कुटुंबांना जन्म देतात जे वाढतात आणि ज्यांची गुणात्मक वाढ होते याऐवजी कि एक कुटुंब सतत वाढत आहे आणि विभाजित होते वाढण्याकरिता?

READ

(5 min)

मदतीची नोंदयादी (कोचिंग चेकलिस्ट)

येशूने म्हटले - "आपल्या मित्रांकरता आपला प्राण द्यावा यापेक्षा कोणाची प्रीति मोठी नाहीं." येशू आपल्या सांगितले व पुन्हा पुन्हा दर्शविले की परमेश्वराचा परिवार सर्वाधिक गतीने तेव्हाच वाढतो जेव्हा आपण आपल्या इच्छा परमेश्वराच्या इच्छेकरता बाजूला सरतो.

मदतीची नोंदयादी हे एक साधे साधन आहे ज्याने तुम्हाला ZUME प्रशिक्षणातल्या विविध टप्प्यांतून पार जाण्याकरता मदत मिळेल उदा प्रशिक्षण चक्र किंवा त्यांची शंभराची यादी.

दुसऱ्यांमधले कोणते कौशल्य तुम्ही वाढवू इच्छीता? कुठल्या बाबतीत अजून सुधारणा व्हायची गरज आहे?

तुम्ही जाल तिथे परमेश्वराच्या कुटूंबात, येशूच्या शिष्यांना पुढारी बनविण्यास मदत करण्याकरता मदतीची नोंदयादी तुम्हाला लक्ष केंद्रित करण्याकरता उपयोगी ठरेल. पण हो, ह्या वेळ व कष्ट लागतात.

हो, परमेश्वराच्या परिपूर्ण योजने करता तुमच्या प्राधान्यांना मागे ठेऊन इतर त्यागही करावे लागतात. अन् हो, हे सर्व करण्यायोग्यच आहे.

मदतीची नोंद यादी हे ZUME साधनसामग्रीतले एक सोपे साधन आहे तुम्ही आयुष्यातल्या सर्वात श्रेष्ठ खेळात सहभागी असाल - परमेश्वराच्या कार्यात.

क्रियाकलाप

(20 min)

Coaching Checklist

QR कोड स्कॅन करा किंवा कागदाचा तुकडा घ्या.

ओळ 1 वापरून स्वतः स्वतःचे मूल्यमापन करा आणि कोचिंग चेकलिस्टवर (मदतीच्या नोंदयादीवर) संबंधित कॉलम चिन्हांकित करा.

चर्चा करा

(10 min)

  1. कोणत्या साधनाचे आणि संकल्पनेचे तुम्ही चांगल्या प्रकारे प्रशिक्षण देऊ शकाल असे तुम्हाला वाटले?
  2. कोणत्या साधनाचे आणि संकल्पनेचे तुम्ही चांगल्या प्रकारे प्रशिक्षण देण्यासाठी संघर्ष कराल असे तुम्हाला वाटले?
  3. अशी कोणतीही साधने आणि संकल्पना आहेत का ज्यांना तुम्ही नोंदयादीमध्ये (चेकलिस्टमध्ये) जोडू किंवा त्यामधून वजा करु शकता? का?

क्रियाकलाप

(5 min)

Get a Coach

लक्षात ठेवा - प्रशिक्षण भागीदाराला किंवा इतर मार्गदर्शकाला तुमच्या मदतीच्या नोंदयादीचे (कोचिंग चेकलिस्ट) निकाल सांगण्यासाठी सुनिश्चित असा.

तुमच्याकडे प्रशिक्षक किंवा मार्गदर्शक नसल्यास, QR कोड स्कॅन करा आणि आता एक मिळवण्यासाठी विनंती करा.

चार क्षेत्र (फोर फील्ड्स) आणि पिढीजन्य नकाशा (जनरेशनल मॅपिंग) ही वाढत्या कार्याच्या प्रयत्नांसाठी डिझाइन केलेली साधने आहेत.

स्मरणपत्र: तुमच्या स्थानिक भागात (क्षेत्रात) ही साधने लागू करण्यात तुम्हाला मदत करण्यासाठी Zúme कोच उपलब्ध आहेत.

चार क्षेत्र

काम कसे चालले आहे याचा आढावा घेण्यासाठी येशू अनेकदा शिष्यांना सेवाकार्यापासून दूर शांत ठिकाणी नेत असे.

चार क्षेत्र हे एक सोपे साधन आहे ज्याचा उपयोग नेतृत्व कक्षाद्वारे केला जातो सध्याच्या प्रयत्नांची स्थिती आणि त्यांच्या सभोवताली असणारा राज्याचा क्रियाकलाप यावर प्रतिबिंबित होण्यासाठी. याद्वारे विशेषत: नेत्यांना प्रयत्न संतुलित करण्यास मदत होते, जेणेकरून कोणत्याही क्षेत्राकडे दुर्लक्ष केले जात नाही.

पुढील दोन स्लाइड्सचे पुनरावलोकन करा: फील्ड (क्षेत्र) वर्णन आणि चार क्षेत्र उदाहरणे

फील्ड (क्षेत्र) वर्णन

चर्चा करा

(10 min)

  1. तुमच्या आजूबाजूला रिकामे क्षेत्र ओळखा. तुम्ही ज्या समुदायांशी किंवा लोकांच्या गटांशी जोडलेले आहात त्यांच्याकडे कोणतीही सुवार्ता क्रियाकलाप नाही?
  2. एखाद्या क्षेत्राकडे दुर्लक्ष झाल्यास दीर्घकालीन वाढीवर कसा परिणाम होतो? उदाहरणे द्या.
  3. कोणती Zúme साधने कोणत्या क्षेत्रात मदत करू शकतात?

पिढीजन्य नकाशा (जनरेशनल मॅपिंग)

चळवळीतील नेत्यांना त्यांच्या आजूबाजूची वाढ समजून घेण्यास मदत करण्यासाठी पिढीजन्य नकाशा (जनरेशन मॅपिंग) हे आणखी एक सोपे साधन आहे.

कागदाच्या तुकड्यावर किंवा कागदाच्या अनेक तुकड्यांवर पिढीच्या झाडाचा नकाशा काढला जाऊ शकतो. हा नकाशा गुणाकारात कुठे थांबे आहेत हे दर्शविण्यात मदत करतो आणि प्रशिक्षण आवश्यक असू शकते. चळवळीचे आरोग्य ही नेत्यांसाठी सर्वात महत्त्वाची बाब आहे आणि फलदायीपणा हा आरोग्य मापण्याचा सर्वोच्च मार्ग आहे.

पुढील स्लाइडवर उदाहरण पाहा.

चर्चा करा

(10 min)

पुढील चर्चा करण्यासाठी पिढीजन्य नकाशा (जनरेशनल मॅपिंग) उदाहरण वापरा:

  1. कोणत्या नेत्यांचा गुणात्मक वाढ दिसत आहे?
  2. तुम्ही पुढे कोणते गट गुणात्मक रीतीने वाढण्याची अपेक्षा कराल?
  3. कोणते नेते इतर नेत्यांना मदत आणि मजबूत करू शकतात?
  4. कोणत्याही पिढ्यांमध्ये कमकुवत जबाबदारीचा नमुना तुम्हाला दिसत आहे का?

विहंगावलोकन (आढावा)

(1 min)

या सत्रात ऐकलेल्या संकल्पना:

या सत्रात ऐकलेली साधने:

  • क्रम-नसलेल्या वाढीची अपेक्षा करा
  • गुणात्मक वाढीची गती महत्वाची आहे
  • नेहमीच दोन चर्चचा भाग
  • मदतीची नोंदयादी (कोचिंग चेकलिस्ट)
  • चार क्षेत्र साधन
  • पिढीजन्य नकाशा (जनरेशनल मॅपिंग)

NEXT STEP

आज्ञापालन

गती ची संकल्पना एका मित्रासोबत शेअर करण्याचा सराव करा आणि ती तुमच्या हृदयात आणि प्राणात खोलवर रुजवण्यासाठी परमेश्वराकडे प्रार्थना करा. परमेश्वराला विचारा कि तुम्ही कोणासोबत ही शेअर करावी अशी त्याची इच्छा आहे.

सामायिक करा

जर तुम्ही तुमचे स्वतःचे साधारण चर्च आधीच सुरू केले असेल, तर त्यातील लोकांसोबत “नेहमी दोन चर्चचा भाग” ही संकल्पना शेअर करा. नसल्यास, ती तुमच्या ओळखीच्या दुसऱ्या विश्वासी व्यक्तीसोबत शेअर करा.

सत्र 10

चेक-इन

(1 min)

सर्व सहभागी आणि फॅसिलिटेटर चेक-इन करा.

Or six.zume.training/checkin and use code: 5430

प्रार्थना करा

(5 min)

प्रार्थना करा आणि देवाचे आभार माना की तो आपल्यामध्ये त्याचे चांगले कार्य पूर्ण करण्यासाठी विश्वासू आहे.

ज्या महान गोष्टी तो तुमच्यामध्ये आणि तुमच्याद्वारे करू इच्छित आहे त्यासाठी त्याला तुमच्या गटाला स्पष्ट डोके आणि मोकळे अंतःकरण देण्यास सांगा.

पवित्र आत्म्याला तुमच्या वेळेचे एकत्रितपणे नेतृत्व करण्यास सांगा आणि त्याच्या विश्वासूपणाबद्दल देखील त्याचे आभार माना. त्याने तुम्हाला इतपर्यंत पार आणले आहे!

मागे वळून पहा

(5 min)

प्रारंभ करण्यापूर्वी, मागे वळून पहाण्यासाठी थोडा वेळ काढा.

शेवटच्या सत्राच्या शेवटी, तुमच्या गटातील प्रत्येकाला तुम्ही शिकलेल्या गोष्टींचा सराव करण्याचे आव्हान दिले गेले होते.

या आठवड्यात आपल्या गटाने कसे केले हे पाहण्यासाठी काही क्षण घ्या.

प्रोत्साहित व्हा...

तुम्हाला कदाचित हे माहित नसेल, परंतु तुम्हाकडे आता साधारण चर्च सुरू करण्यासाठी आणि जगभरातील अनेक पास्टर्स आणि मिशनऱ्यांपेक्षा गुणात्मक वाढ होणारे शिष्य बनवण्याचे अधिक व्यावहारिक प्रशिक्षण आहे!

तरीही Zúme प्रशिक्षण ही फक्त सुरुवात आहे! या सत्रात, आम्ही प्रशिक्षणानंतर काय घडते याची एक योजना बनवू आणि तुम्ही जे शिकलात ते अंमलात आणताना तुम्हाला तुमच्या प्रवासात नंतर आवश्यक असलेल्या साधनांची थोडक्यात माहिती देऊ.

विहंगावलोकन (आढावा)

(1 min)

या सत्रात, आपण ही संकल्पना ऐकू आणि त्यावर चर्चा करू:

आणि आम्ही ही साधने आमच्या टूलकिटमध्ये जोडू:

  • परस्परसंबंधांमधील नेतृत्व
  • समविचारी मदतगार गट
  • तीन महिन्यांची योजना

READ

(5 min)

परस्परसंबंधांमधील नेतृत्व

Zume प्रशिक्षणात पुन्हा स्वागत. या सत्रात आपण पाहणार आहोत की परस्परसंबंधांमधील नेतृत्वामुळे छोट्या मंडळ्यांचे गट कसे वाढू शकतात, नवे पुढारी कसे बनतात व लोकांकरता परमेश्वराची असलेली उत्तम इच्छा कशी साध्य करता येते.

तर मग त्या मंडळ्यांचे काय होते जे कित्येक पटीने वाढत जातात? ते परस्परसंबंध कसे जोडतात? ते एक विस्तारीत अध्यात्मीक कुटूंब म्हणून आपलं जीवन कसं व्यतित करतात?

हयाचं उत्तर असं आहे की हे सर्व आपल्या शरिरातल्या मासपेशांसारखं आहे ज्यांचा संबंध प्रादेशिक मंडळीद्वारे जोडला जातो.

सर्व मंडळ्यांचे संबंध असतात. त्यांचा अध्यात्मीक DNA एकचं असतो. त्यांचा संबंध त्या प्राथमिक परिवारासोबत जोडला असतो. अन् आता -- एक मार्गदर्शक - ते एखादया मोठ्या कार्याकरता एकत्र येतातच. शहरी व प्रदेशिक स्थरावर परमेश्वराचं वचन हे दर्शवतं कि विश्वासणाऱ्यांची सेवा नव पुढारी करत असतात.

नव्याकरारात ह्या सेवकांना Elders व Deacons असं म्हणतात. मेंढरांवर लक्ष ठेवणारे व मेढपाळ. परमेश्वराच्या वचनात आपण पाहतो की यरूशलेमातल्या कित्येक छोट्या मंडळ्यांची सेवा सात सेवकांच्या एक गट करत होता.

परमेश्वराच्या वचनात आपण असेही पाहतो की इफिसच्या मंडळीची सेवा काही थोर मेंढपाळ करत - जे येशू ह्या उत्तम मेंढपाळासारखे वागत व आपल्या मेंढरांकरता आयुष्य अर्पण करत.

त्या शहरात किंवा प्रदेशात आपण नेतृत्वाचे पाच दान त्या गटात पाहतो. परमेश्वराचं वचन म्हणतं की -- ख्रिस्ताची मंडळी स्थापन होण्याकरता येशूने स्वतःला, संदेष्ट्यांना, सुसमाचारकांना, पाळकांना, शिक्षकांना, लोकांच्या सेवेकरता कार्यरत ठेवले.

हे अध्यात्मीक दान ह्याकरता दिले नाही की त्यांचा उपयोग केवळ एका छोट्या गटाला होईल पण हयासाठी की सेवा करून येशूचे शिष्य करण्यात येतिल म्हणून - म्हणजे सर्व विश्वासणारे मिळून एकत्रीत पणे परमेश्र्वराची इच्छा सिद्धीस नेतील.

ह्या खेरीज हे पुढारी आपापसात देखील भेटून एकमेकांना भेटून, प्रार्थना करून प्रोत्साहन देतात जसं त्यांची मुळची मंडळी त्यांच्यासाठी करायची.

3/30 पद्धत नेतृत्व प्रशिक्षण सभेत व समविचारी मदतगार सभेत वापरण्यात येतं.

चौथी पद्धत ही देखील विश्वास वाढवण्यासाठी आवबल उंचावण्यासाठी अगदी ह्यापूर्वीच्या पद्धतीप्रमाणेच असते.

जेव्हा पुढारी भेटतात तेव्हा केवळ वैय्यक्तीक घडमोडी एकमेकांना न सांगता परस्परसंबंधांमध्ये काय चालल आहे हे ही बोलतात. ते सेवाकरत असलेल्या कुटूंबाचं प्रतिनिधित्व करतात. अध्यात्मीक कुटुंबांकरता उत्तम स्थान तेच असतं / जेथे हे संबंध सुरू झालेले असतात. उदा तंम्पा येथून सुरू होणारे संबंध हयातून तंम्पा शहरी मंडळीची स्थापना करेल. वाढत व सेवा करत असताना / ते त्याच संबंधांचे प्रतिनिधित्व करेल, त्यांच्यासाठीच करेल. इतरांना देशभरात पाठवून सेवा करत असताना ते राष्ट्रीय व अंतराष्ट्रीय स्थरावर कार्य करतील, बहुमोठा मार्गदर्शन करतील.

येशूने म्हटले - तुम्ही जर थोड्यात विश्वासू असाल तर तुम्ही बहूतांशामध्ये पण विश्वासू असाल.

ह्या मंडळ्यांचे परस्परसंबंध हे त्यांच्या समान असलेल्या अध्यात्मीक DNA मुळे आहेत. व अंशधारी सुरवातीमुळे कधीकधी ह्या संबंधांची वाट सुरू होते भाषा व लोकांना भेटण्याच्या संधी नुसारही.

हा वाढीचाच भाग आहे, समस्येचा नाही. एखादया चळवळीचा अध्यात्मीक DNA म्हणजे विश्वासणाऱ्यांची शिकण्याची, आज्ञापालन करण्याची, इतरांना सांगण्याची इच्छा असते. जर हे यशस्वीपणे पिढ्यांपिढ्या, मंडळी ते मंडळी, विश्वासणाऱ्यांपासून विश्वासणाऱ्यांपर्यंत पोहोचलं तर नव्या चळवळीकरता लागणारं सर्व मिळतं ज्यात नवे शिष्य लाभतात जे पुढची वाढ करतील व त्यांचे अस्तीत्व सध्याच्या अध्यात्मीक कुटूंबात व येशूच्या प्रत्येक शिष्यात असते.

जेव्हा एक चळवळ दुसऱ्याला जन्म देते तेव्हा आपण वाढ पाहतो... शहरात प्रदेशात व राष्ट्रात. अशाच प्रकारे परमेश्वराच राज्य येतं जसं स्वर्गात तसच पृथ्वीवरही अशाच प्रकारे आपण सर्वात मोठी आज्ञा पाळू शकू, सर्व राष्ट्रात शिष्य करून.

चर्चा करा

(10 min)

  1. काय फायदे आहेत जेव्हा साधारण चर्चचे नेटवर्क खोल, वैयक्तिक नातेसंबंधाने जोडले जातात? कोणती उदाहरणे मनामध्ये येतात?

READ

(5 min)

समविचारी मदतगार

येशूने म्हटले - "मी तुम्हांस नवी आज्ञा देतो की तुम्ही एकमेकांवर प्रीति करावी, जशी मी तुम्हांवर प्रीति केली तशी तुम्ही ही एकमेकांवर प्रीति करावी. तुमची एकमेकांवर प्रीति असली म्हणजे त्यावरून सर्व ओळखतील की तुम्ही माझे शिष्य आहात."

समविचारी मदतगार गट हा असा गट असतो जे ३/३ गटाचे नेतृत्व करतात किंवा करू इच्छीतात. हयात ३/३ची पद्धत वापरली जाते व तुमच्या श्रेत्रात आध्यात्मीक आरोग्य तापसण्याकरता ही एक प्रभावी पद्धत आहे.

समविचारी मदतगार गटात येशूचे अनुयायी असणाऱ्या पुढारी ते पुढारी ह्यांच्यातील मदतीचा वापर होतो, जे मंडळ्यातले, सेवाकार्थी संस्थेतले किंवा जागतीक संपर्कात असलेल्या जगभरात पोच असलेल्या मंडळ्यातले लोक अशू शकतात.

समविचारी मदतगार गट हे शास्त्रातील येशूच्या सेवाकार्यातून शिकतात, एकमेकांना प्रश्न विचारतात, प्रतिसाद देतात हे सर्व त्या मूलभूत ३/३ची पद्धत पाळत करतात. ह्या गटाचा हेतू (उद्देश) असा नसतो की कोणाचा न्याय करायचा - किंवा एकाला उंचवायचं तर दुसऱ्याला खाली पाडायचं.

येशूने म्हटले - "तुमचा न्याय होऊ नये म्हणून तुम्ही न्याय करू नका, कारण ज्या प्रकारे तुम्ही न्याय कराल त्या प्रकारे तुमची न्याय होईल आणि ज्या मापाने तुम्ही माप घालिता त्याच मापाने तुमच्या पदरी पडेल."

खरंतर समविचारी मदतगार गटाचा उद्देश असतो की येशूच्या अनुयायांना प्रर्थनेद्वारे, आज्ञापालनाद्वारे, कार्याद्वारे व जबाबदारीद्वारे वाढण्यास मदत होईल अशी साधी पद्धत पुरविणे.

हे असं आहे:

मागे पहा

प्रथम त्रितिआंशात - तुम्ही ३/३ नात कराल तशीच प्रार्थना व काळजी करा. मग गटाच्या मनोराज्य पाहण्यात वेळ घालवा - आपण प्रत्येक जण येशूत कसे शास्त्रवाचन, प्रार्थना, आज्ञापालन करतो व भरोसा ठेवतो व आपली नाती कशी जगतो?

ह्या त्रिताआंशत गटाचा आढावा घ्या व गेल्या सत्रात ठरवलेल्या बांधिलकीच्या व योजनांबद्दल चर्चा करा.

वर पहा

मधला वेग हा शास्त्रवाचन, चर्चा व प्रार्थनेद्वारे वर परमेश्वाराचा विवेक व दिशा प्राप्त करण्याचा आहे. एक साधी सोपी प्रार्थना करा, ज्यात त्याच्या वचनाद्वारे त्याची इच्छा व मार्ग शिकविण्यास देवाला विनंती करा. तुमच्या वेळेचं मार्गदर्शन पवित्र आत्म्याकडून होऊ दया.

गटाच्या सदस्यांनी नेतृत्वाच्या क्षेत्रातील शिकलेले अनुभव एकमेकांना सांगावेत प्रार्थनेद्वारे किंवा, शास्त्रपाठाद्वारे किंवा थेट.

पुढील साध्या प्रश्नांच्या आधारे चर्चा कराः

  • चौकडीच्या प्रत्येक सत्रात तुमचं कसं चाललं आहे?
  • सर्वोत्तम काय चाललं आहे? तुमचे सर्वा मोठे आव्हान कोणते आहे?
  • तुमच्या पिढीचा आढावा घ्या.
  • तुमचे आव्हान कोणते होते? किंवा तुम्हाला काय समजण्यास फार त्रास झाला?
  • परमेश्वर हल्ली तुम्हाला काय दर्शवतोय?
  • इतर पुढाऱ्यांकडून किंवा सदस्यांकडून काही प्रश्न आणि प्रतिसाद आहे का?

पुढे पहा

शेवटचा वेळ पुढे बघण्यात घालवावा की शिकलेल तुम्ही आज्ञापालन करून कसं कर्यरत बनाल. एकत्रीतपणे स्तब्धपणे प्रार्थना करा व खालील प्रश्नांची उत्तरे पवित्र आत्म्याला विचाराः

  • पुढच्या वेळी एकत्र येण्यापूर्वी मी काय करावं अशी देवाची इच्छा असेल? (तुमच्या कमी मदत होण्याकरता चौकडी पद्धतीचा वापर करा).
  • ह्या कामात मला माझा मदतगार किंवा इतर सदस्य कशी मदत करू शकतील?

शेवटी प्रार्थनेद्वारे परमेश्वरासोबत संवाद साधा. गटात सर्वांनी प्रार्थना करा म्हणजे प्रत्येकासाठी प्रार्थना होईल व वेळेचा सदुपयोग होण्याकरता व तुमच्या हृदयाची तयारी करण्याकरता परमेश्वराला विनंती करा.

देवाकडे प्रार्थना करा की देवाने गटातील प्रत्येक सदस्याला या सत्रामध्ये जे शिकवले आहे ते लागू करण्यासाठी आणि त्याचे पालन करण्यासाठी त्याने त्यांना धैर्य आणि सामर्थ्य द्यावे. एखाद्या अनुभवी पुढाऱ्याला विशेषत: एका तरुण पुढाऱ्यासाठी प्रार्थना करायची असल्यास, त्या प्रार्थनेसाठी ही योग्य वेळ आहे.

दूर दूर भेटत असल्याने, हे अनुयायी प्रभू भोजन किंवा जेवण इत्यादी ह्यात एकत्र सहभागी होऊ शकत नाही, परंतू एकमेकांच्या स्वस्थाविषयी व कुटूंब व मित्रांविषयी विचारपूस करायला विसरू नका.

येशूने आपल्याला पुन्हा पुन्हा दाखवून दिले की जरी त्याने सर्वात महत्वाची कामगिरी पार पाडली पण त्याने नेहमी समतोल राखला आपल्या प्रियजनांना वेळ देऊन. समविचारी मदतगार गट हे सशक्त पुढारी निर्माण करण्याकरता ZUME साधन सामग्रीतले एक कुशल साधन आहे.

क्रियाकलाप

(45 min)

समकक्ष गुरुव्यक्ती गट (पियर मेंटरींग ग्रुप्स)

QR कोड स्कॅन करा.

दोन किंवा तीनच्या गटात विभाजित व्हा. 3/3 स्वरूपित समकक्ष गुरुव्यक्ती गट (पीअर मेंटॉरिंग ग्रुप) आऊटलाईन वापरा.

गटातील एका व्यक्तीला "मेंटी (शिकणारा)" होण्यासाठी निवडा आणि इतर सदस्यांना समकक्ष मार्गदर्शक म्हणून सुचविलेल्या प्रश्नांच्या सूचीद्वारे कार्य करण्यास सांगा.

समकक्ष गुरुव्यक्ती गटाचे नेतृत्व करण्यासाठी साधे स्वरूप:

उजळणी करा (तुमच्या वेळेचा १/३)

पहिल्या तृतीयांशात - तुम्ही प्राथमिक ३/३ ग्रुपमध्ये करता तसेच प्रार्थना करण्यात आणि काळजी वाहण्यात वेळ घालवा. मग ग्रुपचा दृष्टांत आणि पूर्वीच्या कर्तव्यपूर्तीच्या बांधिलकीशी त्याची निष्ठा ही विचारात घ्या. तुम्ही ख्रिस्तामध्ये कितपत आहात? (पवित्र शास्त्र, प्रार्थना, विश्वास, आज्ञापालन, कळीचे नातेसंबंध?). गेल्या सत्रातील कृती योजना तुम्ही पूर्ण केल्यात का? त्यांचे पुनरावलोकन करा.

वर (देवाकडे) पहा (तुमच्या वेळेचा १/३)

खालील साध्या प्रश्नांवर तुमच्या गटाला चर्चा करायला लावा:

  • रेखाकृतीत देखविलेल्या चार क्षेत्रांतील प्रत्येकामध्ये तुमची परिस्थिती काय आहे?
  • त्यांत काय बरे चालले आहे? तुमची सर्वात मोठी आव्हाने काय आहेत?
  • तुमच्या पिढीदर्शक नकाशाचे पुनरावलोकन करा.
  • तुम्हाला मोठा प्रश्न कोठे पडला किंवा समजायला कठीण आहे असे वाटले ते काय?
  • अलीकडच्या कळत देव तुम्हाला काय दाखवत आहे?
  • परिपक्व पुढाऱ्याकडून किंवा इतर सहभागी लोकांकडून काही प्रश्न विचारण्यात आले का?

आशेने पुढे पहा (तुमच्या वेळेचा १/३)

गटातील प्रत्येकाने हे प्रश्न कसे सोडवावे हे पवित्र आत्म्याने दाखवावे म्हणून मूक प्रार्थना करण्यात वेळ घालवावा.

  • आपण पुढील भेटीत एकत्र येण्याअगोदर मी कोणत्या कृती योजना किंवा ध्येयें आचरणात आणावी अशी देवाची इच्छा आहे? (तुमच्या कामावर लक्ष केंद्रित होण्यासाठी त्या चार क्षेत्रांचा उपयोग करा.)
  • ह्या कामात माझे मेंटॉर (गुरुव्यक्ती) किंवा इतर ग्रुप सभासद माझी कशी मदत करू शकतील?

शेवटी, प्रार्थनेत एक संपूर्ण गट म्हणून देवाशी बोलण्यात वेळ घालवा. प्रत्येक सभासदांकरिता प्रार्थना केली जाईल अशा हेतूने, संपूर्ण गटाने प्रार्थना करून देवाकडे ही मागणी करावी की हा गट एकेकट्याने ज्या सर्व लोकांना भेटणार आहे त्यांची अंतःकरणे तयार करावी. ह्या सत्रात देवाने जे शिकविले आहे ते स्वतःला लागू करून त्याचे पालन करण्याचे धैर्य आणि बाळ त्याने प्रत्येक सभासदाला पुरवावे म्हणून प्रार्थना करा. जर एखाद्या परिपक्व पुढाऱ्याला एखाद्या तरुण पुढाऱ्यासाठी प्रार्थना करायची गरज भासेल तर त्या प्रार्थनेसाठी ही सर्वोत्तम वेळ आहे. हे गट बरेचदा एकमेकांपासून दूर अंतरावरून संपर्कात असतात म्हणून ते प्रभू भोजन साजरे करू शकत नाही किंवा एकत्र भोजन करू शकत नाहीत. एकमेकांची प्रकृती आणि कुटुंब आणि मित्रमंडळी ह्यांविषयी विचारपूस करण्यासाठी वेळ द्यायला चुकू नका.

तीन महिन्यांची योजना

त्याच्या बायबलमध्ये, परमेश्वर म्हणतो, "तुमच्याविषयी माझ्या मनात जे संकल्प आहेत ते मी जाणतो; ते संकल्प हिताचे आहेत, अनिष्टाचे नाहीत; ते तुम्हांला तुमच्या भावी सुस्थितीची आशा देणारे आहेत."

देव योजना बनवतो, आणि तो आपल्याकडूनही योजना बनवण्याची अपेक्षा करतो.

तीन महिन्यांची योजना हे एक साधन आहे ज्याचा तुम्ही ध्यानावर आणि प्रयत्नांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि त्यांना गुणात्मक रीतीने वाढणारे शिष्य बनविण्याच्या देवाच्या प्राथमिकतेशी संरेखित करण्यासाठी उपयोग करू शकता.

पुढील स्लाइड तुम्हाला तुमची तीन महिन्यांची योजना कशी बनवायची ते दर्शवेल. आम्ही ऑनलाइन साधन वापरण्याची शिफारस करतो.

क्रियाकलाप

(30 min)

Three Month Plan

QR कोड स्कॅन करा.

वाचा - तुम्हाला प्रत्येक आयटमसाठी वचनबद्ध होण्याची गरज नाही, त्याऐवजी ते तुमच्या योजनेसाठी प्रॉम्प्ट म्हणून अभिप्रेत आहेत. (5 मि)

ऐका - शक्य होईल तितके शांत होण्यासाठी वेळ घ्या आणि ऐका की देव काय सांगू इच्छित आहे. (10 मि)

तुमची योजना रेकॉर्ड करा - कागदाच्या तुकड्यावर वचनबद्धता लिहा किंवा तुमची उत्तरे जतन (सेव) करण्यासाठी ऑनलाइन साधन वापरा. (15 मि)

चर्चा करा

(10 min)

  1. तुमच्या तीन महिन्याच्या योजना एक-एक करून एकमेकांसोबत शेअर करा.
  2. एक प्रशिक्षण भागीदार शोधा जो तुमच्याशी साप्ताहिक चेक इन करण्यास इच्छुक असेल. त्यांच्यासाठीही असेच करण्यास वचनबद्ध रहा.

विहंगावलोकन (आढावा)

(1 min)

या सत्रात ऐकलेली संकल्पना:

या सत्रात ऐकलेली साधने:

  • परस्परसंबंधांमधील नेतृत्व
  • समविचारी मदतगार गट
  • तीन महिन्यांची योजना

क्रियाकलाप

(0 min)

समुदायात सामील व्हा

Zúme चा प्रशिक्षण भाग संपत आहे, परंतु साधने आणि संकल्पनांचा सराव चालू राहतो.

ते एकटे करू नका. प्रोत्साहन आणि वाढीसाठी समुदाय शोधा.

QR कोड वापरून Zume समुदायात सामील व्हा.

Zúme Training — To saturate the world with multiplying disciples in our generation.