concept

शिष्य आणि चर्चची सोपी व्याख्या

हे पृष्ठ शेअर करा

"शिष्य" आणि "चर्च" ची सोपी व्याख्या असणे महत्वाचे आहे, ख्रिस्तामध्ये आपण कोण व्हावे आणि आपण ख्रिस्तामधील इतर लोकांशी जुडण्याची कशा प्रकारे अपेक्षा ठेवावी हे जाणून घेण्यासाठी.

शिष्य म्हणजे काय?

शिष्य या शब्दाचा अर्थ अनुयायी असा आहे. शिष्य हा देवाचा अनुयायी असतो. येशू म्हणाला, "स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे." तर देवाच्या राज्यात येशू हा आपला राजा आहे. आपण त्याचे नागरिक आहोत, त्याच्या मर्जीतली प्रजा आहोत. त्याच्या इच्छा, उद्देश, हेतू, प्राधान्यक्रम आणि मूल्ये सर्वोच्च आणि सर्वोत्तम आहेत. त्याचे वचन नियम आहे. देवाच्या राज्याचा नियम काय आहे? येशू त्याच्या नागरिकांना काय करण्यास सांगतो? येशूने शिकविले की जुन्या करारातील देवाच्या आज्ञा, म्हणजे सर्व नियमशास्त्र आणि संदेष्टे, या दोन गोष्टींमध्ये सारांशित केले जाऊ शकतात: देवावर प्रीती करणे आणि लोकांवर प्रीती करणे. येशूने आपल्याला शिष्य बनविण्याची आणि त्याने दिलेल्या सर्व आज्ञांचे पालन करण्यास त्यांना शिकविण्याची आज्ञा देखील दिली आहे. शिष्य बनविण्यामध्ये येशूने सांगितलेल्या सर्व गोष्टी शिकविणे समाविष्ट असल्याने, नवीन कराराचा सारांश या एकाच गोष्टीमध्ये दिला जाऊ शकतो: शिष्य बनवा. म्हणूनच, शिष्य हा येशूचा अनुयायी आहे जो देवावर प्रीती करितो, लोकांवर प्रीती करितो आणि शिष्य बनवितो.

चर्च म्हणजे काय?

तुम्ही परिचित असाल चर्चला एक इमारत म्हणून पाहण्यास - असे ठिकाण जिथे तुम्ही जाता. परंतु देवाचे वचन चर्चला एक मंडळी (संगती) म्हणून संबोधिते - असे लोक ज्यांच्याशी तुम्ही संबंधित आहात. बायबलमध्ये “चर्च” हा शब्द तीन वेगवेगळ्या प्रकारे वापरला गेला आहे:

  • सार्वभौमिक चर्च -- असे सर्व लोक जे येशूचे अनुयायी होते, आहेत आणि पुढे होतील. 
  • शहर किंवा प्रादेशिक चर्च -- असे सर्व लोक जे येशूचे अनुसरण करितात आणि जगाच्या विशिष्ट भागात किंवा त्या क्षेत्राच्या आसपास राहतात.
  • घरातील चर्च -- असे सर्व लोक जे येशूचे अनुसरण करितात आणि त्यांच्यापैकी एक किंवा अधिक जेथे राहतात तेथे ते एकत्रित होतात.

साधे चर्च ही आध्यात्मिक कुटुंबे आहेत ज्यात येशू त्यांचे केंद्र आणि त्यांचा राजा आहे. ती अशी आध्यात्मिक कुटुंबे आहेत जी देवावर प्रीती करितात, इतरांवर प्रीती करितात आणि शिष्य बनवितात. जेव्हा या साध्या चर्चचे गट एकत्र काहीतरी मोठे करण्यासाठी कनेक्ट होतात, तेव्हा ते शहर किंवा प्रादेशिक चर्च बनवू शकतात. सार्वभौमिक चर्च हे सर्व साध्या चर्चेसने बनलेले आहे जे क्षेत्रांमध्ये एकत्रितपणे नेटवर्क केले गेलेले आहेत आणि संपूर्ण इतिहासात पसरलेले आहेत.

स्व: तालाच विचारा

  • जेव्हा तुम्ही चर्चचा विचार करिता तेव्हा तुमच्या मनात काय येते?
    • त्या चित्रात आणि व्हिडिओमध्ये 'साधे चर्च' म्हणून वर्णन केलेले, त्यात काय फरक आहे?
    • तुमच्या मते कोणते चर्च गुणात्मक रीतीने वाढण्यास सोपे असेल आणि का?

आजच Zúme प्रशिक्षण सुरू करा

हे पूर्णपणे मोफत आहे, आणि तुम्ही कधीही सुरू करू शकता—तुमच्या स्वतःच्या गतीने, तुम्ही कुठेही असलात तरी.

विनामूल्य नोंदणी करा