tool

प्रार्थनेतील वाटचाल आणि हे कसे करावे

हे पृष्ठ शेअर करा

प्रार्थना वाटचाल हे जसे वाटते तसेच आहे - जवळपास चालत फिरत असताना देवाला प्रार्थना करणे. आपले डोळे बंद करून डोके नमविण्याऐवजी, आपण आपल्या सभोवतालच्या गरजांकडे डोळे उघडे ठेवितो आणि नम्रपणे देवाकडे हस्तक्षेप करण्याची विनंती करण्यासाठी आपले अंतःकरण नमवितो. तुम्ही दोन किंवा तीन च्या लहान गटांमध्ये प्रार्थना वाटचाल करू शकता किंवा तुम्ही स्वतः एकटे प्रार्थना वाटचाल करू शकता.

तुम्ही चालत असताना आणि प्रार्थना करित असताना, संधींसाठी जागरूक राहा आणि वाटेत भेटणाऱ्या व्यक्ती आणि गटांसाठी प्रार्थना करण्यासाठी देवाच्या आत्म्याने केलेल्या सूचना ऐका. देवाचे वचन सांगते की आपण “सर्व माणसांसाठी विनंत्या, प्रार्थना, रदबदल्या व उपकारस्तुती करावी; राजांकरिता व सर्व वरिष्ठ अधिकार्‍यांकरिता करावी, ह्यासाठी की, पूर्ण सुभक्तीने व गंभीरपणाने आपण शांतीचे व स्वस्थपणाचे असे आयुष्यक्रमण करावे.

हे आपला तारणारा देव ह्याच्या दृष्टीने चांगले व स्वीकारण्यास योग्य आहे.” इतरांसाठी प्रार्थना करण्याच्या देवाच्या आज्ञेचे पालन करण्याचा प्रार्थना वाटचाल हा एक सोपा मार्ग आहे. आणि हे जसे वाटते तसेच आहे - जवळपास चालत फिरत असताना देवाला प्रार्थना करणे.

चार गोष्टी ज्या तुमच्या प्रार्थनेचे मार्गदर्शन करितात:

  1. निरीक्षण - तुम्हाला काय दिसत आहे? जर तुम्हाला एखाद्या अंगणात लहान मुलाची खेळणी दिसत आहे तर तुम्हाला शेजारच्या मुलांसाठी, कुटुंबांसाठी किंवा परिसरातील शाळांसाठी प्रार्थना करण्यास प्रेरणा होईल.
  2. संशोधन - तुम्हाला काय माहित आहे? जर तुम्ही शेजारच्या परिसराबद्दल काही वाचले असेल, तर तुम्हाला तेथे राहणाऱ्या लोकांबद्दल किंवा त्या भागातील गुन्हेगारी किंवा अन्यायाबद्दल कदाचित काही माहिती असेल. या गोष्टींबद्दल प्रार्थना करा आणि देवाला कार्य करण्यास सांगा.
  3. प्रकटीकरण - पवित्र आत्मा तुमच्या हृदयाला प्रोत्साहित करू शकतो किंवा एखाद्या विशिष्ट गरजेसाठी किंवा एखाद्या विशिष्ट प्रार्थना विनंतीसाठी तुम्हाला सुचवू शकतो. ऐका - आणि प्रार्थना करा!
  4. पवित्रशास्त्र - तुम्ही देवाच्या वचनाचा काही भाग वाचला असेल तुमच्या चालण्याच्या (वाटचालीच्या) तयारीसाठी किंवा तुम्ही चालत असताना, पवित्र आत्मा कदाचित एक शास्त्रवचन तुमच्या मनात टाकेल. त्या शास्त्रभागासाठी आणि त्याचा त्या भागातील लोकांवर कसा परिणाम होऊ शकतो यासाठी प्रार्थना करा.

प्रभावाची पाच क्षेत्रे ज्यासाठी प्रार्थना केली पाहिजे:

  1. सरकार - न्यायालये, आयोगाच्या इमारती किंवा कायद्याची अंमलबजावणी करणारी कार्यालये यासारिखी सरकारी केंद्रे शोधा आणि त्यासाठी प्रार्थना करा. त्या क्षेत्रांच्या संरक्षणासाठी, न्यायासाठी आणि त्यांच्या नेत्यांना ईश्वरी ज्ञान मिळण्यासाठी प्रार्थना करा.
  2. व्यवसाय आणि वाणिज्य - आर्थिक जिल्हे किंवा खरेदी क्षेत्र यासारखी व्यावसायिक केंद्रे शोधा आणि त्यासाठी प्रार्थना करा. योग्य गुंतवणूक आणि संसाधनांच्या चांगल्या कारभारासाठी प्रार्थना करा. आर्थिक न्याय आणि संधी आणि उदार व ईश्वरी दातांसाठी प्रार्थना करा जे नफ्यापेक्षा लोकांचा विचार करितात.
  3. शिक्षण - शाळा आणि प्रशासकीय इमारती, व्यावसायिक प्रशिक्षण केंद्रे, सामुदायिक महाविद्यालये आणि विद्यापीठे यासारिख्या शैक्षणिक केंद्रांकडे पहा आणि त्यासाठी प्रार्थना करा. प्रार्थना करा नीतिमान शिक्षकांसाठी त्यांनी देवाचे सत्य शिकविण्यासाठी आणि त्यांच्या विद्यार्थ्यांच्या मनाचे रक्षण करण्यासाठी. खोटेपणा किंवा गोंधळ वाढविण्याच्या प्रत्येक प्रयत्नात देवाने हस्तक्षेप करावा यासाठी प्रार्थना करा. प्रार्थना करा कि या ठिकाणांमधून सेवा आणि नेतृत्व करण्याची इच्छा असलेले सुज्ञ नागरिक बाहेर पडावेत.
  4. दळणवळण - रेडिओ स्टेशन, टीव्ही स्टेशन आणि वृत्तपत्र प्रकाशक यांसारिखे दळणवळण केंद्रे शोधा आणि त्यासाठी प्रार्थना करा. देवाची गोष्ट आणि त्याच्या अनुयायांची साक्ष संपूर्ण शहरात आणि जगभरात पसरली जावी यासाठी प्रार्थना करा. प्रार्थना करा की त्याचा संदेश त्याच्या माध्यमातून त्याच्या लोकसमुदायापर्यंत पोहोंचविला जावा आणि देवाच्या लोकांनी सर्वत्र देवाचे कार्य पाहावे.
  5. आध्यात्मिकता - चर्च इमारती, मशिदी किंवा मंदिरे यासारिख्या अध्यात्मिक केंद्रे शोध आणि त्यासाठी प्रार्थना करा. प्रार्थना करा की प्रत्येक आध्यात्मिक साधकाला येशूमध्ये शांती आणि सांत्वन मिळावे आणि तो कोणत्याही खोट्या धर्मामुळे विचलित किंवा गोंधळून जाऊ नये.

स्व: तालाच विचारा

  • तुमच्या दैनंदिन जीवनातील अशी सामान्य ठिकाणे कोणती आहेत जिथे तुम्ही स्वाभाविकपणे प्रार्थना वाटचाल करू शकता?
    • तुमच्या जवळपास अशी कोणती "अंधार" असलेली ठिकाणे आहेत जेथे तुम्ही प्रार्थना वाटचाल करू शकता आणि ज्यांना तुमच्या प्रार्थनेचा फायदा होऊ शकेल?

आजच Zúme प्रशिक्षण सुरू करा

हे पूर्णपणे मोफत आहे, आणि तुम्ही कधीही सुरू करू शकता—तुमच्या स्वतःच्या गतीने, तुम्ही कुठेही असलात तरी.

विनामूल्य नोंदणी करा