concept

समविचारी मदतगार गट

हे पृष्ठ शेअर करा

समविचारी मदतगार गट उपयोग करितो नेता-ते-नेता मार्गदर्शनाचा येशूच्या वैयक्तिक अनुयायांसह, सर्वसाधारण चर्चसह, सेवा संस्थांसह किंवा अगदी सर्वसाधारण चर्च नेटवर्कसह. या गटांमध्ये 3/3 गटांचे नेतृत्व आणि प्रारंभ करणारे लोक असतात. हा गट 3/3 स्वरूपाचे देखील अनुसरण करितो आणि हा तुमच्या क्षेत्रातील देवाच्या कार्याच्या आध्यात्मिक आरोग्याचे मूल्यांकन करण्याचा एक शक्तिशाली मार्ग आहे. हे गट पवित्र शास्त्रातील येशूच्या सेवेच्या उदाहरणाचे अनुसरण करितात, एकमेकांना प्रश्न विचारितात आणि फीडबॅक देतात -- 3/3 गटाच्या सर्व समान मूलभूत वेळेच्या रचनेचा उपयोग करून. येशू म्हणाला - “मी तुम्हांला नवी आज्ञा देतो की, तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी; जशी मी तुमच्यावर प्रीती केली तशी तुम्हीही एकमेकांवर प्रीती करावी. तुमची एकमेकांवर प्रीती असली म्हणजे त्यावरून सर्व ओळखतील की, तुम्ही माझे शिष्य आहात.” समविचारी मदतगार गटाचा उद्देश येशूच्या अनुयायांना प्रार्थना, आज्ञापालन, लागूकरण आणि उत्तरदायित्वाद्वारे वाढण्यास मदत करण्यासाठी एक साधे स्वरूप प्रदान करणे आहे. दुसऱ्या शब्दांत - "एकमेकांवर प्रीती करणे."

समविचारी मदतगार गटाचे नेतृत्व करण्यासाठी सोपे स्वरूप:

मागे वळून पहा [तुमच्या वेळेपैकी 1/3]

पहिल्या तृतियांश वेळे दरम्यान - तुम्ही मूलभूत 3/3 गटात जसा वेळ घालविता त्याप्रमाणेच प्रार्थना आणि काळजीमध्ये वेळ घालवा. नंतर गटाचे व्हिजन/दर्शन/दूरदृष्टी कडे आणि मागील वचनबद्धतेमधील विश्वासूपणाकडे पाहण्यात वेळ घालवा: तुम्ही ख्रिस्तामध्ये किती चांगले राहत आहात? [पवित्रशास्त्र, प्रार्थना, भरवसा, आज्ञापालन, मुख्य नातेसंबंध?] तुमच्या गटाने मागील सत्रामधील तुमच्या कृती योजना पूर्ण केल्या आहेत का? त्यांचे पुनरावलोकन करा.

वर पहा [तुमच्या वेळेपैकी 1/3]

गटाला खालील सोप्या प्रश्नांवर चर्चा करण्यास सांगा:

  • चार क्षेत्र आकृतीच्या प्रत्येक विभागात तुम्ही कशा प्रकारे कार्य करित आहात?
  • कोणती गोष्ट उत्तम कार्य करित आहे? तुमची सर्वात मोठी आव्हाने कोणती आहेत?
  • तुमच्या वर्तमान पिढीजन्य नकाशाचे पुनरावलोकन करा.
  • तुम्हाला कोणती गोष्ट आव्हानात्मक वाटली किंवा तुम्हाला कोणती गोष्ट समजण्यास कठीण वाटली?
  • देव तुम्हाला सध्या काय दाखवित आहे?
  • अनुभवी नेत्यांकडून किंवा इतर सहभागींकडून काही प्रश्न आहेत का?

पुढे पहा [तुमच्या वेळेपैकी 1/3]

या प्रश्नांची उत्तरे कशी द्यावीत हे दाखविण्यासाठी पवित्र आत्म्याकडे मागणी करीत गटातील प्रत्येकासह मूक प्रार्थनेत वेळ घालवा:

  • देवाची इच्छा काय आहे की पुढच्या वेळी आपण एकत्र येण्याआधी मी कोणती कृती योजना किंवा उद्दिष्टे आचरणात आणावीत? [तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करण्यात मदत करण्यासाठी चार क्षेत्र साधनाचा उपयोग करा]
  • माझे मार्गदर्शक किंवा इतर गट सदस्य मला या कामात कशी मदत करू शकतात?

शेवटी एक गट म्हणून प्रार्थनेद्वारे देवाशी बोलण्यात वेळ घालवा. गटाला प्रार्थना करण्यास सांगा जेणेकरून प्रत्येक सदस्यासाठी प्रार्थना केली जाईल आणि देवाकडे मागा कि त्याने त्या सर्वांची अंतःकरणे तयार करावीत ज्यांच्यापर्यंत येथून पुढे गट विभक्त होऊन गेल्यावर पोहोंचेल. देवाने गटातील प्रत्येक सदस्याला या सत्रात जे शिकविले आहे ते लागू करण्यास आणि त्याचे पालन करण्यास त्याने त्यांना धैर्य आणि सामर्थ्य देण्यासाठी देवाकडे प्रार्थना करा. एखाद्या अनुभवी नेत्याला विशेषत: तरुण नेत्यासाठी प्रार्थना करायची असल्यास, ही त्या प्रार्थनेसाठी योग्य वेळ आहे. हे गट अनेकदा दूरवर भेटत असल्याने, तुम्ही कदाचित प्रभू भोजन साजरे करू शकणार नाही किंवा जेवण सामायिक करू शकणार नाही, परंतु आरोग्य आणि कुटुंब आणि मित्रांबद्दल विचारपूस करण्यासाठी निश्चितच वेळ काढा.

स्व: तालाच विचारा

  • समविचारी मदतगारचे हे स्वरूप तुम्ही शाळेत किंवा कामावर अनुभविलेल्या इतर समविचारी मदतगारपेक्षा वेगळे किंवा समान कसे आहे?

आजच Zúme प्रशिक्षण सुरू करा

हे पूर्णपणे मोफत आहे, आणि तुम्ही कधीही सुरू करू शकता—तुमच्या स्वतःच्या गतीने, तुम्ही कुठेही असलात तरी.

विनामूल्य नोंदणी करा