गुणात्मक वाढीची गती महत्वाची आहे
वेग महत्त्वाचा आहे कारण आपली सार्वकालिकता त्या अल्पवेळेतच ठरते ज्याला आपण “जीवन” म्हणतो. देवाचे वचन आपल्याला सांगते की देव आपल्यासोबत धीर धरितो - त्याची इच्छा आहे की कोणाचाही नाश होऊ नये, परंतु प्रत्येकाने मागे फिरावे आणि त्याचे अनुसरण करावे. देव आपल्याला अधिक वेळ देतो कारण त्याला माहित आहे की त्याने आपल्याला जे काही करण्यास बोलाविले आहे ते करण्यासाठी आणि ज्यांच्यापर्यंत पोहोंचण्यासाठी त्याने आपल्याला बोलाविले आहे त्या सर्वांपर्यंत पोहोंचण्यासाठी आपल्याकडे फक्त थोडा वेळ आहे. येशूचे अधिक जवळून अनुसरण करण्यासाठी, आपल्याला त्याच्या लोकांचा अधिक वेगाने पाठलाग करावा लागेल. आपण फक्त आपल्यानुसार वेळ घालवू शकत नाही. आपल्याला आपला वेग वाढवावा लागेल.
जरी चर्च आकाराने मोठे आहे आणि जगाच्या लोकसंख्येचा पूर्वीपेक्षा अधिक मोठा भाग आहे, तरीही आपण लोकसंख्या वाढीच्या दरासोबत समान राहण्यात अपयशी ठरत आहोत. याचा अर्थ आज पूर्वीपेक्षा अधिक हरवलेले लोक जिवंत आहेत. ही स्तर यथास्थिति स्वीकारण्यायोग्य नाही. हे एक कारण आहे की गुणात्मक रीतीने वाढणारे शिष्य बनविणे इतके महत्त्वाचे आहे. नियमितपणे गुणात्मक रीतीने वाढणाऱ्या शिष्यांची टक्केवारी अत्यंत महत्त्वाची आहे.
स्पष्ट करण्यासाठी, दहा वर्षांच्या कालावधीचे उदाहरण पाहूया.
समजा तुम्ही अशा एका शिष्यापासून सुरुवात करिता जो दर 18 महिन्यांनी एक नवीन शिष्य बनवितो. नवीन शिष्य ही तेच करितात. तर दहा वर्षांत तुमचे 64 शिष्य होतील.
त्याऐवजी, तो एक शिष्य आणि ते नवीन शिष्य दर 4 महिन्यांनी शिष्य बनवितात, तर दहा वर्षांत तुमच्याकडे अब्जावधी शिष्य असतील. दुसऱ्या शब्दांत, दहा वर्षांच्या कालावधीत, सरासरी पुनरुत्पादन दर 18 महिन्यांवरून 4 महिन्यांपर्यंत बदलण्याचा अर्थ असा नाही की परिणाम साडेचार पट जलद आहे. तो 15 दशलक्ष पट अधिक वेगवान आहे.
हे शक्य आहे ह्या तथ्यामुळे की एखाद्या नवीन शिष्याने पहिली गोष्ट केली पाहिजे ती म्हणजे तो किंवा ती जे शिकत आहे ते इतरांसोबत सामायिक केले (इतरांना सांगितले) पाहिजे. याचा अर्थ असा आहे की ते विश्वासात येताच दुसऱ्या कोणाला तरी सुद्धा ख्रिस्ताकडे आणू शकतात. जर शिष्यांनी शिकलेल्या गोष्टींचे पालन आणि सामायिकरणासाठी दुहेरी उत्तरदायित्वाचे (जबाबदारीचे) पॅटर्न चालू ठेविले तर हा पॅटर्न परिपक्वता प्रक्रियेदरम्यान चालू राहू शकतो.
स्व: तालाच विचारा
- गती महत्त्वाची का आहे?
- गतीसाठी देवाच्या प्राधान्यामध्ये अधिक चांगले संरेखित होण्यासाठी तुमच्या विचारसरणीत, तुमच्या कृतीत किंवा तुमच्या मनोवृत्तीत काय बदलण्याची गरज आहे?
- कोणती अशी एखादी गोष्ट आहे जी तुम्ही करू शकता या आठवड्याची सुरुवात करीत असताना जी काही फरक आणू शकेल?
आजच Zúme प्रशिक्षण सुरू करा
हे पूर्णपणे मोफत आहे, आणि तुम्ही कधीही सुरू करू शकता—तुमच्या स्वतःच्या गतीने, तुम्ही कुठेही असलात तरी.
विनामूल्य नोंदणी करा