tool

चार क्षेत्र साधन

हे पृष्ठ शेअर करा

चार क्षेत्र साधन एक निदान चार्ट आहे ज्याचा उपयोग नेतृत्व कक्षाद्वारे केला जातो सध्याच्या प्रयत्नांची स्थिती आणि त्यांच्या सभोवताली असणारी राज्याची क्रियाकलाप यावर प्रतिबिंबित करण्यासाठी. येशू अनेकदा कार्य कसे चालले आहे याचा आढावा घेण्यासाठी शिष्यांना सेवेपासून दूर शांत ठिकाणी घेऊन गेला होता. हे सोपे साधन तुम्हाला आणि तुमच्या सह-नेत्यांना येशूच्या या पॅटर्नचे अनुसरण करण्यास आणि तुमच्या कारभारीपणाच्या सर्व भागांना संबोधित करण्यास मदत करण्यासाठी आहे. या साधनाचा समविचारी मदतीमध्ये (पीर मेन्टॉरिंग) उपयोग करा क्रियाकलाप, लोक आणि गटांचे पुनरावलोकन करण्यासाठी त्यांचे विविध क्षेत्रांमध्ये वर्गीकरण करून आणि एकमेकांना मुख्य प्रश्न विचारून जेणेकरून कृतीचे मुद्दे आणि पुढील टप्पे समोर येतील.

चार क्षेत्र साधनाचे उदाहरण

रिकामे क्षेत्र 

प्रश्न विचारा: तुम्ही कोठे किंवा कोणासोबत [कोणते लोक गट] राज्याचा विस्तार करण्याचा विचार करित आहात?

बीजन क्षेत्र 

प्रश्‍न विचारा: तुम्ही राज्याची सुवार्ता कोठे किंवा कोणासोबत सामायिक करित आहात? तुम्ही हे कशा प्रकारे करित आहात?

वाढणारे क्षेत्र

प्रश्न विचारा: तुम्ही लोकांना कसे सुसज्ज करित आहात आणि त्यांना आध्यात्मिकरित्या, वैयक्तिकरित्या आणि त्यांच्या नैसर्गिक नेटवर्कमध्ये कसे वाढवित आहात?

कापणी क्षेत्र

प्रश्न विचारा: नवीन आध्यात्मिक कुटुंबे [साधारण चर्च] कशी तयार होत आहेत?

गुणात्मक रीतीने वाढणारे क्षेत्र

प्रश्न विचारा: विश्वासू लोकांसाठी आणि त्यांना सुसज्ज करण्यासाठी आणि त्यांना पुनरुत्पादनासाठी जबाबदार धरण्यासाठी तुम्ही कोणासोबत, कसे आणि केव्हा फिल्टर करित आहात?

स्व: तालाच विचारा

  • अशी कोण व्यक्ती आहे ज्यांच्याकडे तुमच्या सारखीच आवड आहे, ज्यांना तुम्ही भेटू शकता आणि या प्रश्नांचे पुनरावलोकन त्यांच्यासोबत करू शकता?

आजच Zúme प्रशिक्षण सुरू करा

हे पूर्णपणे मोफत आहे, आणि तुम्ही कधीही सुरू करू शकता—तुमच्या स्वतःच्या गतीने, तुम्ही कुठेही असलात तरी.

विनामूल्य नोंदणी करा