3 वर्तुळे सुवार्ता सादरीकरण
देवाची कहाणी सांगण्याचे (सामायिक करण्याचे) अनेक मार्ग आहेत.
सर्वोत्तम मार्ग तुम्ही ज्या व्यक्तीसोबत सामायिक करणार आहात व्यक्तीवर आणि जगाबद्दलचा त्यांचा दृष्टिकोन आणि त्यांचे जीवन अनुभव यावर अवलंबून असेल. देव ऐकण्यास इच्छुक असलेल्या अंतःकरणावर कार्य करण्यासाठी सामायिक करण्यास इच्छुक असलेल्या अंतःकरणांचा उपयोग करून घेतो. हे त्याचे काम आहे. तो फक्त आम्हाला सामील होण्यासाठी आमंत्रित करतो.
देवाची कहाणी (गोष्ट) सामायिक करण्याचा एक मार्ग म्हणजे एक साधे रेखाचित्र सामायिक करणे आणि त्याचे वर्णन करणे ज्याला आपण तीन वर्तुळे म्हणतो

आपण सर्वजण अत्यंत भंग पावलेल्या जगात राहतो.
दुःख, मृत्यू, युद्ध, रोग, व्यसनाधीनता अशा कथा आपण पाहतो आणि ऐकतो. त्या सर्वत्र आहे. पण ही देवाची मूळ रचना नाही.
देवाची परिपूर्ण रचना हे प्रीती, आनंद, एकता आणि शांती यांनी भरलेले जग आहे.
ज्या मार्गाने आपण स्वतःला देवाच्या परिपूर्ण रचनेतून (डिजाईनमधून) बाहेर काढले, आणि दुःखामध्ये (भंग पावलेल्या गोष्टींमध्ये) प्रवेश केला त्याला बायबलमध्ये “पाप” असे म्हटले आहे.
पाप म्हणजे देवाच्या मार्गापासून दूर जाणे आणि आपल्या स्वतःच्या मार्गाचे अनुसरण करणे. पाप आपल्याला देवापासून वेगळे करते. पाप आपल्याला दुःखामध्ये (भंग पावलेल्या गोष्टींमध्ये) ढकलून टाकते. पाप आपल्याला अध्यात्मिक मृत्यूकडे घेऊन जाते.
लोकांना दुःखामधून (भंग पावलेल्या गोष्टींमधून) बाहेर पडण्याची इच्छा आहे. बाहेर पडण्यासाठी आपण सर्व प्रकारच्या वेगवेगळ्या गोष्टी करून पाहतो. आपल्यापैकी काही ड्रग्स आणि दारूचा उपयोग करण्याचा प्रयत्न करतात. आपल्यापैकी काहीजण चांगल्या नोकरीद्वारे किंवा भरपूर पैसे कमवून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतात. आपल्यापैकी काहींना वाटते की नातेसंबंध त्यांना बाहेर काढतील. काही जण धर्माचाही प्रयत्न करतात -- आपल्याला वाटते की चांगली वागणूक किंवा इतरांना मदत केल्याने आपणाला मुक्ती मिळेल.
यापैकी कोणतीही गोष्ट प्रत्यक्षात भंग पावल्याची समस्या सोडवत नाही. अगदी क्षणभर आपण दूर गेल्यासारखे वाटत असतानाही… आपण जिथे सुरुवात केली होती तिथे परत येतो. येथे एक कठीण सत्य आहे. जर आपण अजूनही तिथे आहोत - अजूनही भंग पावलेल्या अवस्थेत - जेव्हा हे जीवन संपेल, तर बायबल सांगते की आपण देवापासून कायमचे वेगळे झालेले आहोत. सदासाठी.
बायबल त्या ठिकाणाला “नरक” म्हणून संबोधते.
पण देवाची इच्छा आहे कि आपण भंग पावलेल्या अवस्थेत राहू नये.
बायबल सांगते की - देवाने आपल्यावर एवढी मोठी प्रीती केली की त्याने आपल्यासाठी यातून बाहेर निघण्याचा मार्ग काढण्यासाठी स्वतःच्या पुत्राला पाठवले. आपले पाप पुसून टाकण्यासाठी आणि आपल्याला भंग पावलेल्या अवस्थेपासून दूर नेण्यासाठी येशू पृथ्वीवर आला.
म्हणून देवाचा पुत्र येशूने, त्याच्या मृत्यूद्वारे आपले पाप रद्द करून टाकले.
येशूचा मृत्यू आणि त्याला गाडल्यानंतर तीन दिवसांनी, तो मेलेल्यांतून उठला. त्याच्या महान बलिदानामुळे, देवाने येशूला स्वर्गातील आणि पृथ्वीवरील सर्व गोष्टींचा राजा बनवले.
येशू राजाने आपल्यासाठी भंग पावलेल्या अवस्थेमधून बाहेर पडण्याचा मार्ग तयार केला. देव म्हणाला की जर…
… आपण आपल्या पापापासून मागे वळतो...
...आणि विश्वास ठेवतो की येशू आपल्यासाठी मरण पावला...
... आणि पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा घेतो...
तर देव आपल्याला उठवतो -- अगदी येशूप्रमाणे -- देवाच्या कुटुंबाचा भाग म्हणून नवीन प्रकारच्या जीवनात चालण्यास -- सदासाठी.
त्यानंतर आपण भंग पावलेल्या जगात या नवीन जीवनाला आचरणात आणतो, आणि येशूच्या परत येण्याची वाट पाहतो जेव्हा तो एक नवीन स्वर्ग आणि नवीन पृथ्वी बनवेल जिथे आपण त्याच्याबरोबर सदैव परिपूर्णतेमध्ये राहू शकू.
देवाची इच्छा आहे की आपण त्याच्यासोबतच्या नातेसंबंधात वाढावे. देवाची इच्छा आहे की आपण त्याच्या मूळ परिपूर्ण रचनेत (डिजाईनमध्ये) परत यावे (रिस्टोर व्हावे).
देवाच्या कुटुंबाचा एक भाग म्हणून, येशू आपल्याला एक मिशन देतो -- जगण्याचे कारण -- आणि संभव सर्वोत्तम जीवन जगण्याचा मार्ग.
आपल्यासाठी येशूचे मिशन आहे की आपण जावे.
येशू आपल्या या पाठवतो -- ज्याप्रमाणे त्याच्या देव पित्याने त्याला पाठवले आहे -- परत भंग पावलेल्या अवस्थेत इतरांना त्यातून मुक्त होण्यास आणि देवाच्या कायमस्वरूपी कुटुंबाचा भाग होण्यास मदत करण्यासाठी.
या तीन वर्तुळे जगात, फक्त दोन प्रकारचे लोक आहेत -
जे लोक … देवाच्या परिपूर्ण रचनेचा एक भाग आहेत देवाच्या बचाव कार्यानुसार जगत असताना … देवाला त्याच्या कायमच्या कुटुंबाशी पुन्हा जोडण्यात मदत करत असताना.
किंवा…
जे लोक … अजूनही भंग पावलेल्या अवस्थेत आहेत … मोकळे होण्याचा सर्व काही प्रयत्न करत असताना … कोणीतरी त्यांना वाचवेल ही आशा बाळगून.
- आता तुम्ही कुठे आहात हे तुम्हाला माहीत आहे का?
- तुम्ही कुठे जाऊ इच्छिता हे तुम्हाला माहीत आहे का?
देवाची कहाणी सामायिक करण्याचे अनेक मार्ग आहेत. महत्वाची गोष्ट सामायिक करणे आहे. देव ऐकण्यास इच्छुक असलेल्या अंतःकरणावर कार्य करण्यासाठी सामायिक करण्यास इच्छुक असलेल्या अंतःकरणांचा उपयोग करून घेतो. हे त्याचे काम आहे. तो फक्त आपल्याला सामील होण्यासाठी आमंत्रित करता आहे.
स्व: तालाच विचारा
- तुम्ही ही कहाणी (गोष्ट) लक्षात ठेऊन सांगू शकता का? सरावाने, प्रत्येकजण सुवार्तेची कहाणी सांगण्यास अधिक चांगला होतो. आता थांबा आणि 3 वेळा सराव करा.
- या कहाणीतील लोकांबद्दल तुम्ही काय शिकता?
- तुम्ही देवाबद्दल काय शिकता?
- तुमच्या मते अशी कहाणी सांगून देवाची कहाणी सांगणे सोपे किंवा कठीण होईल?
आजच Zúme प्रशिक्षण सुरू करा
हे पूर्णपणे मोफत आहे, आणि तुम्ही कधीही सुरू करू शकता—तुमच्या स्वतःच्या गतीने, तुम्ही कुठेही असलात तरी.
विनामूल्य नोंदणी करा